|| माहितीसाठी : अखेर नुकसान भरपाई मिळाली ||
९ ते १७ जून २०१८ दरम्यान झालेल्या कोलालंपूर, मलेशिया येथील "१६व्या जागतिक भारतीय महोत्सव" सहभागासाठी आयुश तर्फे कलावस्तू संकलित करून महाट्राईब्स यांना जमा करण्यात आल्या होत्या तसेच आयुश तर्फे २ कलाकार सहभागी झाले होते. (काही फोटो -
https://www.facebook.com/media/set/?set=a.2019760364760709&type=3 )
प्रदर्शनानंतर महाट्राईब्स कडून कलावस्तू परत मिळायला ६ महिन्यापेक्षा जास्त उशीर झाला (१२ नोव्हेंबर २०१८), तसेच मिळाल्यानंतर पेन्टिंग चे बॉक्स त्यात नव्हते. त्यात आयुश चे १२,८९,७००, स्वपना पवार यांचे ७,९०,०००, मनीषा नैताम यांचे १,९६,००० किमतीचे पेंटिंग्स होते. या विषयी संबंधितांना कळविल्या नंतर सचिव/आयुक्त पातळीवर बैठका झाल्या, अनेक आश्वासने मिळाली. विविध प्रस्थाव मागवले गेले चर्चा झाल्या.
आम्ही लवकर प्राक्रिया करतो आहोत तरी या विषयी सोशिअल स्पेस/मिडीया वर कळवू नका नाही तर तुमचे प्रोजेक्ट बंद करून काळ्या यादीत टाकले जाईल, इत्यादी. असा अनौपचारिक पद्धतीने कन्सल्टंट मार्फत दबाव टाकण्यात आला.
तरी आपण कार्यालयीन पद्धतीने अनेक वेळेस स्मरणपत्र पाठवत राहिलो, पण ३ वर्षानंतर हि त्याला सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाला. या उशिरामुळे अनेकांत नकारात्मक प्रतिक्रिया/गैरसमज पसरल्या, आयुश च्या कामाविषयी पण. (त्याचा विपरीत परिणाम क्लस्टर योजनेवर पण झालाय)
ओफ्रोट च्या राजेंद्र मऱ्हस्कोले यांनी सदर विषयी माहिती घेण्यासाठी संपर्क केल्यावर त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली, त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला. सदर विषयी बातमी पण आली होती. चक्रे पुन्हा सुरु झाली.
हे काम अधिक वेगाने व्हावे यासाठी सचिन सातवी (आयुश ग्रुप साठी), स्वपना पवार, मनीषा नैताम यांनी या विषयवार NCST कडे पण तक्रारीची नोंद केली. अखेर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन कालावस्तूंच्या किंमती महाट्राईब्स वतीने TRTI कडून प्राप्त झाले.
काल आयुश तर्फे बैठक घेऊन सचिन सातवी, डॉ सुनिल पऱ्हाड, चेतन गुरोडा, पूनम चौरे यांनी संबंधित कलाकारांना सविस्तर माहिती देऊन मिळालेली नुकसान भरपाई ट्रान्सफर करण्यात आली. (दिलिप विघ्ने, राजेश मोर, संदिप भोईर, शांताराम दिवा, सदानंद पुंजारा#, संजय पऱ्हाड, किरण गोरवाला, संदेश राजड, निलेश राजड#, संजय रावते, बबिता राजड, मंगेश कडू, भिकू झोप, जयवंत सोमण, चिंतू राजड* (घरातले), शंकर चिपात* (घरातले))
या कामी अनेकांनी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष सहकार्य/मार्गदर्शन केले त्यांचे जाहिर आभार आणि त्यांना मानाचा जोहार. 🙏
या सगळ्या प्रकरणात पुन्हा जाणीव झाली कि व्यवस्था चालविणाऱ्यात आदिवासींबद्दल संवेदना जागृत करणे महत्वाचे आहे (विशेष करून प्राथमिकतेने आदिवासी विकास विभागात). आणि एक सामायिक प्लॅटफॉर्म ज्यावरून ज्यावरून सातत्याने समाज आणि शासन संपर्कात राहून आदिवासी विकासासाठी आवश्यक फीडबॅक नुसार उपाय योजना ठरवतील. चलो त्या दिशेने प्रयत्न करूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व. जोहार !
________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+योजना]