|| वैयक्तिक अनुभव : *रस्ता दुरुस्ती, अडचणी* ||
▪️[ *आदिवासी बोली* : निहरी] : बेस रस्ता खनला 
_दोन दिस घरा जण आलू, मुंबय सी चारोटे ला जाया भलतां ट्राफिक लाग हायवेला. सिमेट चा कराया ओढा बेस रस्ता खणून टाकेल आहे, गायचेन कोठ लोखंडाचं सलयं, कोठ खरडं, पावसात त गायचेन एक्सिडंटा होतीला. क्या असे टायमाला खणून टाकलाहें समाजाला निहि, ना जो सिमेट चा करेल आहे तो हो बेस नीही जोर्ह्यात जावच नीही. ना भलता गब्धलव. ते दिस माना साहा तास लागल घरा जाया. रस्ता बेस कराया पहले सगलां वाकरून परत थर टाकीत. जायाच होवास त बेस जयजास._
▪️[मराठी भाषा] : *विरोधक पण महत्वाचे*
लोकसभा २०२४ चे निकाल आले. मतदानात सहभागी होऊन आपले मत नोंदवणाऱ्या आणि सगळ्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन. कदाचित पातळी सोडून राजकारण करणे महाराष्ट्राला आणि हट्टी अहंकारी पद्धत देशाला आवडलेली नसावी हे निकालांवरून दिसतेय. सत्ताधाऱ्यांच्या जागा कमी झाल्या आणि विरोधी पक्षांच्या जागा वाढल्या. सरकार मध्ये पण आघाडीतील घटक पक्षांचे महत्व वाढले आहे. अपेक्षा करूया जे काही कायदे तयार केले जातील ते हेकेखोर पणे न होता *संवादातून, चर्चेतून सुधारणा करून होतील. सामान्य लोकांच्या अपेक्षा लक्षात घेतल्या जातील.* [देशभरात ४७ जागा, महाराष्ट्रात ४ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव होत्या] सदनात आपल्या समाजाचा स्पष्ट आवाज मांडावा हि अपेक्षा. 
https://youtu.be/fyBzlgUGugc?si=IupFlLGm3zvZABFa
▪️[दोन शब्द सामाजिक] : *दिशा आणि रस्ता हवा*
आदिवासी सामाजिक उपक्रमांचे पण तसेच आहे, आपली दिशा काय आहे हे ठरवून त्यासाठी आवश्यक रस्ते कोणते आणि ते *रस्ते सुरळीत करण्यासाठी प्रयत्न* होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातून कर्मचारी, नोकरदार, व्यवसायिक, तज्ञ्, युवा, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचे *योगदान कसे त्या दिशेने निरंतर होत राहील याची खात्री करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था* हवी. समाजासाठी प्रामाणिक पणे हातभार लावणारी *माणसे आणि संस्कार देणारे उपक्रम आहेत आपल्याकडे?*🤔 या विषयी आपल्याकडे काही *आयडिया असल्यास सविस्तर चर्चा करायला नक्कीच आवडेल,* बोलूयात.🙏🏻 जोहार!