|| *शिबिर : हस्तशिल्प विकास आयुक्तालय* ||

7 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Sep 2, 2020, 11:11:14 AM9/2/20
to AYUSH google group
|| *शिबिर : हस्तशिल्प विकास आयुक्तालय* ||

आयुश च्या नोंदणीकृत कलाकारांसाठी वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विकास आयुक्तालया मार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे. *आयुक्तालयातील अधिकारी शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या संपर्कातील सगळ्या कलाकारांना कळवून शिबिराचा लाभ घ्यावा*

▪️ *शिबिर नियोजन* 
*दिवस* : ४ सप्टेंबर २०२०, शुक्रवार
*वेळ* : सकाळी १० ते २ पर्यंत
*ठिकाण* : आयुश वारली चित्रकला केंद्र खंबाळे, 
बिरसा मुंडा हाऊस शेजारी, ता डहाणू, जि पालघर 
*नकाशा* : 📍 https://g.page/Warlipaintingkhambale?share (कृपया रेट आणि रिव्हिव्ह लिहा, शेअर करा)

▪️  *कलाकारांसाठी उपलब्ध सेवा* 
1. *हस्तकला ओळखपत्र* नोंदणी, वितरण
2. भौगोलिक उपदर्शनी नोंद प्रक्रिया विषयी माहिती
३. हस्तकला विकास योजनांविषयी माहिती 
४. इ कॉमर्स / *GeM पोर्टल नोंदणी* विषयी माहिती 
५. *हस्तकला हेल्पलाईन* बद्दल जागरूकता (१८०० २०८ ४८००)
६. कलाकारांसाठी DBT, शैक्षणिक सुविधा, इत्तर *योजनांची माहिती*  
७. *मुद्रा कर्ज* योजनेचे अर्ज नोंदणी, इत्यादी 
८. शासकीय योजनेचा लाभ घेताना कलाकारांना येणाऱ्या अडचणी अनुभव, इत्तर सूचना  *(कलाकारांकडून माहिती अपेक्षित)* #

▪️ *आयोजक* : DC (Handicrafts), 
                             Ministry of Textiles

▪️ *आवश्यक कागदपत्र* (*) 📎
1. आधार कार्ड*
२. दोन फोटो*
३. पासबुक पहिले पान झेरॉक्स*
४. पॅन कार्ड (मुद्रा लोन साठी)
५. जातीचा दाखला 
 
*सूचना* : (सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी) ⚠️
- शिबिरात प्रत्येकांनी मास्क, भौतिक अंतर चे नियम पाळावे 
- ताप/सर्दी/खोकल्याची लक्षण असल्यास शिबिरास येणे टाळावे.
- काही कारणाने येणे शक्य नसल्यास समन्वयकांना आवश्यक कागदपत्रे जमा करावी  

चलो कल्पकता आणि हस्तकला माध्यमातून *आदिवासी संस्कृती जतन सोबत आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. 
जोहार!

......................................................................
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
Reply all
Reply to author
Forward
0 new messages