_आदिवासी कलाकार आपल्या कल्पक कलाकृतींच्या माध्यमातून विविध *सामाजिक विषयावर चर्चा आणि संवाद घडवून आणू शकतात.* तसेच आदिवासी जीवनमूल्याबद्दल नवीन पिढीला जागरूक करू शकतात._
_आणि समाज म्हणून जिथे जिथे आदिवासी कलाकरांना *अडचणी येतात तिथे समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहून आधार देऊ शकतो.* तसेच आदिवासी कलावस्तू माध्यमातून इको सिस्टम तयार करून *आदिवासीत्व जतन करत समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाला* हातभार लावू शकतो._
...............................................................
💡[ *समाज म्हणून उपाय शोधायला हवा!*]
उदाहरण घ्या, वारली चित्रकला. विविध माध्यमातून खूप प्रसिद्ध, शासकीय पातळीवर पण विशेष प्रसिद्धी. पण आज या संस्कृतीशी काहीही संबंध नसलेले अनेक बिगर आदिवासी विविध माध्यमातून आर्थिक लाभ घेत आहेत. आणि अनेक आदिवासी कलाकार मोबदल्याची खात्री नाही म्हणून कलाकारी सोडून इत्तर कामाकडे वळत आहे. *संदीप दा भोईर यांची लोकमत वरची बातमी* [
https://www.facebook.com/share/v/8yrt26xmWPHLGZak/?mibextid=jmPrMh ]
या विषयी शासनाची धोरणे/योजना/उपक्रम पूरक आणि कलाकारांच्या अपेक्षेप्रमाणे हवेत. आदिवासी कलाकार, आदिवासी गट, आदिवासी संस्था, आदिवासी उपक्रम यांना प्रोत्साहन देऊन अनेक रचनात्मक उपक्रमांची बांधणी व्हायला हवी. पण दुर्दैवाने सामाजिक संस्था म्हणून प्रत्येक्ष अनुभव तसा नाही. *असो जो पर्यंत जमतेय तो पर्यंत प्रयत्न करत राहू.*
समाज म्हणून आपण एकत्र प्रयत्न केल्यास ते प्रभावी राहील, व्यवस्थेत संवेदनाशीलता तयार करता येईल. let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व जोहार!
...............................................................
▪️आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम▪️
[समाज+कलाकार+स्वयंसेवक+CSR+ योजना]