|| वैयक्तिक अनुभव :*한국에서의 두 번째 주* ||
▪️[स्थानिक *आदिवासी भाषा* : निहरी]
कोरियन मानसा गोठी करीत त एक मस्त वाटलां, एक माणूस बोल का बीजी सगला आयकत, त्याचा खपलां का मंगा बिजा बोल. एकमेकांचा सगला आयकून घेत ना मंगा एक एक करून त्यांचा बोलत. भारतात माझा अनुभव बेस नीही या बद्दल, एक बोलाय लागला का बिजा मध्ययूच बोल, त्याचा खपायचे पहले. समोर चा माणूस काय बोल त्या समजून घेन्या पेक्षा सवताच खपवायचा रेहे. जाउंदेस बेस रेहा.
▪️[साधारण *मराठी भोली* भाषा]
नवीन टेक्नॉलॉजी बद्दल च्या प्राथमिक चर्चेसाठी काल सप्लायर प्लांट मध्ये गेलेलो. तिथे सस्पेन्सशन साठी स्प्रिंग, स्टॅबिलाझेशन बार इत्यादी बनविले जात होते. लोखंडाच्या रॉड अपेक्षित आकारात कापून, हॉट फॉर्मिंग पद्धतीने विशिष्ट आकार देऊन पिअर्सिंग/पंचिंग, हिट ट्रीटमेंट, इन्स्पेक्शन, रंग, पॅकिंग इत्यादी नियोजित पद्धतीने होत होते. त्या त्या पायरीवर अपेक्षित काम वेवस्तीत होते त्याची खात्री केली जात होती. आणि त्याची ठरलेली प्रोसेस होती, कदाचित शिफ्ट बदलली तेथील माणूस बदलला तरी प्रॉडक्ट च्या क्वालिटी वर फरक नाही पडत. अपेक्षित स्प्रिंग चे काम करण्यासाठी लागणारे सगळे इनपुट्स या प्रोसेस माध्यमातून दिले जातात.
▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡
सध्याच्या आणि भविष्यातील आव्हानात्मक परिस्थितीत स्वावलंबी आयुष्यासाठी आवश्यक नेतृत्व/कौशल्य/मूल्य/संस्कार आपल्या युवा पिढीत/समाजात आणण्यासाठी समाजातून प्रयत्न व्हायला हवेत.
एक उदाहरण घेऊया आपल्या आश्रम शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा. भविष्यातील स्पार्धात्मक परिस्थितीत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी (नोकरी/व्यवसाय/सेवा/शेती इत्यादी) येथील *विद्यार्थ्यांची आवश्यक मूलभूत तयारी होत असेल?* तिथे मिळत असलेले वातावरण/शिस्त/कौशल्य/ज्ञान *स्पर्धेत टिकण्यासाठी पुरेसे आहे?* भविष्यात समजा बद्दल ची संवेदना/संस्कार/सांस्कृतिक ओळख *टिकेल?*
आदिवासी समाजाची पिढी या ठिकाणी घडते आहे तिथे *सुशिक्षित पिढीची मोठी गुंतवणूक/लक्ष/हातभार असायला हवे.* नाही तर विविध विचार सरणीचे चष्मे देणारे, त्या विचार सरणीचे कार्यकते निर्माण करणारे अनेक उपक्रम आहेतच. पण *समाजाशी प्रामाणिक नेतृत्वाची फळी उभे करण्यासाठी समाजाची स्वावलंबी व्यवस्था हवी.* तुम्हाला काय वाटते, या विषयावर चर्चा करायला आवडेल. Let’s do it together! जोहार
..................................................................
[ सप्तगिरी संकर उलका, MP कोरापूत - ओडिशा. त्यांच्या जमातीतील पहिले कंप्युटर इंजिनिअर जल जंगल जमीन बद्दल लोकसभेतील स्पीच नक्कीच ऐकावे एकदा
https://youtu.be/bBzjoOGX_EU १४.३५ मिन, हिंदी]