वयक्तिक अनुभव : *महना झाला कोरियात*

1 view
Skip to first unread message
Assigned to ay...@adiyuva.in by me

SACHiNe SATVi

unread,
May 13, 2019, 6:02:45 AM5/13/19
to AYUSH group
वयक्तिक अनुभव : *महना झाला कोरियात*

[ *स्थानिक आदिवासी भाषा* ]
_ये वेलस कोरियातले गावात रेहून नांगु असा करून नामयान्ग ला रेहेतूं. खोली हो बेस आहे. आजूबाजूला झाडां आहांत, शेत आहे, डोंगरी आहे. शेतात काम करणारी माणसां दिसत, नांगतूच रेहे त्यांना. कव्हां कव्हां मस्त पाखरां येत आरडत आरडत. डोंगरी तोडून ना मोठा रस्ता बांधाया घीदेल आहे, बठीच जोढी जमीन लाग तोढीच काहडेल. बाजूचे झाडाला हात हो नीही लावेल. ना ये जागेतला ऐकून एक झाड बठाच उचलून बीजेकडे नेन लावेल. गायचेन बांधकाम करताना हो एकदम पडदं लावून घिजत आवाज, धूल नीही जाया पायाज तय. आजू बाजूला नांगसील त काहीच व्याट नीही करेल._

_जव्हां वेल मिल तंव्हा ओगाच नंगातूच रेहे त्यांना काय करीत कसाक करीत. डंफरातसी माती निज तंव्हा हो फडक्याखाल ढाकुन निजं. झाडां हो बठालीच मुलांचे हारी माती सकट किरनाखाल हुचलून टरकात ठेवीत. त्याला लागाया नाय पायाज त फांद्या चे आजूबाजूला दोऱ्या बांधीत. पालवी पाडाय नीही पायज त त्यालाहो जाला दसां लावून ठेवीत, ना बिजेंकडे नेण बाठीच लावीत. ओढी कालजी दसी करीत. भलता वखत ताव नंगातूच होतुं त्यांची जुगुत. असा हो नीही का त्यांचेकड झाडा नीही, भलती झाडा, आखा डोंगरी, मैदाना झाडाखाल भरेल. तर्ही हो भलती कालजी करीत. डोक्यात भारतातला विचार आला ना जड दसां झालां डोका, ओग्यानूच आलू खोलेत ना बसून रेहलू._  

[ *साधी मराठी* ]
एक महिना झाला कोरियात येऊन. या यावेळेस येथील ग्रामीण जीवन अनुभवावे यासाठी नामयान्ग या ठिकाणी राहतो आहे. माझ्या खोलीच्या खिडकीतून खूप छान डोंगराचे दृश्य दिसते. पक्ष्यांची बरीच वर्दळ आहे, जवळच शेत आहे तिथे शेतीची काम करताना शेतकरी दिसतात. भौतिक विकासाला पर्याय नाही, येथे हि सुरु आहे खूप मोठ्या वेगाने. तिथून मोठा रस्ता बांधत आहेत, त्यांना लागणारा ठराविक भाग डोंगरातून त्यांनी खोदून काढला आहे, पण ते करताना शेजारील एक फूट अंतरावरच्या जमिनीला काहीही धक्का/हानी झालेली दिसली नाही. कुठेच सिमेंट/प्लास्टिक चे अर्धवट/टाकलेले भाग दिसले नाही.

या बांधकामात येणारे वृक्ष पण मूळ आणि सोबत असलेल्या माती सकट खूप अलगद क्रेन ने ट्रक मध्ये वेवस्तीत बांधून दुसरी कडे नेवून लावताना दिसले. साधी माती दगड ट्रक मधून नेताना पूर्ण कापडाने गुंडाळून नेत होते जेणेकरून माती उडणार नाही/रस्त्यावर पडणार नाही. गेल्या रविवारी सोल (कोरियाची राजधानी) शहरात वाहणाऱ्या नाल्या लागत सहज फेर फटका मारावा म्हणून ५ किमी चालत होतो. खूप चांगल्या पद्धतीने नाल्याच्या दोन्ही बाजूने चालण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी, बसण्यासाठी विशेष सोय केलेली दिसली. पाणी अगदी नितळ वाहत होते, त्यात अनेक मासे होते, पक्षी होते, हिरवळ होती. असो बारीक सारीक खूप निरीक्षणे आहेत, सगळे लिहणे शक्य नाही. पण *त्यांच्या सहज वागण्यात/विकासाच्या वेगात/देशाच्या प्रगतीत निसर्ग/पर्यावरण याला जपून घेण्याची भावना अनुभवायला मिळते.* यातील काही फोटो स्टेटस वर बघू शकता.

*आपला भारताचा विचार केला तर मन सुन्न होते.* "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे" फक्त पुस्तकातच असावे कदाचित. नदी ची पूजा करणारी संस्कृती म्हणे आपली. कोणत्याही शहरात/जवळून वाहणाऱ्या नदी ची अवस्था बघवत नाही. जल जंगल जमीन आणि जैव वैविध्यता तर जशी फ्री लॉटरी असल्या प्रमाणे मर्जीतल्या उद्योजकांना ठेवलेले आंदन. *हजारो वर्षांपासून पर्यावरण जतन करत राहणाऱ्या आदिवासींना मात्र वास्तव्याचे पुरावे मागली जातात, जंगले खाली करून पाहिजेत असावीत* त्यांना. का असे होत असावे?

[ *दोन शब्द सामाजिक* ]
सध्या आपल्याना गांभीर्याने विचार करणे गरजेचे वाटते. भले आपली सांस्कृतिक मूल्य/पारंपरिक ज्ञान खूप महत्वाचे आहे, मूल्यवान आहे. सध्या आपण प्रत्येक्ष आचरणात काय आणतो आहोत? भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल असेल हे पण महत्वाचे आहे. काळ वेळे प्रमाणे अनेक गोष्टी बदलत राहतील, काळानुरूप बदलणे निसर्ग नियमच आहे. आवश्यक तो बदल करून आपली मूल्य जतन व्हावी जेणेकरून संपूर्ण मानव जमात, जीव श्रुष्टि, पर्यावरण, जल जंगल जमीन आनंदाने गुण्या गोविंदाने राहू शकतील. हा एक आदर्श मार्ग म्हणून सगळे जग आशेने बघत आहे.

आणि त्यासाठी खूप दूर जायची गरज नाही, आपल्या आदिवासी मूल्यांतुन ती ऊर्जा अनादी काळापासून मिळते आहे.

*सध्याच्या वेगाने बदलत्या काळात, ती मूल्य टिकवणे शक्य आहे का? कशी टिकवावी?*

तुम्हाला काय वाटते लिहावे. जोहार !

mangeshsingh _Solankey Rashtriy Gadilohar Mahasabha

unread,
May 13, 2019, 6:05:27 AM5/13/19
to adi...@googlegroups.com
Supper

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgbLsBMW8OWZ_-RMx7kMdXnWqbG%3Do6Y1eaTo79Y9u7-6XA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages