|| *वारली चित्रकला उपक्रम माहिती* : १७/९/१९ ||
१) *UNDP प्रतिनिधी कला केंद्र भेट* :
UNDP (United Nations Development Program) प्रतिनिधी १० सप्टेंबर रोजी आयुश कला केंद्र खंबाळे येथील कार्यालयात भेट देऊन सध्याच्या वारली चित्रकला उपक्रमांविषयी माहिती समजून घेतली. त्यांना डॉ सुनिल दा पऱ्हाड आणि समन्वयकांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
२) *UNDP प्रतिनिधी चर्चा* :
मुंबई, गोरेगाव येथे १४सप्टेंबर रोजी UNDP (United Nations Development Program) चे महाराष्ट्र राज्य स्टेट प्रोजेक्ट ऑफिसर, लायिवलीहूड ऑफिसर, कन्व्हर्जन्स ऑफिसर, ऍक्सेस संस्थे चे फील्ड ऑफिसर, आणि LTPCT चे सचिव यांच्या सोबत त्यांच्या तलासरीतील उद्यम तर्फे वारली चित्रकला उपक्रमात कोलॅबरेशन विषयी प्राथमिक चर्चा करण्यात आली. आयुश तर्फे सचिन दा सातवी आणि चेतन दा गुराडा यांनी चर्चेत भाग घेतला.
३) *दिल्ली हाट प्रदर्शन* :
दिल्ली येथे भौगोलिक उपदर्शनी प्रदर्शनात १५ दिवस साठी २ स्टॉल मिळाले होते. यात कल्पेश दा गोवारी, रोशन दा गवळी, अशोक दा घाटाळ, संदेश दा गोवारी सहभागी झाले होते. आज दिल्ली येथून परत घरी पोचत आहेत.
……………………………………………………...........
चलो विविध माध्यमातून स्वावलंबी आदिवासी अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी हातभार लावूया. Lets do it together!
जल जंगल जमीन जीव जोहार !
__________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम