।। आयुश उपक्रम माहिती ३ सप्टेंबर २०१८।।
आपल्या माहितीसाठी
*१) प्रोग्रॅम आणि प्रोजेकट प्लॅनिंग प्रशिक्षण*
कर्वे इंस्टिट्यूट ऑफ सोशियल सर्व्हिस आणि माझगांव डॉक शिपबिल्डर्स सी एस आर मार्फत NGO कपॅसिटी बिल्डिंग उपक्रमा मार्फत शहापूर येथे १ आणि २ सप्टेंबर अशे २ दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले होते. आयुश मार्फत विपुल दा भरसट सहभागी झाले होते.
*२) आर्ट बेस्ड एन्टरप्रायझेस ची ऍडिशनला डेव्हलपमेंट कमिशनर सोबत मिटिंग*
Stakeholders Meeting with Additional Development Commissioner at MSME-DI, Mumbai.
कलाकृतींच्या उद्यमी सोबत MSME, Government of India चे एडिशनल कमिशनर शंतनू मित्रा यांच्या सोबत ४/९/२०१८ MSME डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट मुंबई येथे मीटिंग आहे. आयुश टीम तर्फे चेतन दा गुराडा सहभागी होत आहेत. आदिवासी कला, वारली चित्रकला आणि संबंधित सोशियल इंटरप्रेनरशिप मॉडेल, कलाकारांच्या अडचणी अपेक्षा, या क्षेत्रातल्या अडचणी, पुढील दिशा, वारली चित्र पायरसी, आदिवासींत उद्यमशीलता वाढविण्यासाठी MSME कडून संभाव्य सहकार्य इत्यादी विषयावर चेतन दा प्रेझेन्टेशन देतील.
आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू, पर्यायी व्यवस्था मजबुतीकरणा चा प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक *उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे*.
जल जंगल जमीन जीव सोबत आपली स्वायत्त आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत करूया.
*आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया*.
Lets do it together!
जोहार !
आयुश । आदिवासी युवा शक्ती