You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to adi...@googlegroups.com
खरच तुम्ही आदिवासी आहात ? कि फक्त सवलती पुरते? कि फक्त प्रमाण पत्रासाठी
या मातीतील आम्ही आदिवासी, म्हणजे पूर्वी पासून राहत असलेली निवासी ….
येथील पारंपारिक ग्रंथात आदिवासींचा उल्लेख नाही, इतिहासात उल्लेख हि नाही.
कहर म्हणजे स्वतंत्र भारताच्या संविधानात "आदिवासी" शब्दच नाही. शालेय
अभ्यासक्रमात आदिवासी परंपरा आणि संस्कृती नाही. आदिवासी समाजाचे पारंपारिक
ज्ञान आणि सांस्कृतिक ओळख ठराविक पद्धतीने नष्ट होते आहे. आदिवासी बोली
भाषा तर शेवटचा श्वास घेत आहेत. आदिवासी बहुल भागात हि सगळ्या
जमिनी बिगर आदिवासींच्या नावावर. सगळे व्यवसाय आणि रोजगार बिगर
आदिवासींच्या हातात. आश्रम शाळा आदिवासी हिता साठी नसून बिगर आदिवासी
अधिकार विकास साठी. आदिवासी समाजाच्या चळवळी आणि संघटना राजकीय स्वार्थ
साठीचे दुकाने. आदिवासी राजकारणी म्हणजे राखीव जागामुळे नाईलाजाने बसवलेले
मुके बाहुले. आणि आता तर आम्ही मूळ मूळ म्हणून बिगर आदिवासींच्या संघटना
आदिवासींना धडे शिकवत आहेत. सरकारी नोकऱ्या बोगस आदिवासींनी पळवल्या. आता
आदिवासींची जमात चोरी होतेय. संयुक्त राष्ट्रात भारत काधी बोलातो आमच्या
देशात आदिवासीच नाही कधी बोलतो ये देशातले सगळे आदिवासी आहेत. आम्हाला
आदिवासी संस्कृती आणि इतिहासा पासून ठराविक पद्धतीने लांब नेवून याचा जय
आणि त्याचा जय (सगळे बिगर आदिवासी) करवले जाते आहे…. अजून काय काय बघायला
मिळेल कोण जाणे… संपवून टाका हा आदिवासी नावाचा प्राणी आणि घेवुन टाका सगळी
सम्पती (जमीन / जंगल / खनिज / वायू / इ) असे हि एक एक करून नक्षलवादी
सांगून संपवत आहातच… आता कुठे पेसा कायद्याची ची अंमलबजावणी आणि स्थानिक
नोकर भरती (फक्त क आणि ड वर्ग) अंमलबजावणी ची घोषणा केली तर काय यांच्या
पोटात कळा आल्या … हजारो वर्ष पासून आदिवासींनी खूप सहन केलेय, आणि अजून हि
करतो आहे. पण आदिवासींचा या सहनशीलतेचा अंत बघू नये. आदिवासी संस्कृती आणि
परंपरा या जगाला उत्कृष्ट उदाहरण आहे जर निसर्ग वाचवायचा,
बायोदायवार्सिती, शांतात, एकात्मता आणि समानता याचे उदाहरण आहे. पण जावूदेत
आज तर आदिवासी स्वतः पण आदिवासी संस्कृती विसरतोय याहून दुर्दैव ते काय…
जरूर शांत राहून विचार करावा. आपण कोणते आदिवासी आहात ? प्रमाणपत्र वाले ?
सवलती वाले? नोकरीवाले? राखीव जगावाले ? …. कि आदिवासी संस्कृती जतन करून
आदिवासी परंपरा पुढच्या पिढीत रुजवून आदिवासी एकात्मते साठी प्रयत्न
करणारे? www.jago.adiyuva.in
AYUSH Adivasi Yuva Shakti
unread,
Sep 22, 2014, 1:59:20 PM9/22/14
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message