|| वैयक्तिक अनुभव : *महत्वाचे सर्वेक्षण* ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
May 20, 2022, 10:58:14 PM5/20/22
to AYUSH google group
|| वैयक्तिक अनुभव : *महत्वाचे सर्वेक्षण* ||

▪️[ *आदिवासी बोली भाषा*: निहरी]
चिखल्यात दिव्यांचे लग्नात जाधेल. एक फार बेस वाटलां त्यांहीं रितीन *धवलेरी चे हातसीं लगीन लावून घेतलां.* मांडवात मायिक वर धवलेरी चा आवाज ना चावूल कव्हां टाकीत त्यां जराक नवा वाटलावां त सगलीं माणसां बेसकरून आयकत ना नांगत. आपल्याच रिती,आपलॆच बोलीतलीं गाणीं मस्त वाटत. वाघाडच्या धवलेरीन वाहरेल होत्या, ओढें दुरसीं तऱ्हीं धवलेरीन आणून त्यांचेकडसीं लगीन लावला त्यासाठी सासर वाडीचे *दिव्यांचे कौतुक.*
 
माझे लग्नाला १० वरसां झालीं, ते वेलस मेहयान हट करून काही वेगलां कराया गेलुं ना नेमका लगीन रीत चुकवून रेहलुंतुं. 😌

▪️[साधी *मराठी बोली*]
अनेक गावात सध्या धवलेरी/सोवासीन/सोयीन/तारपकरी/भगत मिळत नाही किंवा आहेत त्यांचे काम पुढे नेण्यासाठी पुढची फळी आश्वासक वाटत नाही. यांची *मूळ कारणे शोधून त्यानुसार उपाय योजना* करणे गरजेचे आहे. आवश्यक *नियोजन समाजातून व्हावे यासाठी आपल्या माहितीत पारंपरिक काम करणारी व्यक्ती असल्यास जरूर नोंद करावी,* आपल्या संपर्कात शेअर करून नोंद करायला सांगावे. www.parampara.adiyuva.in कींवा https://forms.gle/CdRZnrukKafBAL566

▪️[दोन शब्द *सामाजिक*]
मानवाच्या, विज्ञानाच्या, पर्यावरणाच्या, देशाच्या, राज्याच्या, जमातीच्या, कटुंबाच्या, किंवा संस्कृती आणि परंपरा च्या जडणघडणीत वेग वेगळे पर्व येतात. वेग वेगळ्या गतीने काळ वेळेनुसार अनुकूल बदल होत राहतात आणि ते होत राहतील, हा निसर्ग नियम आहे. हे होत असताना *आपले स्वावलंबन आणि आदिवासी मूल्य जतन करण्यासाठी हातभार लावूया.*

त्या त्या वेळेस जे महत्वाचे आहे त्यासाठी आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी *आवश्यक जागरूकता/उपाययोजना/व्यवस्था समजातून उभी केल्यास,* आदिवासी समाजाचे स्वावलंबनासाठी प्रभावीपणे हातभार लागू शकेल. चलो त्या दिशेने प्रयत्न करूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages