|| वैयक्तिक: *शाळा, अपेक्षा आणि भविष्य*||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Oct 23, 2021, 3:01:12 PM10/23/21
to AYUSH google group
|| वैयक्तिक: *शाळा, अपेक्षा आणि भविष्य*|| 

▪️[ *आदिवासी* बोली भाषा]
बारींक होतुं तंव्हा सालतं पहले सेंगदानं ना खडीसाखर दीजं, जेवण, सामान, पाटलुंग, बंडी दिया लागलीं. साला सगल्या हलूं हलूं चमकाया लागल्या. पन सालतलीं पोरां म्होटीं होन काय करीत होवीं त्या नांगजास हाव. बेस रेहजा.    

▪️[साधारण *मराठी* ]
ह्युंदाई मोटर R&D ऑफिसच्या रेगुलर कामासोबत CSR वर्किंग टिम चे दायित्व माझ्याकडे आहे. CSR माध्यमातून सहकार्य केलेल्या दोन शाळांना काल सहजच परीक्षणाकरीता भेट दिली.

हैदराबाद-जियागुडा येथील मराठी माध्यमाच्या शासकीय शाळेत, इमारत खूप मोडकळीस आलेली, उदासीन वातावरण, शिक्षक, पुस्तके, शैक्षणिक साधन साहित्य, भौतिक सुविधा नाही इत्यादी. परंतु गेल्या २ वर्षात CSR सहकार्याने खूप सकारात्मक बदल होतो आहे. या शाळेत पूर्वी पटसंख्या ५० होती ती सध्या १५० झाली आहे. विद्यार्थी, कर्मचारी, पालकांमध्ये खूप उत्साह आणि आनंद दिसला.

▪️[दोन शब्द *सामाजिक* ]
आदिवासी समाजासाठी आश्रम शाळा पाठीचा कणा आहे. येथे होणारी कौशल्य, क्षमता, बौद्धिक, भौतिक, आर्थिक गुंतवणुकीवर पुढील पिढीचे भविष्य अवलंबून आहे. पूर्वी पेक्षा शाळांची संख्या, कर्मचारी, इमारती आणि साहित्य, शाळांचे बाह्यरूप काही प्रमाणात बदलले गेले असले तरी आता मुख्य मुद्दा आहे कि येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करून टार्गेट ठरवणे गरजेचे आहे.

💡 उदा. टार्गेट : *आश्रम शाळा विद्यार्थी*
*पायरी १:* व्यावसायिक शिक्षणात किती प्रमाणात यशस्वी होतात? (वर्ग १, २ अधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, वैज्ञानिक, व्यावसायिक, उद्योजक, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, इत्यादी)

*पायरी २:* अपेक्षित कार्यक्षमतेने व्यावसायिक क्षेत्रात किती प्रमाणात यशस्वी होतात? 

*पायरी ३:* आपले वयक्तिक व्यवसाय व्यतिरिक्त, सामाजिक दायित्व म्हणून किती प्रमाणात उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात?

*पायरी ४:* किती प्रमाणात सामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे? आदिवासी समाजहितासाठी कामी येतात का? 

असे लक्षांक ठेवून *अकाऊंटंबिलिटी ठरवून आदिवासी विकास विभागाचा अर्थसंकल्प आणि मूल्यांकन आराखड्यासोबत आवश्यक उपक्रम राबविले* गेल्यास समाजाप्रती *कर्तव्यांची जाणीव असलेले तसेच वैयक्तिक व्यवसायात पण यशस्वी* होण्यासाठीची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केल्यास येणाऱ्या पिढीवर याचा चांगला प्रभाव पडू शकेल असे वाटते. *तुम्हाला काय वाटते नक्कीच कळवावे.*🙏🏻 Let's do it together! जल जंगल जमीन जीव.. आदिवासीत्व. जोहार!
...........................................................
माहितीपट पहा (हिंदी, 27 minutes)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages