|| आयुश नोंदणीकृत कलाकारांसाठी सुचना ||

8 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Apr 21, 2020, 1:52:16 PM4/21/20
to AYUSH | Adivasi Yuva Shakti
|| आयुश नोंदणीकृत कलाकारांसाठी सुचना ||

सगळ्यांना विनंती आहे कि वेळोवेळी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. गावाबाहेर जाऊ नये, प्रवास टाळावा. काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांची
…………………………………………………………………
कलाकारांना सप्पोर्ट म्हणून सध्या आपण एक नवीन उपक्रम सुरु करत आहोत, तुम्ही ज्या ज्या कलावस्तू निर्मिती कराल किंवा तयार असतील त्या आयुश तर्फे खरेदी केल्या जातील. त्यातून तुमच्या परिवाराला आर्थिक सहकार्य होऊ शकेल. 

💡 अपेक्षित कलाकृती : चित्र, पारंपारिक कलावस्तू, सोंग, मातीच्या / बांबूच्या / कापडाच्या / लाकडाच्या / गवताच्या /पात्याच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, संगीत साहित्य, गलोल, पारंपारिक खेळणी (विटी दांडू, लगोरी, बाहोली, इ), इत्यादी  

तुम्ही, कुटुंबातील किंवा संपर्कातील कुणी करण्यास इच्छुक असल्यास कालावस्तूंचे नाव/सॅम्पल फोटो आणि सविस्तर माहिती आयुश समानव्यकांना पाठवावी. त्या प्रमाणे तपासून तुमच्यासाठी पुढील ३ महिन्यासाठी खात्रीशीर ऑर्डर देण्यात येईल.

या संदर्भात कलाकृती निर्मिती साठी लागणारा कच्चा माल नसल्यास, आवश्यक कच्चामाल आयुश तर्फे पुरविण्याची सोय केली जाईल. तशी आवश्यक यादी (कच्चा मालाचे नाव, संख्या, अंदाजे किंमत, मिळण्याचे ठिकाण, संपर्क असल्यास, इत्यादी) समन्वयकांना जमा करावी. त्यानुसार आवश्यक कच्चामाल पुरविण्यात येईल.

आणखीन काही चांगली आयडिया असल्यास ग्रुप वर चर्चा करुया. तुमच्या मेहनत आणि कुशलता गुंतवणुकीची जबाबदारी आयुश घेईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी नसावी. स्वावलंबी अर्थव्यवस्था उभारणीसाठी आदिवासी कलेतून हातभार लावूया. Lets do it together. जल जंगल जमिन जीव...जोहार !
______________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
सहकार्य:TDD(GoM)+TRIFED(GoI)+CSR+समाज
सहभाग नोंदणी अर्ज : kala.adiyuva.in


Reply all
Reply to author
Forward
0 new messages