बांधावरचे, ग्रेट माझे देव !!

20 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Mar 19, 2016, 5:02:52 AM3/19/16
to AYUSH | adivasi yuva shakti

बांधावरचे, ग्रेट माझे देव !!

असाच फिरत असताना खरतर देवदर्शनासाठी फिरत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या...आणि अचानक मला माझ्या शेताच्या बांधावरचे देव ग्रेट वाटायला लागले.
म्हणजे आमच्या बांधावरचे देव मी वर्षानुवर्षे पाहतोय पण कुठल्याच
देवापुढ मला दानपेटी दिसली नाही. मुळात त्याची गरजच पडली नाही.
त्या सगळ्या म्हसोबा, मावलाया, बिरोबा, भोपळीतला देव, आंब्याखालचा देव, पिर बाबा, तोरण्या देव, वाघोबा आणि काय काय यांना कुठलीच ट्रस्ट तयार करायची नव्हती किंवा यूनियनही बनवायची नव्हती.

तेहतिस कोटि देवांमधे याना स्थान आहे की नाही माहीत नाही. ते महत्वाचही वाटत नाही.आणि कुठल्याच देवाला महागडी फूल, हार,परडी अस काही हव नसत. नवीन घर बांधताना ह्या देवांच कीटही घ्याव लागत नाही किवा ती घराची पूजा करण्यासाठी तो सो कॉल्ड थोर व्यक्तिही येत नाही.आमचे हे गरीब बिचारे देव त्यांना साध स्वतःच मन्दिर असाव अशीही अपेक्षा ठेवत नाहीत. ते आपले मस्त झाडाखाली राहतात वर्षानुवर्षे.

कोणीतरी सनावाराला नारळ फोड़तो त्यातले पाच कुटके देवापुढे ठेवतो
बाकिचा नारळ फोड़नारा खातो. नवीन पिक आल की कणिसाचा निवद देवाला जातो. कुठल्या सणाला पुरणपोळी तर पित्राला खीर अशी कधीकधी मेजवानी मिळते, काही देवाना नॉनवेज वगैरे चालत तर काहीना नाही. असे लोकांनूसार बदलणारे देव. आमच्या देवाला असच लागत अशी कोणी अपेक्षा ठेवत नाही किंवा देवही ! आमच्या देवांची भूपाळी ,शेजारती,धूपारती अस काहि होत नाही आणि तितके लाडही आमच्या देवाचे पुरवले जात नाही.

ज्या निरपेक्ष भावाने आम्ही सगळे शेती करतो त्याच भावाने हे देवही आमच्यासोबत राहतात. जनुकाही ‘काम हेच आपला देव’ ही शिकवण त्यानी दिली आहे - copied




आदिवासी जल, जमिन, जंगलाचे रक्षक आणि आदिम अस्तित्वाचे साक्षीदार आमचे देव।।

Reply all
Reply to author
Forward
0 new messages