|| *माहितीसाठी : ३०० राशन किट वाटप* ||

7 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
May 27, 2020, 12:12:28 AM5/27/20
to AYUSH google group
|| *माहितीसाठी : ३०० राशन किट वाटप* ||

ट्रायफेड (TRIFED - Tribal Cooperative Marketing Development Federation of India) कडून ८० कुटुंबाना रेशन ची मदत मिळण्याचे आश्वासन मिळाल्यावर आपण २०एप्रिल ला अत्यंत गरजूंची यादी आधार कार्ड क्रमांक सोबत बनविण्याची विनंती केली होती, २ दिवसात ८९६ जणांची नावे मिळाली. (यावरून अंदाज लावावा - पेपर/प्रसिद्धी मध्ये न येणारे स्थानिकांचे दुःख)

इतकी मोठी संख्या असल्याने आदिवासी विकास विभागाला यादी जमा करून मदतीसाठी विनंती केली, संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून सगळ्या गरजूंना मदत केली जात आहे असे सचिवालयातून कळविण्यात आले.

*ट्रायफेड ला विशेष विनंती करून मंजूर केलेले ३०० राशन किट्स* (तांदूळ, पीठ, डाळ, मसाले, तेल, साबण, इत्यादी) काल २१मे रोजी पनवेल येथून वाघाडी येथे आणले आहेत. *आधार क्रमांक सोबत प्राप्त यादीनुसार आज आणि उद्या संबंधितांना समन्वयक आणि स्वयंसेवक मार्फत वितरित करण्यात येतील.* या कामी प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी सगळ्यांचे आभार आणि जोहार!

_*COVID १९ दरम्यान नुकसान/त्रास/हानी लक्षात घेता समाजाच्या आर्थिक स्वावलंबसाठी आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे वाटते. शेती/वनोपज/ज्ञान इत्यादी माध्यमातून सस्टेनेबल पर्याय तयार करूया. जल जंगल जमीन जीव जतन करून आदिवासीत्व जिवंत ठेवूया.*_ Let’s do it together! जोहार
_______________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
Reply all
Reply to author
Forward
0 new messages