|| वैयक्तिक अनुभव : *बेस मत देन इजास* ||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
May 14, 2024, 9:51:25 PM5/14/24
to AYUSH google group
|| वैयक्तिक अनुभव : *बेस मत देन इजास* ||

▪️[ *आदिवासी बोली* भाषा : निहरी]
_काल हाफिसात सुट्टी होतीं मतदान करायची. आपलेकड इयाचे सोमवारी आहे. गायचेन मतदान त कराल, ज्यां बेस काम झलांवा (तुमच्या गावातले/प्रवासातले रस्ते, इमारती, कारखाने, भाषणे, जाहिराती, प्रचार इ), अडचणी होव्यां (दवाखाने, शाळा, शिक्षण, भरती, नोकरी, जमिनी, महागाई, बेरोजगारी, संविधानिक अधिकार, प्रदूषण, हिंसा, भ्रष्ट्राचार, इ), आजू बाजूला काहीं होत हवां त्यां सगलां बेस नांगुन ना निवडालूच. पन ओढ्यावर निहीं चालायचां, *जो कोनीं निवडून येल त्याचेकडसीं जीं काहीं कामां तीं बेस होत का नाय त्यांहो नांगुन करवून घेतां आलीं पाहजत.*_

▪️[साधी *मराठी* भाषा] : 
मतदानाची काल ऑफिस ला सुट्टी होती. इथे हैदराबाद लोकसभा मतदारसंघात अंदाजे १९८४ पासून AIMIM पक्षाचे खासदार निवडून येतात. संसद रत्न तसेच पार्लमेंटरी अवार्ड ने सन्मानित असदुद्दीन ओवेसी येथील सध्याचे खासदार आहेत (२वेळा आमदार आणि ४वेळा खासदार). प्रत्येक विषयवार त्यांची अभ्यासू आणि स्पष्ट भूमिका मांडतात. हैदराबाद मध्ये त्यांनी शैक्षणिक, आरोग्य, संशोधन अशा विविध क्षेत्रात मोठे संस्थात्मक जाळे उभारलेले आहे. अनेक वेळेस *आदिवासी विषयांवर पण राखीव जागांवरील उमेदवारांपेक्षा जास्त स्पष्ट आणि आग्रही भूमिका* घेताना ते दिसतात. 

गावाला पालघर मतदार संघात सध्या राजेंद्र गावित (मूळ नंदुरबार चे) हे खासदार आहेत. पूर्वी काँग्रेस (~१८वर्ष) मध्ये राज्यमंत्री, नंतर भाजप (~१वर्ष), नंतर शिवसेना (~३वर्ष), नंतर शिंदे गट (~१ वर्ष) आणि आता परत भाजप (१आठवडा) असा त्यांचा प्रवास. पूर्वी विद्यार्थी आंदोलने आणि आता राजकारण हाताळण्याची विशेष कला अवगत केलीय. या निवडणुकीत त्यांना तिकीट नाही मिळाले, सगळ्या पक्षांनी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन नवीन चेहऱ्यांना पुढे केले आहे. अपेक्षित *दायित्वाला न्याय देणारा उमेदवार निवडला जावा* हि अपेक्षा.

▪️[दोन शब्द *सामाजिक*]
*अनुसूचित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी कसा असावा?* पॉलिसी मेकिंग च्या ठिकाणी आपली भूमिका काय असावी? आपल्या समाजाचा आवाज कसा असावा? आपल्या अडचणी, संवैधानिक अधिकार, योजना अंमलबजावणी, नवीन योजना यासाठी पाठपुरावा करण्यासाठी लोकांशी प्रत्येक्ष संवाद, अभ्यासपूर्ण माहिती, स्पष्ट आणि आग्रही भूमिका घेणारे असावेत. 

आपल्या लोकप्रतिनिधींनी फक्त पक्ष कृपेवर अवलंबून न राहता *सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्थांचे जाळे उभारून आपल्या समाजाचे नेतृत्व* करायला हवे. पूर्वी खूप चांगल्या पद्धतीने भाई कडू, लहानू कोम यांनी सुरु केलेले थोड्या प्रमाणात चिंतामण वनगा आणि कृष्णा घोडा यांनी सुरवात केली पण त्याची व्यापकता आणि प्रभाव वेळेनुसार कमी होत गेला. 

तुम्हाला काय वाटते? *राखीव जागेवरून येणारे लोकप्रतिनिधींना कसे अधिक सक्षम बनूवले जाऊ  शकते?* किंवा सामाजिक जाणीव आणि समाजाशी *प्रामाणिक असलेल्या नेतृत्वाला पुढे करून संधी देता येऊ शकते?*🤔

abhijit

unread,
May 30, 2024, 3:28:56 AM5/30/24
to adi...@googlegroups.com
खरेच  आदिवासी समाजाला पूर्णपणे न्याय देणारा व त्यांचे प्रश्न समजून घेऊन विधानसभेत लोकसभेत मांडणारा चांगला आमदार खासदार माणूस पाहिजे आदिवासी विकास विभाग म्हणजे सरकारसाठी फक्त मयताच्या टाळूवरचे अधिकचे लोणी आहे असं वाटते कारण आदिवासीं साठी येणार निधी हा कधी तळा गाळापर्यंत पोहोचतच नाही.  देश स्वातंत्र्य होऊन गेले ७६ वर्षे झाले परंतु आजूनही आदिवासींचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत तसेच अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत व जसे कि कुपोषण असेल किंवा लहान वयात लग्न अनेमिक स्त्रिया गरोदर माता आश्रमशाळा प्रश्न रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र ऍम्ब्युलन्स हिरडा भाव सरकारी  योजना अनेक  प्रश्न अन्नुतरीतच आहेत तसेच आरोग्य व शिक्षण या पासून तर आदिवासी हा खूप दूर आहे. सरकारच्या योजना आदिवासी पर्यंत लवकर पोहोचत नाहीत, सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी याना काही घेणं देणं नाही आदिवासी मेला कि जगला याबद्दल काही त्यांना वाटत नाही. संघटना सुद्धा पक्षाच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत, संघटनेत गट तट पडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आपले जमिनी घेऊन आदिवासींच्या तोंडाला पाने पुसत आहेत, बोलन्या सारखं भरपूर आहे. पण या स्पर्धेच्या युगात कुणालाच कुणाचं घेणं देणं नाही. जय आदिवासी 

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1b0dPGOkuJSiDMZwStreEMGkUO2zbjmyqR%2BQHPHV_G%3Dg%40mail.gmail.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages