From: adi...@googlegroups.com [mailto:adi...@googlegroups.com] On Behalf Of AYUSH - adivasi yuva shakti
Sent: 13 October 2011 00:05
To: AYUSH google group; ayus...@googlegroups.com
Cc: 'AYUSH on net'; 'AYUSH yahoo'
Subject: AYUSH | [Discussions] Susari Dharan | सुसरी नदीवर धरण होऊ देणार नाही, होवू देणार नाही !
AYUSH discussion |
This mail is sent to know about discussions |
लोखा सन्गत सान्ग बोलुन बोलुन जस्तिकरुन वेग वेअल्या नविन बाता महित पडत. त मन्गा अपले क्या बर ओगाच रेहायचा? चलो मेल लिहुन लिहुन तरि बोलु ना आपल्या बाता वाढवुत. |
सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती |
सुसरी नदीवर धरण होऊ देणार नाही, होवू देणार नाही जाहीर सभा : ठिकाण कासा केंद्र दिनांक ९ ओक्ट २०११ रोजी सकाळी १० वाजता
Web Page : http://susari-dharan.blogspot.com/ Facebook Page : http://www.facebook.com/susari.dam VDO : http://www.youtube.com/user/adiyuva#grid/user/3F8D2161EBDC5298
सुसरी नदीवर नियोजित धरण प्रस्थावित आहे. या धारणा मुळे मौजे रानशेत, आवढाणी, महालक्ष्मी, धानिवरी , दहीगाव, ओसुर, असरविरा, नवनाथ आणि गनेशबाग (रानशेत) येथील आदिवासींच्या जमिनी व वनजमिनीचे सुमारे १००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या धरणातील ५४ दश लक्ष घनमीटर पाणी पाईप लाईन द्वारे वसई, विरार व नवघर माणिकपूर व नालासोपाऱ्याला नेण्यात येणार आहे. या धरणाला आमचा प्रखर विरोध आहे. आजवर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा सारख्या प्रकल्प द्वारा मुंबई ला पाणी नेण्यात येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाण्याची लुट करण्यात आलेली असून तेथील प्रकल्प ग्रास्तांचे पुनवर्सन झालेले नाही आणि आता मुंबई उपनगरे या भागात राहिलेल्या पाण्याची साधने हडप करू पाहत आहे. यातून आदिवासी साठी काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणूनच आतापर्यंत झाले इतके पुरे झाले, असे सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. या पुढे आदिवासी नियोजनहित नागरीकरणाचा बोजा सहन करणार नाही. दूरवर आदिवासी भागात धरण बांधण्या एवजी वसई तालुक्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर करायला हवा. सिडकोने या साठी कामन, खोळ्सा पाडा, उसगाव, सातिवली, इत्यादी जागा सुचविल्या असून या ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर केला गेल्यास. दर दिवशी १२४ एम एल डी एव्हडे पाणी उपलब्ध होवू शकेल असे म्हटले आहे. सुसरी धरणात मिळणाऱ्या पाण्या पेक्षा हे मिळणारे पाणी किती तरी पटीने अधिक असेल या खेरीज पाईप लाईन तसेच बांधकाम खर्चाचीही बचत होवू शकेल. मात्र ठेकेदारांच्या लॉबीला बळी पडत सरकारने या सुचणे कडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या भागातील काही राजकारणी लोकांनी आदिवासी कल्याणाचा विचार करण्या एवजी या धरणाचे समर्थन करत स्वतःची तुंबडी भरण्याच्या उद्देशाने मागे लागले आहेत. आमच्या नद्याचे पाणी आमच्या मालकीचे आहे त्याच्या वापरावर आमचा अधिकार आहे आम्हालाच जर पिण्या साठी पाणी नाही तर आम्ही येथील पाणी वसई विरार ला का पाठवावे ? आणि त्यात तर शहराच्या मागण्या रोज वाढत आहेत. तसेच शहरी भागात दर माणसी पाण्याचा वापरही जास्त केला जातो. शहराच्या नवीन वसाहतींच्या गरजा भागवण्य साठी अधिका अधिक धरणे बांधली जातील. वसई विरार मधली बिल्डर लॉबीने चालविल्या नियोजनशून्य आणि अनिर्बंधित वाढीमुळे येथे पाण्याची कमतरता भासत राहणार आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी आदिवासींची शेती फुलाविन्या साठी दिले जाणार होते परंतु ठेकेदारांनी पद्धतशीर पणे वसई विरार सारख्या योजना मधून हे पाणी अन्यत्र कसे वळवता येयील हे काम केले आहे. आदिवासी भागाचे वसाहतीकरण आणि त्यांचे पाणी इत्तर साधनांनी लुट या पुढे थांबवा असे सरकारला सांगण्यासाठी कासा येथे एकत्र जमायचे आहे.
सुसरी धरण विरोध संघर्ष समिती अध्यक्ष : श्री नरेश हाल्या बोलाडा उपधक्ष्य : श्री चंदू सोनू वरठा सचिव : श्री देविदास नंदकुमार तल्हा खजिनदार : श्री सुरेश बाबू कडू
# Virtual Tour of Kasa Program # VDO no. # 1 | VDO no. # 2 | VDO no. # 3 | VDO no. # 4 | VDO no. # 5 | VDO no. # 6 | VDO no. # 7 | VDO no. # 8 | VDO no. # 9
|
For source of information, please visit - |
Note - 7. You can submit the AYUSHonline membership form at www.join.adiyuva.in |
MT news - http://origin.maharashtratimes.com/articleshow/10303231.cms
सुसरी धरणाच्या विरोधात मोर्चा
म . टा . वृत्तसेवा पालघर
डहाणू तालुक्यातील आदिवासी खोऱ्यात सुसरी नदीवर धरण बांधून वसई - विरारला पाणी देण्याच्या विरोधात येथील हजारो आदिवासींनी चारोटी जवळील कासा येथे रविवारी प्रचंड मोर्चा काढून विरोध दर्शविला .
' तुमच्या पाण्याची सोय तुमच्याच तालुक्यातून निर्माण करा , आमच्या वाटेला जाल तर याद राखा ', असा जोरदार व खणखणीत हल्ला वसई तालुक्यातील बिल्डर लॉबी तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर चढविला .
मोर्चाकरिता डहाणू तालुक्यातील २० हजारांहून अधिक आदिवासी स्त्री - पुरूष १५ - २० कि . मी . चालत आपल्या लहान मुलासह उपस्थित होते . चारोटी येथेून मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर दोन कि . मी . अंतरावरील कास येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले . डहाणू तालुक्यातील सुसरी नदीच्या सुपीक जमिनीच्या खोऱ्यात धरण बांधून त्यातील पाणी वसई तालुक्यात नेण्याच्या राज्य सरकार व वसईतील बिल्डर लॉबी विरोधात डहाणू तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्वच आदिवासींनी रणशिंग फुंकले असून त्यास आदिवासी लोकप्रतिनीधीदेखील मागे नसल्याचे चित्र मोर्चानंतर झालेल्या भव्य सभेत दिसून आले .
डहाणू तालुक्यातील धानिवरी , नवनाथ , रानशेत , दहीगाव , आंवढाणी , देवूर , महालक्ष्मी , गंजाड , गणेशबाग , ओसरवीरा या गावातील एक हजार हेक्टर जमीन वापरण्यात येऊन तेथील आदिवासी विस्थापित होणार आहेत . या सुसरी धरणाला विरोध करताना संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश बोलाडा यांनी या सेभेत हल्ला चढविताना वसईतील बिल्डरांनी त्यांच्या तालुक्यातील गृहप्रकल्पासाठी २०२१ पर्यंतचा विचार केलेला दिसत असून त्याकरिता त्यांनी इतरांच्या घरातून ओरबाडून खाण्याचा सपाटा लावला आहे . म्हणूनच शेतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या सूर्या धरणाचे सारे पाणी त्यांनी पिऊन टाकले . त्या पाण्याने तहान भागली नाही म्हणून आता सुसरीवर त्यांचा डोळा आहे . मात्र आम्ही आदिवासी निर्वाणीचा इशारा देत आहोत की झाले तेवढे पुरे झाले यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाहीत .
राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी , स्थानिक नागरिकांना विस्थापित करून बिल्डरांची तुमडी भरणार असतील तर अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या जनतेबरोबर आपण राहू , असे आश्वासन दिलेे .
भाजपचे विक्रमगड - जव्हारचे आमदार चिंतामण वनगा यांनी , ठाणे जिल्ह्यात आम्ही पाच आदिवासी आमदार असून आदिवासींच्या जीवनाशी खेळणाऱ्या अशा प्रश्नावर विधानसभा अधिवेेशनात हल्ला चढवून कामकाज होऊ देणार नाही , असा इशारा दिला .
डहाणूचे आमदार राजा ओझरे यांनी सांगतिले की आपण येत्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या प्रकल्पास विरोध करून जनतेसोबत राहील .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग बेलकर , कष्टकरी संघटनेचे सिराज बलसारा , ब्रायन लोबो , ' भारत मुक्तीमोर्चा ' चे रवींद्र माळी , मानव विकास संघर्ष संघटनेचे वझे आदींनी विचार मांडले .
Sakal news -http://72.78.249.107/esakal/20111012/4748534799278999595.htm
सुसरी धरणावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली
प्रसाद आळशी - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 12, 2011 AT 02:45 AM (IST)
ठाणे - डहाणू तालुक्यातील सुसरी धरणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे. नियोजित धरणाला ग्रामस्थांचा विरोध सुरू झाला असतानाच, आदिवासी विकास राज्यमंत्री व कॉंग्रेसचे स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांनी "ग्रामस्थांचे मत म्हणजे माझे मत' असे म्हणत धरणाला विरोध केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुनर्वसन योग्य प्रकारे करण्याचा आग्रह धरला आहे.
सुसरी धरणासाठी 389 कोटी 49 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या धरणासाठी आदिवासी शेतकऱ्यांची सुमारे 54 हेक्टर जमीन व खासगी 42 हेक्टर वनजमीन लागणार आहे. रानशेत, अवढाणी, धानिवली, महालक्ष्मी, गंजाड आदी दहा गावांमधील जमीन संपादन केली जाणार आहे. गंजाड व महालक्ष्मी गावांमधील घरांचे नुकसान होणार नसून, तेथील वनजमीन ताब्यात घेतली जाणार आहे.
सुसरी धरणासाठी सर्वप्रथम 1971 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर 1976 मध्ये दुसरे आणि 2009 मध्ये तिसरे सर्वेक्षण झाले. त्यानंतर धरणाच्या प्रस्तावाला वेग येऊन आता कामाच्या निविदाही मंजूर झाल्या आहेत. मात्र, तेथील ग्रामस्थांनी संघर्ष समिती स्थापन करून धरणाला तीव्र विरोध केला आहे.
सध्या सुसरी धरणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा; तर कॉंग्रेसचा विरोध, अशी स्थिती निर्माण झाली आहे. धरणग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करावे, असा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार कृष्णा घोडा व जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी धरला आहे; तर राजेंद्र गावित यांनी "लोकांचे मत म्हणजे माझे मत' असे म्हणत धरणाला विरोध दर्शविला आहे. या धरणासाठी कृष्णा घोडा व आनंद ठाकूर यांच्या पत्रामुळे गती आली, असा प्रचार कॉंग्रेसकडून होत असल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी ठाकूर व आमदारपदी घोडा यांनी 2009 मध्ये पत्र दिल्याने धरण होत असल्याचा प्रचार होत आहे; तर हा प्रचार खोटा असल्याचे दोघा नेत्यांनी स्पष्ट केले आहे. आमच्या पदाची मुदत सप्टेंबर 2009 मध्ये संपुष्टात आली. अशा पत्राची प्रत दाखविल्यास राजकारणातून निवृत्त होऊ, असे आव्हान ठाकूर व घोडा यांनी दिले आहे. कृष्णा घोडा यांचे रानशेत येथे निवासस्थान आहे. या धरणामधून घोडा यांचे घर व जमीन बचावली आहे. मात्र, माझी जमीन सरकारने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
'सुसरी धरणासाठी शेकडो आदिवासींना विस्थापित करणे चुकीचे आहे. त्यांना दहा लाख रुपयांचा मोबदला दिला, तरी त्यातून भवितव्य घडणार नाही. वसई-विरार वा कोणत्याही शहरांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना अन्य ठिकाणांहून पाणी द्यावे. राज्य सरकारचा मी घटक असलो, तरी लोकांना जे हवे आहे ते देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांचे मत म्हणजे माझे मत आहे,'' अशा शब्दांत राज्यमंत्री गावित यांनी "सकाळ'शी बोलताना धरणाला विरोध स्पष्ट केला. सिडकोने वसई-विरारसाठी छोट्या नद्यांमधून पाणीपुरवठा करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राजेंद्र गावित-राष्ट्रवादी वादाला आता 'सुसरी'चे निमित्त!
सुसरी धरणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मार्चमध्ये होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी रंगण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सुसरी धरण हे निमित्त असले, तरी याआधीही राज्यमंत्री राजेंद्र गावित व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कपिल पाटील यांच्यात वाद रंगला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही गावित व आनंद ठाकूर यांच्यातील संभाव्य वादात पालकमंत्री गणेश नाईक यांनी मध्यस्थी केली होती. कॉंग्रेसचे जिल्ह्यात आव्हान राहू नये, यासाठी गावित यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा दावा कॉंग्रेस समर्थकांकडून केला जात आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10238612.cms
- नरेंद पाटील , पालघर
डहाणू तालुक्यातील धानवरी येथे बांधण्यांत येणाऱ्या सुसरी नदीवरील धरणाला आदिवासींचा विरोध वाढत आहे. या धरणातून वसई-विरार शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयास विरोध करताना संघर्ष समिती अध्यक्ष नरेेश बोलाडा यांनी सांगितले की, वसई-विरारकरिता आमचे आयुष्य बरबादीला का टाकायचे, या धरणास विरोध करण्यासाठी रविवार ९ रोजी कासा येथे तालुक्यातील आदिवासी एकत्र येऊन आवाज उठविणार आहेत.
वसई तालुक्यातील विरार, नालासोपारा, वसई, माणिकपूर, नवघर आदी ठिकाणी प्रचंड वेगाने गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यांत येत आहेत. त्यांच्यासाठी डहाणू तालुक्यातील सुसरी धरणातून ५४ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता सुसरी धरणलगत असलेल्या डहाणू तालुक्यातील धानिवरी, नवनाथ, रानशेत, दहीगाव, आवंढाणी, देवूर, महालक्ष्मी, गंजाड, गणेशबाग, ओसरवीरा या गावांतील आदिवासींची तसेच वन विभागाची मिळून एक हजार हेक्टरहून अधिक जमीन या धरणात जाणार आहे व त्यामुळे अनेक आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत.
वसई तालुक्यातील विकासाकरिता सरकार व तेथील विकासकांनी पाण्याचा साठा आपल्या तालुक्यात आहे का, याचा विचार करायला हवा, असे बोलाडा यांनी स्पष्ट केले.
२००४ हजार साली सूर्या धरणातील लाखो घनमिटर पाणी वसई तालुक्याला नेऊन डहाणू, पालघर, जव्हार, विक्रमगड आदी ठिकाणच्या शेतकरी तसेच आदिवासीवर मोठा अन्याय केला आहे. गेली २०-२२ वषेर् सूर्या धरणातील पाण्यासाठी पाट खोदून शेतकरी पाण्याची वाट पहात आहेत. मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळण्याऐवजी सरकारने पुन्हा वसईतील बिल्डरांना पाण्याचा कोटा वाढवून दिल्याचे त्यांनी सांगितले. वसईतील बिल्डरांची पाण्याची पाण्याची तहान भागत नाही, म्हणून आता त्यांची नजर डहाणू तालुक्यावर पडली असून सुसरी धरण बांधून पाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडलाच पाहिजे यासाठी आम्ही हा लढा देणार असल्याचे सांगितले.
सुसरी प्रकल्पाला हिरवा कंदील
लोकमत – शुक्र, २०११ ऑक्टोबर ७
वसई। दि. ६ (प्रतिनिधी)
वसई-विरार उपप्रदेशाला पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजित सुसरी नदी प्रकल्पाला जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पासाठी ३८९.४९ कोटी रु.च्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली आहे. जलसंपदामंत्र्यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या या बैठकीत या प्रश्नी निर्णय घेण्यात आला आहे.
वसई-विरार उपप्रदेशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने डहाणू तालुक्यातील सुसरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नी राज्य शासनानेही उपप्रदेशाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यास मंजुरी
दिली.
या धरणासाठी ८५३.५४ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. यामध्ये ८ गावांतील ५७८.१२ हेक्टर खासगी तर २७५.४२ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. गणेशबाग, नवनाथ, रानशेत, दहिगाव, देवूर, धानीवरी, विवळवेढे व आवढाणी या गावातील जमिनी प्रकल्पाखाली येणार आहेत.
त्यापैकी धानीवरी, विवळवेढे, आवढाणी, दहिगाव व देवूर या ५ गावांचे शासनाला पुनर्वसन करावे लागणार आहे. परंतु स्थानिक ग्रामस्थांचा या नदीचे पाणी देण्यासाठी विरोध असून त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
सुसरी नदीवरील संकल्पित धरणास आदिवासींचा विरोध |
डहाणू, २५ ऑक्टोबर/ वार्ताहर |
--
--------------------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH I adivasi yuva shakti I www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal community
Let us do it together | www.do.adiyuva.in
www.warli.in | www.tourism.adiyuva.in | www.join.adiyuva.in
--------------------------------------------------------------------------------

What is Susari Dam Project ?
Project : Dam on Susari River
Project Budget :
1. Tender Value : Rs. 389 Cr 49 Lacks
2. Proposed Sponsor by MMRDA : Rs. 202 Cr
Water Supply Capacity : Daily 54 Lack meter cube
Pipe Line : Approx 100 km
Beneficiary: (Mumbai Suburban, Thane Dist, Maharashtra)
1. Vasai
2. Virar
3. Navghar
4. Manikpur
5. Nalasopara
Affected Villages : (Dahanu Taluka, Thane Dist, Maharashtra)
1. RanShet
2. Avadhani
3. Mahalaxmi
4. Dhanivari
5. Dahigav
6. Osur
7. Asarvira
8. Navanath
9. GaneshBag (Ranshet)
Proposed Land Aquisation : More than 1,000 Hector
1. Tribal Villages
2. Forest Land
Government Servey : 1971, 1976, 1999
Current Status of Project: Tender Invited & Allotted
Alternatives: Suggested by CIDCO in Vasai Taluka itself (Capacity 124 mld, which is much more than susari dam & saves pipeline cost)
1. Kaman
2. Kholsa Pada
3. Usgav
4. Sativali
Difficulty :
1. Rehabilitation of adivasi villages :
- Lack of assurance to get basic needs after relocation
- After few decades also Surya Project affected people are not getting primary needs like school, home, land, hospital, transportation, water, electricity
- Basic Needs & Facilities are observed missing for employee working for Surya Project at Surya Nagar Colony, then affected people is far long story
2. Dahanu Taluka's Need of water :
- Today Dahanu Taluka itself facing problem of water. In coming 10 years, Dahanu's Population will be of 5 times greater. Then how to fullfill Dahanu Taluka's Water need?
- Almost Projects in Thane Dist are made to benefit Urban Population. No proper planing is done for resource utilization for rural area
3. Sacrifice Development :
- Why always tribal needs to sacrifice for developments?
- dose only urban development is nation's development?
- Development of local reason where these resource belongs to is not development?
Solution :
1. Utilize Local Resource, rather than extracting from Tribal region (Dam in Vasai Taluka itself )
- As per Suggested by CIDCO, Concentrate on local available resources, which are much larger than Susari & will save cost of pipeline & Maintenance
- This will balance the resource utilization, & save from crises in near future for water need in Dahanu Taluka
2. Full Rehabilitation of all tribal & Utilizing resources for Local Needs
- Rehabilitation of all affected tribal with justified values & services
- Utilizing water considering local development & future needs in Dahanu Taluka