|| वैयक्तिक अनुभव:*कोरियातील ५वा आठवडा*||

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 21, 2023, 9:14:13 AM1/21/23
to AYUSH google group
|| वैयक्तिक अनुभव:*कोरियातील ५वा आठवडा*||

▪️[स्थानिक *आदिवासी भाषा* : निहरी]
कोरियाचे हाफिसात भलत्या अयोनिक कारीं आहात. त्यावर काही मसनी लावेल आहात, त्यात डायवर नीही रेहला तऱ्ही त्या त्याला सांगला तथ जात ऑटोमॅटिक. मस्त ना, मी नांगतूच रेहे एकसरखा. बेस रेहा 
 
▪️[साधारण *मराठी बोली* भाषा]
बऱ्याच OEM ऑटोनॉमस गाड्या विकसीत करण्यासाठी काम करीत आहेत. *अयोनिक-५ रोबो टॅक्सी एक छान उदाहरण आहे. जी कोणत्याही ड्रॉयव्हर शिवाय कस्टमर ला पिक करते आणि अपेक्षित ठिकाणी सोडते.* तेही रस्त्यावरचे ट्राफिक/माणसे/इत्यादी सांभाळून. 

माणसाच्या चांगल्या सवयी मशीन ला शिकवून ऑटोनॉमस ड्रायविंग करते ती कार. सहज माहितीसाठी ड्रॉयव्हर लेस कार चे काही व्हिडीओ पाठवतोय   
*लास वेगास* - https://youtu.be/ngOOOOlWqQE  *भाग १*- https://youtu.be/qJlIzTZ6has *भाग २* - https://youtu.be/clIYzpoppAQ 
जागतिक स्थरावर बेस्ट कर चे अनेक पुरस्कार मिळालेली हि कार काल परवा भारतात पण लाँच झालीय.  

▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡
आदिवासी समाजा समोरील विविध समस्या/आव्हाने इत्यादींसाठी आवश्यक उपाय योजना साठी कुणी पुढाकार घ्यावा?... सरकार? अधिकारी? कर्मचारी? संस्था? संघटना? नेते? कार्यकर्ते? पक्ष? धर्म? पंथ?... ते त्यांचे दायित्व पार पाडतील, त्यांच्या पद्धतीनुसार काम करत राहतील. 

पण समाज म्हणून समाजाची स्वावलंबी नैसर्गिक व्यवस्था टिकवणे महत्वाचे वाटते. *बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक अनुरूप बदल करून आपली व्यवस्था टिकवली* तर भविष्यासाठी सशक्त स्वावलंबन टिकेल. 

नाही तर पिढ्या न पिढ्या पासून जतन होत आलेली आपली स्वावलंबी आदिवासी व्यवस्था गेल्या ४०-५० वर्षात मोठ्या गतीने विस्कळीत झाली/केली गेली आहे. या मुळे कदाचित आपली ओळखच आपण पुसत चाललो आहोत आणि सोबत जल जंगल जमीन पण. 

*समाजातून खासकरून युवा/सुशिक्षित/नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून आवश्यक पुढाकार घेणे गरजेचे वाटते.* तुम्हाला काय वाटते? चलो प्रयत्न करूया. Let’s do it together! जोहार
Reply all
Reply to author
Forward
0 new messages