|| वैयक्तिक अनुभव : *सायकल ती सायकलूच*||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
May 6, 2024, 2:06:16 PM5/6/24
to AYUSH google group
|| वैयक्तिक अनुभव : *सायकल ती सायकलूच*||

▪️[ *आदिवासी बोली* : निहरी]
_बाबाचे हारीं कास्यातं गेलुं का त्यांना कोनीं भेटलां कां ते बोलत तांव मी माझं पाय स्पोकात गुतवून ठेवीं ना चालू झालीं सायकल का मुरगलून रेहें. कोढेक दा तसाच करीं ना लडून दाखवीं [~१९८८]._ 

_मंगा थोडा मोठा झालुं, पहले एक पाय टाकून निसतां धावत हिंडू, मंगा हलूं हलूं एक पाहयांवर, मंगा लंगडी, अर्धा पायडल, मंगा पुरा पायडल, मंगा दांडेवारसी, ना हलूं हलूं मंगा सीटवर. तांव कोढेकदा पडवं, आरडवं, खर्चट. एक कोनाची सायकल रेहे कां सगलीं नंबर लावून रेहुं ना एक एक करून पडत पडत सायकल सिकेल [~ १९९३]._ 

_कव्हां कव्हां दुकानातली भाड्याची बाराकी सायकल तासांवर चालवूं [१९९६~ ]. घरातली सायकल रेहलीं का थारा नीही रेहे, पाहयांना भिंगरी दसीं लावून आखा दिस कोठ कोठ हिंडू [~ १९९९]. दादूला नवीन सायकल आनलीहें, सिकतो हलूं हलूं.._

▪️[ साधी *मराठी* भाषा ] 
लहान पणापासून सायकलच्या खूप आठवणी  आकर्षण आहे. बाबांसोबत खूप फिरलो.  बाबांना त्यांच्या काळात, मला माझ्या वेळेस, आता विहान च्या वेळेस *सायकल शिकताना वेगळी परिस्थिती आणि वातावरण आहे,* कदाचित त्याच्या पुढच्या पिढीला काही आणखीन बदलेल. विहान माउंटन सायकल आणलीय ती शिकवणे सुरु आहे.   

▪️[ दोन शब्द *सामाजिक* ]
सामाजिक उपक्रमांचे पण तसेच आहे. सभोवतालची परिस्थिती, प्राथमिकता, सामान्य जीवन इत्यादी सगळ्यांचा विचारपूर्वक ठरवून केल्यास त्याचा लाभ समाजाला होत राहील. वेळो वेळी वेग वेगळी सुरवात पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा *वैचारीक दिशा आणि सामाजिक काम हे संचय होत राहिले पाहिजे,* ज्याला जमेल जसे जमेल तसे सहभागाने हे काम होत राहिले पाहिजे. वर्ष जातील नवीन पिढ्या येतील पण आपल्याकडे *संचित अनुभव/ज्ञान/कुशलता नवीन नवीन कौशल्य आणि पद्धती अवगत करण्यासाठी आत्मविश्वास/ऊर्जा/दिशा देतील.*

पुन्हा *पुन्हा चाकाचा शोध लावण्यापेक्षा* एकाने चाकाचा, एकाने आरे, एकाने वंगण, एकाने पट्टी, एकाने मजबुती, एकाने वेग, एकाने शक्ती, एकाने दिशा इत्यादी आपल्या *आवडीचे विषय घेऊन एकमेकांना पूरक काम* केल्यास त्याच मेहनतीत चांगली वेगवान गाडी तयार होऊ शकते. 

नाही तर आपण तेच तेच काम पुन्हा पुन्हा करतोय, प्रत्येक पिढी यातून जाते. विद्यार्थी > युवक > मंडळ > ग्रुप > कार्यक्रम > संघटना >आंदोलन > नेता > पक्ष > पद >... आणि आपल्या आधी लोकांनी केलेल्या मेहनतीचे संचय नसल्याने प्रत्येकाला *पुन्हा शून्यापासून सुरवात करावी लागते...* पून्हा तेच सायकल  किंवा मग बाहेरील आधार घेऊन त्यांचे संचय वाढीसाठी हातभार लावला जातो. 

*आपले काय मत आहे? आदिवासी सामाजिक कामाचे संचय कसे करू शकतो? एकमेंकाना पूरक काम करायचे वातावरण तयार होऊ शकते?* 🤔
Reply all
Reply to author
Forward
0 new messages