|| चिंता : ९ ऑगस्ट झाला, छान! *पुढे काय?*🤔||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Aug 12, 2023, 5:45:10 AM8/12/23
to AYUSH google group
|| चिंता : ९ ऑगस्ट झाला, छान! *पुढे काय?*🤔||

_गेल्या अनेक वर्षांपासून वाढता उत्साह आणि दर्शनी स्वरूप. विविध पाडा/गाव/बाजार/तालुका/जिल्हा/राज्य पातळीवर असंख्य जणांनी विविध माध्यमातून सहभाग घेऊन हे सगळे घडवून आणले. त्या सगळ्यांच्या *प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष मेहनतीबद्दल कौतुक आणि मानाचा जोहार!*_

देशभरात विविध ठिकाणी *एकच दिवशी शेकडो/हजारो/लाखो आदिवासी एकत्र येणे हि साधी गोष्ट नाही.* हि अफाट शक्ती/ऊर्जा योग्य पद्धतीने *समाज हितासाठी उपयोगात यावी* हि माफक अपेक्षा.
.................................................... 
उद्या कदाचित प्रसार माध्यमे/शासन/पंतप्रधान/राष्ट्रपती शुभेच्छा देतील हि, सुट्टी ही मिळेल. पण खरच *एव्हडे पुरेसे आहे?*

समाज म्हणून *या ऊर्जा/शक्तीचा उपयोग अधिक प्रभावी व्हावा.* पाड्यापासून ते देश पातळीवर आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न/अडचणी आहेत त्यासाठी त्या त्या पातळीवर एकत्रित पद्धतीने सहभाग, रचनात्मक कार्य, समाज आणि व्यवस्था योग्य पद्धतीने हाताळू शकणारे कौशल्य, समाजातून प्रभावी नेतृत्वाची फळी निर्माणासाठी *आवश्यक प्रणाली उभी करूया.*

पण या दिवसाचे वाढत जाणारे फक्त नाच गाण्यातून *उत्सवाचे स्वरूप* आणि व्हिजन मिशन रहित *एक दिवसाची आदिवासी गर्दी* चिंताजनक वाटते.

दर वर्षीच्या थीम प्रमाणे एक वर्ष फोकस कार्य किंवा टप्या टप्प्याने प्रयत्न करत राहणे. विविध विषयावर आपल्या आवडीच्या कामाचे स्वरूप/पद्धत/प्राथमिकता/विषय घेऊन काम करत राहिल्यास मोठा बदल होऊ शकतो.

🔅 *सामाजिक कार्यातील मार्गदर्शक पायऱ्या* :
❶ सामाजिक कार्या विषयी माहिती वाचणे/ऐकणे (माहिती)

❷ जवळील आवडलेल्या सामाजिक कार्यात दर्शक म्हणून जाणे (सहभाग)

❸ अंमलबजावणी, नियोजनात सहभाग/सहकार्य करणे (सहकार्य)

❹ संपर्कात इतरांना कार्यात सहभागासाठी सांगणे (प्रचार)

❺ योग्य प्रतिनिधित्वाला प्रोत्साहन किंवा पुढाकार घेऊन दायित्व पार पाडणे (नेतृत्व)

❻ कार्यक्रम अधिक प्रभावी होईल यासाठी सुधारणा करत राहणे (सुधारणा)

❼ संपर्क ठेवून असेच काम करत असलेल्यांकडू नवीन शिकत राहणे (संपर्क)

❽ संवाद वाढवून, समाजाला अपेक्षित विविध उपक्रमासाठी पुढाकार घेणे (संवाद)

❾ अनुभव, निरीक्षण, परिस्थितीचे आकलन करून दीर्घकालीन योजना आखणे (नियोजन)

❿ आवश्यक असलेल्या विविध पातळीवर मार्गदर्शक म्हणून सहभाग घेणे (मार्गदर्शक)

⓫ समाज हित जपून विविध विषयवार कार्य करणाऱ्यांचे संस्थात्मक जाळे उभारण्यासाठी हातभार लावणे (संघटन)

⓬ समाज हिताचे उपक्रम, जागरूकता, सहभाग यासाठी पूर्णवेळ देणार्यांचे नेतृत्व उभारणे (नेतृत्व)

... एक एक करून या पायऱ्या घेऊन पुढे जात राहून आपल्या आपल्या आवडीनुसार, प्राथमिकतेनुसार आपण सगळ्यांनी *"आदिवासी स्वावलंबन" या दिशेने एकमेकांना पूरक काम* केल्यास नक्कीच समाजात चांगला प्रभाव पडू शकेल. हे झाले एक मॉडेल, या पेक्षा हि काही चांगले पर्याय असू शकतात.
.................................................
या दिनेशने जागरूकता/चर्चा/संवाद व्हावा या साठी [प्रायोगिक💡] *एक वर्षाचे नियोजन* करीत आहोत. माध्यमातून अनुभवींचे मार्गदर्शन सगळ्यांसाठी *"Talk on आदिवासीत्व"* या माध्यमातून उपलब्ध होईल. *या नियोजनासाठी आपल्या सगळ्यांचे मत खूप महत्वाचे आहे, कृपया पुढील लिंक वरून सूचना जमा कराव्यात.* चलो आपले ज्ञान/अनुभव आदिवासी समाज हितासाठी कामी आणूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
.................................................................
*"Talk on आदिवासीत्व" सहभाग नोंदणी*💡
[सामाजिक कार्यात सक्रिय असलेले अपेक्षित]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages