|| *आयुश वारली चित्रकला क्लस्टर* : सप्टेंबर '२१||

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Oct 1, 2021, 9:10:43 AM10/1/21
to AYUSH google group
|| *आयुश वारली चित्रकला क्लस्टर* : सप्टेंबर '२१||

*१) टाटा पॉवर सोबत CSR उपक्रम :*
जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात टाटा पॉवर यांच्या सहकार्याने आयुशच्या माध्यमातून सुरु केलेल्या उपक्रम निर्मित *कलावस्तूंचे मिनी प्रदर्शन आणि कलाकार संवाद सत्र* ३० सप्टेंबर रोजी जव्हार येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ सभागृहात आयोजित केले होते. 

*२) आदिवासी विकास विभागा सोबत उपक्रम :*
आदिवासी विकास विभागाच्या (SCA to TSS) आर्थिक सहकार्याने २०१९ पासून डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यात सुरु असलेली योजना (आयुश वारली पेंटिंग क्लस्टर) *संबंधित खात्याकडून पुढील सुचना मिळे पर्यंत स्थगित* करण्यात आली आहे.

*३) माविम सोबत महिला सशक्तीकरण उपक्रम :* 
महिला आर्थिक विकास महामंडळ प्रतिनिधींसोबत विविध पातळीवर बैठक आणि वारली चित्रकला माध्यमातून *महिलांना आर्थिक स्वावलंबसाठी "लोठी" उपक्रमाबद्दल* चर्चा झाली. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील नियोजन करण्यात येईल

*४) MSME स्फूर्ती माध्यमातून पायाभूत सुविधा:* 
MSME खात्याच्या *Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries* (SFURTI) योजणे अंतर्गत आयुशचा प्रस्ताव मिनिस्ट्री स्थरावर विचाराधीन आहे. मंजूर झाल्यास कलावस्तू निर्मितीच्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक होईल.

*५) प्रशिक्षण/संवाद माहिती सत्र :*
- ६ ते ८ सप्टेंबर धरमपूर - गुजरात येथील विद्यार्थ्यांसाठी *वारली चित्रकला प्रशिक्षण* आयोजित करण्यात आले होते.
- २७ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध आंतराष्ट्रीय शाळेतील *विद्यार्थ्यांसाठी तारपा माहिती सत्र* आयोजित करण्यात आले. 
- ३ ऑक्टोबर रोजी टाटा समूहाच्या *कार्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी संवाद सत्र* नियोजन करीत आहोत त्यात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि वारली चित्रकलेबद्दल माहिती देण्यात येईल. 

*६) सामाजिक दायित्व/जागरूकता :*
वारली चित्रकलेविषयी जागरूकता व्हावी यासाठी ऑनलाईन (दर शनिवारी ११ ते १२), ऑफलाईन (दर रविवारी १० ते १ कासा आणि डहाणू येथे) प्राथमिक प्रशिक्षण सुरु करण्यात आले. पहिल्यांदाच सुरु केलेल्या या उपक्रमात *२५ जणांनी ऑफलाईन* आणि *९३ जणांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग* घेत आहेत. 

*७) [नविन] आयुश कला केंद्र@विवळवेढे :*
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणूच्या महालक्ष्मी येथे येणाऱ्या भाविक/पर्यटकांच्या माध्यमातून *आदिवासी कलावस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी* लवकरच आयुश कला केंद्र सुरु करीत आहोत.
.........................................................
*पारंपरिक ज्ञानातून आदिवासी समाजात आर्थिक स्वावलंबनाचे पर्यायांना व्यापक स्वरूप* देण्यासाठी समाज, स्वयंसेवक, CSR, शासन योजना, इ. सहकार्याने सामाजिक उद्यमीतेच्या माध्यमातून प्रयत्न करित आहोत. Lets do it together! जल जंगल जमीन जीव… आदिवासीत्व. जोहार!

💡या उपक्रमाबद्दल आपला *फीडबॅक/सूचना येथे नोंदवावे,* 🙏 ते नियोजनासाठी मार्गदर्शक ठरतील. https://forms.gle/RZf1UEthHjWGxiNi8  
...................................................
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
समाज+स्वयंसेवक+CSR+शासकीय योजना
उपक्रम सहभाग नोंद : .kala.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages