|| माहितीसाठी:*अखेर NCST चा हस्तक्षेप*||

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 28, 2022, 7:32:57 AM4/28/22
to AYUSH google group
|| माहितीसाठी:*अखेर NCST चा हस्तक्षेप*||

_आज महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीलाही निवेदन देण्यात आले._
.....................................................
"आयुश वारली चित्रकला क्लस्टर" चे प्रकल्प कार्यालयातर्फे *अयोग्य पद्धतीने मूल्यांकन* करून, *ठरवून नकारात्मक अहवाल* बनविल्याचे आयुश टीम चे मत आहे. यासंबंधी MoU नुसार गठीत मॉनिटरींग समितीच्या बैठकीसाठी *अनेक निवेदने करूनही प्रतिसाद मिळाला नाही.* योजनेत गैरव्यवहार झाला आहे, उपक्रम स्थगित करुन निधीची वसुली करावी अशी प्रकल्पातर्फे *एकतर्फी पद्धतीने नोटीस मिळाली होती.* 

हे *अन्यायकारक असून आदिवासी विकास विभागाला अनेक निवेदने/विनंतीला अजून प्रतिसाद मिळाला नाही.* अंतिम पर्याय म्हणून NCST येथे तक्रार नोंदवली. *NCST कडून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना १५ दिवसात माहिती पाठविण्यासाठी सूचना देण्यात आली आहे.*   (आयुश ला पत्राची प्रत मिळाली)
 
अपेक्षा आहे आदिवासी विकास विभागात आदिवासी संस्था म्हणून जाणीवपूर्वक खच्चीकरण होऊ नये. जास्तीत जास्त *आदिवासी संस्थांचे सबळीकरण व्हावे, पाठबळ मिळावे.* स्पष्ट आणि आग्रही मत आहे कि आदिवासी विभागाचा *ज्या गोष्टींसाठी निधी आहे त्याच साठी‌ प्रामाणिकपणे उपयोगात* यायला हवा. 
......................................................
आयुश उपक्रम/या योजने विषयी समाजाचा भाग म्हणून काहीही चुकत/दुरुस्ती असल्यास हक्काने लक्षात आणून द्यावे🙏🏻, *आयुश सोशिअल ऑडिट साठी सदैव खुले आहे. आपले ज्ञान/कौशल्य/ऊर्जा आदिवासी समाज हितासाठी सातत्याने कामात यावे हा उद्देश.* अधिक सविस्तर येथे - https://bit.ly/3oV3fLy

सामाजिक उद्यमीतेतून *आदिवासीत्व जतन करत उभे राहिलेले उपक्रम सशक्त करूया,* Lets do it together! जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!
___________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages