||आदिवासी कलाकार एकत्रीकरण ||
उद्या खंबाळे येथे बैठक.
पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनासोबत संस्कृती संपदेचे जतन यासाठी आयुश चा उपक्रम.
दिवस : १५ फेब्रुवारी २०१८ (सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत)
ठिकाण - बिरसा हाऊस, बस स्टॉप जवळ, खंबाळे, वानगाव पूर्व, ता. डहाणू, जि. पालघर
बैठकीचे विषय -
१) काळाघोडा आर्ट फेस्टिवल (३ ते ११ फेब्रुवारी) : वारली चित्रकला स्टाल आढावा
- आपल्या स्टॉल ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्या संदर्भात अनेकांचे फीडब्याक आले. यशासाठी सगळ्यांचे आभार.
: यशाची कारणे, महत्वाची तयारी, चेकलिस्ट, फिडब्याक, काय शिकायला मिळाले, अधिक सुधारणा, दुरुस्ती, पुढील दिशा या बद्दल चर्चा
२) मॅग्नेटिक महाराष्ट्र (१८ ते २३ फेब्रुवारी) : वारली चित्रकला स्टाल तयारी
- जर प्रदर्शनाची संधी मिळाल्यास लागणारी तयारी आणि कलाकृती निवड
: प्रदर्शनासाठी निवडक "निर्यात योग्य /उच्च क्वालिटी" प्रॉडक्ट्स निवडले जातील. इच्छुक कलाकारांनी आपल्या कलाकृतीसह मीटिंग ला हजर राहावे
3) कलाकृती छायाचित्रण
4) प्रतिनिधींची अधिकाऱ्यांसोबत बैठक : गृह विभागातील अधिकारी यांच्यासोबत बैठक (FCRA व्हेरिफिकेशन)
आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिताच्या उपक्रमात कामी यावे यासाठी प्रयत्न करूया. Lets do it together!
सहकार्य करून हा उपक्रम अधिक प्रभावी करूया, किंवा या पेक्षा अधिक चांगला उपक्रम सुरु करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी हा मेसेज पाठवला आहे.
आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 9246361249