adivasi.samrat
unread,Apr 17, 2015, 7:15:23 AM4/17/15Sign in to reply to author
Sign in to forward
You do not have permission to delete messages in this group
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to raiga...@gmail.com, raigad....@gmail.com, Raigad Today, Raigad Nagari, panvelnaga...@gmail.com, Maze Panvel, Panvel Youva, Ganesh Koli, Kokan Darpan, Akbar Sayyed, kokan...@gmail.com, Nbharat Navbharat, YOGITA BHUTAMBARE, Santosh Bhosale, vaishal...@gmail.com, Mayur Tambade, karanj...@gmail.com, vatank...@gmail.com, omsam...@gmail.com, kille...@gmail.com, Kiran Batham, AYUSH | adivasi yuva shakti
महसुल खात्याने दळी प्लाॅट, वनजमिनीच्या नोंदी करताना स्थळपहाणी करावी - आदिवासी सेवा संघ
.....................................
पनवेल : वनहक्क कायद्या अंतर्गात होत असलेल्या महसुल व वनखात्यामार्फत वनजमिन, दळी प्लाॅटच्या नोंदी हे स्थळपहाणी करून नोंदी करण्यात यावेत. असे आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी जिल्हाधिकारी यांना पञ दिले आहे.
महसुल खात्यातील तलाठी व संबंधित अधिकारी हे कार्यालयात बसून गावातील ठरावीक लोंकाना बोलवून रिपोर्ट, अहवाल बनवून नोंद करत असल्याचे दिसून येते. याचा आम्हा सर्व आदिवासींचा विरोध व हरकती आहेत. तसेच आशा नोंदी, रिपोर्ट, अहवाल व स्थळपहाणी करताना संबंधित गावातील ग्रामस्थांना, सामाजिक कार्यकर्ते, वनहक्क समितीच्या कमिटीला सूध्दा कळवले जात नाहीत. हे अधिकारी वेळ वाचवणे, काम चुका करणे या कारणांने अनेक आदिवासींचे नुकसान होते.
तसेच काही वर्षा पुर्वी अनेक आदिवासींना ताबा, कब्जा व लागवड वहिवाट सांगणारे प्रमाणपत्र, सनद जिल्हाधिकारी, उपवनरक्षक अलिबाग, प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त सहीने वाटप करण्यात आले, माञ याची ही कोणती दखल न घेता त्यांच्या नोंदी केल्या जात नाहीत, तर आशा नोंदी महसुल खात्याने कराव्यात त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिका-यांना सुचना दिले पाहिजेत, असे ही दिलेल्या पञात म्हटले आहे. व यांची एक पञ पनवेल तहसिदार यांना देण्यात आली आहे.