|| वैयक्तिक अनुभव :*ट्रिंग ट्रिंग...जागे आहोत?*||
▪️[ *आदिवासी निहरी बोली*]: आझुक निजेल?
_चुकून घराला/खाल्याला आग लागलीं का भलतां धावपल करीत ज्या काहीं हातात येल त्याखाल आग विझवाया ना नुकसान वाचावाया ज्या जमाल त्या करीत. ना ओढें वर्सापायसीं आपले वाट्याच्या नोकऱ्यां नीही दिजत, काम नीही, दवाखान बेस नीहीं, साला बेस नीही, हाफिसातलीं कामां कराया पयस मांगत, नोकऱ्या बीजे जिल्ह्यातसीं लोखां नेत, धंदा बीजे राज्यांतलीं माणसां करींत. तऱ्हीपण आपले आहुं तसी ओगिच कसींक? *निवडणुकीत बेस माणसाला निवडूं, ना कामां नीहीं करीत त्यांना खोपाला बसवूं* गायचेन..._ ☺️
▪️[ *साधी मराठी भाषा*] : जागते रहो!
आज आमच्या ऑफिस मध्ये फायर ड्रिल मॉकप झाले. ऑफिस मध्ये अंदाजे हजार इंजिनिअर काम करतात, फायर अलार्म झाल्यावर 5.34 मिनिटात सगळे जण मैदानात सुरक्षित ठिकाणी पोचले. तिथे सुरक्षितेतचे विविध डेमॉन्स्ट्रेशन आणि माहिती देण्यात आली. हे सत्र प्रत्यके सहा महिन्यांनी होते.
▪️[ *2 शब्द सामाजिक*] : जिवंत प्रतिनिधित्व!
आदिवासी समाजाची जी सध्याची परिस्थिती त्या परिस्थितीत संबंधित सदनात लोकप्रतिनिधींची भूमिका काय असायला हवी. संविधानिक अधिकार, प्रभावी अंमलबजावणी, समाजाच्या अपेक्षा, समाजाचा आवाज मांडणारे लोकप्रतिनिधी आपण पाठवतो का हा खूप मोठा प्रश्न आहे.😌
अनेक वर्षांपासूनच्या या पक्षीय राजकारणात अनुसूचित क्षेत्रातून (काही मोजके अपवाद सोडल्यास) सामाजिक जाणीव प्राथमिकता ठेवून काम करणाऱ्या *प्रभावी नेतृत्वाचा अभाव* जाणवतो आहे. ते हि बरोबर आहे म्हणा कारण प्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी पक्ष गुंतवणूक करतो तर ते परतफेड म्हणून पक्षाचा अजेंडा वरच काम करणार. 😅
💡याच फॉर्मुल्याने जर समाज म्हणून पारंपरिक व्यवस्थेतून गाव पातळी पासुन प्रत्येक ठिकाणी योग्य प्रतिनीधीला प्रोत्साहन देऊ शकलो तर एक एक करून *पॉलिसी मेकिंग आणि संबंधित ठिकाणी समाजाचा आवाज आणि संविधानिक अधिकार अंमलबजावणीसाठी स्पष्टपणे भूमिका घेतली जाईल.* आणि समाज म्हणून समाजाला उत्तरदायित्वी असेल. आहे का शक्य?🤔 कि या पेक्षा काही चांगला पर्याय असल्यास चर्चा करूया... *आपले मत कळवावे.*🙏🏻 Let’s do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
__________________________
गेल्या आठवड्यात आलेल्या निवडणूक निकालात पुढील प्रमाणे *राखीव जागांवरून* आलेले लोकप्रतिनिधी.
मध्यप्रदेश (२३० पैकी *४५*), छत्तीसगड (९० पैकी *३४*), राजस्थान (१९९ पैकी *२५*), तेलंगणा (११९ पैकी *१२*), मिझोराम (४०पैकी *३९*)... जर या लोकांनी *समाज म्हणून आपला आवाज मांडला तर कदाचित बराच बदल होऊ शकतो* नाही तर फक्त पार्टी पार्टी च्या अजेंडा मध्ये आपण फक्त त्यांच्यासोबत संख्या म्हणून वापरले जाणार.😌
____________________________