|| *वारली चित्रकला उपक्रम माहिती* 20/01||
१) *काळाघोडा आर्ट फेस्टिवल*: कलाकृती
नामांकीत “काळाघोडा आर्ट फेस्टिवल 2019” मध्ये ३D कलाकृती थीम आदिवासी कलाकृतीतील बांबू चे स्ट्रक्चर वर कलाकृती बनवणे सुरु केले आहे. खंबाळे येथे संजय दा पऱ्हाड यांच्या मार्गदर्शनात कल्पेश दा गोवारी, निलेश दा राजड, संजय दा रावते, मंगेश दा कडू, इत्यादी कलाकारांसोबत काम सुरु आहे.
२) *वारली चित्रकलेचे टपाल कव्हर*
भारतीय टपाल खात्या मार्फत वारली चित्रकलेचे कव्हर चे प्रकाशन केले जाणार आहे. या संदर्भात आयुश सोबत चर्चा कारण्यासाठी टपाल खात्याचे पालघर डिव्हिजन चे सुप्रिडेंट यांनी 19/1 जानेवारी रोजी खंबाळे येथे भेट देऊन प्राथमिक चर्चा केली. पुढील चर्चा २६/1 तारखेला द्वितीय बैठक वाघाडीला होईल.
३) *बाटा कंपनीला नोटीस* : उत्तर नाही
चप्पल वर वारली चित्राबद्दल पाठवलेल्या नोटीस ला बाटा कडून अजून कोणतेही उत्तर आले नाही. पण कायदेशीर कारवाईला घाबरून बाटा कंपनी कडून पालघर, मुंबई न्यायालयात काव्हियेट दाखल करण्यात आले आहे. ज्यात त्यांनी विनंती केली आहे कि कायदेशीर कारवाही आधी बाटा कंपनी चे मत एकूण घ्यावे.
४) *संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्प* : ऑडिट
United Nation Development Program मार्फत आयुश चे मायक्रो असेसमेंट १५ - १६ जानेवारी रोजी वाघाडी येथे झाले. अभिजितदा पिलेना, संदिप दा भोईर आणि सचिन दा सातवी यांनी दिल्ली हुन आलेल्या UNDP प्रतिनिधींसोबत चर्चा आणि प्रक्रिया पार पाडली. गायचेन सगलीं पिसां उबकून दसीं टाकलीं :). अनेक तांत्रिक नियम आणि कायदेशीर बाबी शिकायला मिळाल्या.
_चलो प्रत्येक पातळीवर आदिवासीत्व टिकवूया, *स्वावलंबनाचे पर्याय मजबूत करूया*._
Let’s do it together!
जोहार !
_________________________________