।। वारली चित्रकला उपक्रम : कलाकार नोंदणी कॅम्प २५ मार्च २०१७ ।।

8 views
Skip to first unread message

Warli Painting

unread,
Mar 22, 2017, 3:13:30 PM3/22/17
to AYUSH google group
।। वारली चित्रकला उपक्रम : कलाकार नोंदणी कॅम्प २५ मार्च २०१७ ।।

*१) आदिवासी कलाकारांसाठी चर्चा सत्र आणि नाव नोंदणी उपक्रम* -
चित्रकला, कारागिरी, हस्तकला, विणणे, लाकडी वस्तू बनविणे, शोभिवंत वस्तू बनविणे, आणि इत्तर हस्तकला करणाऱ्या सगळ्या कलाकारांना सुवर्ण संधी.
विविध कला महोत्सव, प्रदर्शन, कार्यशाळा यात सहभागी होण्यासाठी आवश्यक कलाकार ओळख पत्र तयार करण्यासाठी / नूतनीकरण करण्यासाठी कलाकारानां नाव नोंदणी सोप्पी व्हावी आणि मुंबई येथे कित्येक वेळा जाण्यात वेळल लागतो या पेक्षा हि सगळी प्रक्रिया एकत्रित करून सगळ्या कलाकारांसाठी कासा येथे आयुश तर्फे कॅम्प आयोजित केला जातो आहे.

मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल तर्फे डेव्हलपमेंट कमिशनर (हँडीक्राफ्ट) कार्यालया तर्फे कलाकार नोंदणी :
वस्त्र मंत्रालय तर्फे विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय तर्फे कलाकार नोंदणी व ओळखपत्र वितरण या साठी सदर कार्यालयातील अधिकारी स्वतः हजर राहणार आहेत.

येताना आणावयाची कागदपत्रे :
१) नवीन ओळख पत्र बनविणे : (२पासपोर्ट फोटो, आधार कार्ड , पासबुक चे पहिल्या पानाचे झेरॉक्स, पॅन कार्ड, आणि इत्तर संबंधित कागदपत्र यांच्या २ प्रती)
२) ओळख पत्र नूतनीकरण करणे :(जुने ओळख पत्राचा झेरॉक्स + वरील कागदपत्रे)

*२) आदिवासी कलाकृती, परंपरा, आव्हाने आणि संधी यावर खुली चर्चा* -
कलाकारांचे प्रश्न, अनुभव, संघटन उद्देश, उपक्रम, इत्यादींवर अनुभवांची देवाण घेवाण. समाजा समोरील आव्हाने, आणि समाज जागृतीत कलाकारांचे योगदान. कार्य कुशलता, आर्थिक स्वावलंबन, स्पर्धात्मता या साठी उपक्रम. आणि या विषयावर खुली चर्चा आणि अनुभव देवाण घेवाण.

*ठिकाण* : कन्या छात्रालय कासा मैदान. कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर
*दिवस* : शनिवार, २५ / ०३ / २०१७
*वेळ* : दुपारी १२ ते ३ वाजे पर्यंत
पहिला तास : फॉर्म ची झेरॉक्स काढून अर्ज भरून घेणे
दुसरा तास : अधिकार्यांतर्फे अर्ज पडताळणी आणि प्रश्न उत्तर
तिसरा तास : खुली चर्चा आणि अनुभव सांगणे
*संपर्क* : संजय पऱ्हाड (९०४९ ३४३ ५३२), अभिजित पिलेना (८८३० ६२३ ८७७), संदीप भोईर (८००७ ८८१ ३६९)


आपल्या संपर्कात असलेल्या सगळयांना या विषयी कळवावे, *जास्तीत जास्त कलाकारांनी आणि कलेची आवड असणाऱ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा.*
आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करून सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक ज्ञान जतन करूया. lets do it together !

AYUSHonline team
www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of this Initiative through Warli Painting
माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation
Reply all
Reply to author
Forward
0 new messages