|| वैयक्तिक : कोरियन जीवन अनुभव 50 दिवस ||
▪️[आदिवासी भाषा : निहरी]
यें वेंलस जरांक आलसयुच केलीं, कोरियाला इधेंल तव्हांपायसीं काहींच लींहून निहीं पाठवलां. जराक गडबडीतूच होतुं ना डोक्यांत हो भलतां काहीं काहीं सुरु होतां. आथां टाईम मीलला का जुरुक जुरुक पाठवीन इकडच्या गोठीं. बेस रेहा.
▪️[साधी मराठी भाषा : गडबडीत होतो]
50 दिवस झाले कोरियाला येऊन आणखीन 20 दिवस राहिलेत. ऑटम ऋतू सुरु असल्याने झाडे/परिसर छान रंगीत झालेला आहे, रंगीत पानांचा सडा पडलेला दिसतो, टेकड्या डोंगर पण रंगीत झालेले आहेत. हळू हळू थंडी सुरु झाली आहे.
येथे अनेक छान गोष्टी आणि विचित्र गोष्टी पण आहेत. जसा वेळ मिळेल तसे थोडे थोडे अनुभव पाठवत राहीन.
महाराष्ट्रात निवडणूकपूर्व वातावरण तापले आहे वेळ मिळाल्यास हे व्हिडीओ नक्कीच बघावेत.
1.
https://youtu.be/Du16-GsdBZg?si=Y3lx98Bbpji6tifH (Mission Swaraj, 25min, Hindi)
2.
https://youtu.be/EVNf-2R6qnU?si=yL5zEMh3Od5dUgGm (Maharashtra Election, 18mins, Hindi)
▪️[दोन शब्द सामाजिक : राजकीय नेतृत्व ]
आपल्या देशात जे काही कायदे/योजना/नियम/निधी बनवून अंमलबजावणी केली जाते त्या पॉलिसी मेकिंग च्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रासाठी राखीव मतदार संघातून आपले लोकप्रतिनिधी कसे असावेत यावर समाज म्हणून आपण लक्ष ठेवून पाठ पुरावा करायला हवा.
आरोग्य, शिक्षण, रोजगार, सांविधानिक अधिकार, अनुसचित्र क्षेत्रातील, आदिवासींच्या समस्या, सध्याच्या आणि भविष्यातील आव्हाने यावर पुढाकार घेऊन समाजात संस्थात्मक/संघटनांचे जाळे उभारण्यासाठी पुढाकार घेणारे नेतृत्व आपल्याना गाव पातळीपासून तयार करावे लागेल आणि त्यांना पाठबळ देणारी शक्ती समाजातून उभी केल्यास प्रत्येक पातळीवर आपला स्पष्ट आवाज आणि समाजाला अपेक्षित कामे होऊ शकतील. लोकप्रतिनिधी पण विश्वासाने समाजाचे काम करतील त्यासाठी समाजात पण मोठ्या प्रमाणात जागरूकता करावी लागेल.
समाज म्हणून काही नियोजन आहे का आपल्याकडे?🤔 किंवा या विषयावर जे इच्छुक आहेत ते एकत्र येऊन काही चर्चा होऊ शकतो? काही आयडिया असल्यास नक्कीच बोलूया🙏🏻😊..... जोहार!