|| वैयक्तिक : पुन्हा *आपला उपाय आणूयात?* ||
▪️[आदिवासी बोली : सगलीं पिसां उबकालीं ]
मेह्यांन कागद भासवेल होतां, गायचेन नवां बनवाय जीव दसां गेलां. पंधरा वीस दिस धावपल केली, ये हाफिसात, ते हाफिसात. डोक्याचा भुगा दसां होदेल. ऐकतं हाफिसातसीं कोरिया ला जाया तिकिट काढेल ना मी आहुं तं पासपोर्ट भासवून रेहलुं, जेमतेम नवां बनवला, आथां बोचकां बांधाया सुरवात करिन. तिकडच्या गोठी सांगन हलूं हलूं, बेस रेहा.
▪️[मराठी : *दृष्टिकोन आणि संवेदना*]
समाज म्हणून काळ वेळे नुसार आवश्यक अनुरूप बदल करून सुसंगत राहणे गरजेचे आहे. पण ते करताना आपली विशिष्ट मूल्य/ओळख सोबत नेतो आहोत का हे आदिवासी म्हणून खूप महत्वाचे वाटतेय. वैयक्तिक अनुभवात शिक्षणासाठी/उच्च शिक्षणासाठी/नोकरीसाठी गावापासून दूर राहताना मला प्रत्येक वेळेस वाटतेय कि *गावात/समाजात घडताना जी कौशल्य/संवेदना/दृष्टिकोन मिळतो त्याचा खूप प्रभाव आणि उपयोग आयुष्य भर* होतोय.
मला अभियांत्रिकी, व्यवस्थापकीय, तांत्रिक, सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात देश विदेशातील माणसांसोबत काम करताना हे प्रकर्षाने जाणवतेय. आता शनिवारपासून 70 दिवस कोरियात रोबस्ट इंजिनिअरिंग शिकायला जातोय, तिकडचे अनुभव आणि निरिक्षण पाठवेन 😊
▪️[दोन शब्द सामाजिक : *आपला उपाय काय?*]
सध्याचे शाळा/कॉलेज/हॉस्टेल/कामाची जागा/सभोवतालचे वातावरण/आजीबाजुची कन्टेन्ट विचारात घेतले तर आदिवासी मूल्यांपासून अंतर पाडण्यासाठी कारणीभूत आहे असे वाटतेय. या परिस्थितीत *समाज म्हणून आपल्याकडे काही उपाय आहे काय?* नवीन पिढीत आदिवासी मूल्य रुजविण्यासाठी काही मार्ग?
विद्यार्थी/युवक/कर्मचारी लगेच समाजाच्या कामाला लागतील अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा. समाजासाठी वाहून देणारे *समाजासाठी कामात येणाऱ्या माणसांची संख्या वाढविण्यासाठी तसे संस्कार आणि संवेदना जागरूक करणे* प्रभावी राहील. या दिशेने जी कामे होत आहेत त्यात समन्वय, संवाद, संवेदना आणि नेतृत्वाची फळी उभारण्यासाठी *आपली पारंपरिक सामाजिक व्यवस्था पुनर्जीवित करणे महत्वाचे वाटतेय.* यावर आपले काय मत आहे? 🤔
...............................................................
💡 _[सदर विषयवार इच्छुकांशी चर्चा/संवाद करून लॉन्गटर्म प्लॅन बनविणे सुरु करितो आहोत. *सहभागासाठी येथे नोंदणी करावी.* आधीच केलेली असल्यास आणि ग्रूप जॉईन असल्यास पून्हा करण्याची गरज नाही
https://forms.gle/HSo5KdCnHPZCWTHH6 ]_