कसबा गणपती, पुणे
नववर्षाची सुरुवात पुण्याच्या या ग्रामदैवतेच्या दर्शनाने करूया.
पुण्याचे कसबा गणपती हे शहराचे ग्रामदैवत म्हणून मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याची पुनर्स्थापना करताना कसबा पेठेत या गणपतीची प्रतिष्ठापना केल्याची ऐतिहासिक नोंद आढळते. त्यामुळे कसबा गणपतीला अनन्यसाधारण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील सर्व सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका सर्वप्रथम कसबा गणपतीला मान देऊनच सुरू होतात. साधेपणा, शांतता आणि भक्तिभाव यांचे प्रतीक असलेले हे मंदिर पुण्याच्या परंपरा, श्रद्धा आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडवते.
— संपादक मंडळ
मराठीमाती डॉट कॉम