थरारून टाकणारं कोडं ‘तलाश’
0
inShare
>> वैष्णवी कानविंदे – पिंगे
खूप गुळगुळीत , गोड गोड , कसलंही टोक नसलेल्या पसाभर सिनेमांनंतर प्रेक्षकाला काहीतरी गुंतागुंतीचं पण तरीही बौद्धिक खेळाचा आनंद देणारं आणि शेवटापर्यंत या खेळाच्या भुलभुलय्यात अडकवणारं असं काहीतरी अनुभवायचं असेल तर तो अनुभव नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ तलाश ‘ च्या निमित्ताने हजर आहे .
गेल्या वर्षी विद्या बालनच्या ‘ कहानी ‘ ने प्रेक्षकाला असंच गुंतवलं होतं आणि तमाम कमर्शिअल सिनेमाच्याच साच्यात कमालीच्या वेगळ्या , गुंगवून ठेवणाऱ्या सिनेमाचा आनंद दिला होता . अर्थात , ‘ तलाश ‘ आणि ‘ कहानी ‘ यात कथा , कलाकार , मांडणी किंवा इतर कुठच्याही बाबतीत काही साम्य नसलं तरी प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवण्याचा आणि अनपेक्षित कलाटणीने स्तब्ध करण्याची क्षमता दोन्हीमध्ये काहीशी समानच आहे . असे सिनेमे क्वचित येतात . संपूर्ण कमर्शिअल असूनही धाटणीबाहेरचे . प्रेक्षकाची अथपासून इतिपर्यंत करमणूक करणारे आणि तरी अखंड सिनेमाभर प्रेक्षकाला विचार करायला लावणारे …
ही गोष्ट आहे ,