उन्हाळा आण‌ि शरीरातील पाणी

1 view
Skip to first unread message

manmajhe

unread,
Mar 24, 2014, 8:37:43 PM3/24/14
to aamhim...@googlegroups.com

उन्हाळा आण‌ि शरीरातील पाणी

water2 उन्हाळा आण‌ि शरीरातील पाणी
 उन्हाळा आण‌ि शरीरातील पाणी
उन्हाळ्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे शरीराचे निर्जलीकरण अर्थात डिहायड्रेशन! पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम उद्भवू शकतात. या उन्हाळ्यात तुमच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी काही पथ्ये पाळली आण‌ि काळजी घेतली तर उन्हाळा सुखकर होऊ शकतो

उन्हाळा आणि शरीरातील पाणी

शरीराचे निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन हे उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक प्रमाणात जाणवते. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण ७० टक्के असते. वातावरणातील उकाड्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी साहजिकच शरीरातून पाण्याचे उत्सर्जन वाढते. परंतु, याच दरम्यान अति व्यायाम किंवा श्रमामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावते, पाणी पिण्याचे आण‌ि उत्सर्जनाचे प्रमाण बिघडले की ही पातळी खालावत जाते आण‌ि त्यामुळेच शरीर निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशनला बळी पडते.

लक्षणे

शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असताना सतत तहान लागण्यास सुरूवात होते. त्यानतंर डोकेदुखी, निरूत्साह वाढीस लागणे, खूप वेळापर्यंत लघवीला न येणे आण‌ि आल्यास त्याचा रंग अतिशय गडद असणे ही प्राथमिक लक्षणे निर्जलीकरणाच्या वेळेस दिसून येतात. त्यानंतरही पाणी न मिळाल्यास चक्करही येऊ शकते. तोंड सुकणे, हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब कमी होणे आदी लक्षणे दिसू लागतात. खूप तासांपर्यंत या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो.

काय प्यावे?

शरीराचे निर्जलीकरण रोखण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे पाणी. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने उन्हाळ्यातील सर्व तक्रारींवर तोडगा निघू शकतो. दररोज किमान ३ लिटर पाणी शरीरात गेलेच पाहिजे. तहान लागण्याआधी ठराविक अंतराने थोडे-थोडे पाणी पित राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात व्यायाम करत असाल तर पाण्याबरोबरच शरीरातील सोडिअम आण‌ि पोटॅशिअमचे प्रमाणही योग्य प्रमाणात राखणे गरजेचे असते. अन्यथा त्यांच्या अभावामुळे पेटके येण्याचा संभव असतो. या दोन्ही मूलद्रव्यांचा समावेश असलेल्या पेयांचे सेवन करावे. फळांचे रस, लिंबू पाणी आण‌ि नारळ पाणी उन्हाळ्यात उत्तम स्रोत ठरू शकतात.

काय पिऊ नये?

उन्हाळ्यात मद्य आण‌ि कॅफिनचा समावेश असलेल्या पेयांना दूर ठेवलेलेच बरे. कॉफी, चहा, कोला किंवा मद्य शरीरातील पाणी ‌शोषून घेते. त्यामुळे अर्थातच शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याचा संभव असतो.

प्र‌तिबंध

अनेक प्रकारे उन्हाळ्यातील या संकटाला आपल्यापासून दूर ठेवता येऊ शकते. याची सुरुवात पेहरावापासून करता येऊ शकते. उन्हाळ्यात सुती कपडे घालणे कधीही श्रेयस्कर. खूप जाड कपडे घातल्याने शरीराचे तापमान वाढून अतिरिक्त प्रमाणात घाम येतो. तसेच गडद रंग नेहमी उष्णता शोषून घेतो. त्यामुळे उन्हाळ्यात फिकट रंगाचे कपडे घालावेत. योग्य प्रमाणात पाणी पिणे हाच रामबाण उपाय आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत सूर्याच्या किरणांची प्रखरता सर्वाधिक असते. त्यामुळेच शक्य असल्यास या वेळात घराबाहेर पडणे टाळावे.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages