सकाळचे नऊ वाजले होते. कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला भेटण्यासाठी साडेदहाची वेळ दिल्यामुळे आता पूर्ण दीड तास मला माझ्या आवडीच्या लेखकाचे पुस्तक वाचता येणार होते. वाचायला सुरुवात करणार एवढ्यात ‘दिलासा’चा फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती एक तरुण मुलगी होती. एखादा वाघ मागे लागल्यागत धापा टाकत बोलत होती. ‘‘सर, मी महाराष्ट्रातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकते आणि सध्या एका गंभीर…