उकल बाबरी विध्वंसाची कुमार केतकर
बरोबर 20 वर्षांपूर्वी जेव्हा बाबरी मशिदीचा संघ परिवाराकडून विध्वंस करण्यात आला तेव्हा उत्तर प्रदेशात, देशात आणि एकूणच जगात काय स्थिती होती? त्या जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीचा काय संदर्भ होता? की राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशीही असती तरी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली गेली असती? अशा प्रश्नांची उत्तरे त्या घटनेच्या वेळेस देता येत नाहीत. कारण त्या घटनेचे…