विवाहानंतर दोन वेगवेगळ्या वातावरणातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येतात. एकत्र येतात म्हणजे काय जन्मभरासाठी एकमेकांच्या सुखदु:खाचे भागीदार होतात. विवाह होईपर्यंत आपल्या कमावत्या पुत्रावर आई-वडिलांचे जे बंधन नसते, मुलगा म्हणून ज्या अनेक सवलती मुलाला मिळालेल्या असतात, त्या सर्वावर आता मात्र नववधूची बंदी आलेली असते. उठण्या-बसण्याच्या वेळेपासून तर जेवणा-फिरण्याच्या बाबतीतही पत्नीची रोकटोक हळूहळू सुरू होते. सुरूवातीला पतीला सुध्दा बरे वाटते. आपल्याला कुणीतरी हक्काने, प्रेमाने सांगते, आपल्याला विनंतीवजा आज्ञा करतेय यातही पतीला सुख मिळत असतं.
याच्या उलट पत्नीचे होते,