आदिवासी नेतृत्व परिचय उपक्रम

13 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Nov 19, 2016, 11:39:17 AM11/19/16
to AYUSH | adivasi yuva shakti

जोहार ! 
आदिवासी नेतृत्व परिचय उपक्रम : *झारखंड येथील कार्यकर्ते महाराष्ट्र दौऱ्यावर*
झारखंड मधील बिशुनपूर चे आमदार चामरा लिंडा हे देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधींना भेटत आहेत, आदिवासी प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर लोकप्रतिनिधींचा दबाव गट तयार करण्यासाठी असा प्रयत्न गरजेचा आहे. १९-२० नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधींशी त्यांची भेट करून देण्यात येईल. २१ रोजी नाशिक येथे, २२ रोजी पुणे येथे, २३ रोजी नागपूर येथे काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्याचे योजले आहे.

# १९/११ रोजी : काळुराम काका धोदडे, वाहरू सोनावणे, राजू पांढरा, दत्ता करबट, डॉ सुनील पऱ्हाड (आदिवासी कार्यकर्ते), विष्णू सावरा (आदिवासी विकास मंत्री), राजेंद्र गावित (माजी आदिवासी विकास राज्य मंत्री), विलास तरे (बोईसर आमदार), तसेच इत्तर लोकप्रतिनिधी ची भेट व केळवे येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम 
# २०/११ रोजी : चिंतामण वनगा (खासदार पालघर), पास्कल धनारे (आमदार डहाणू), लहानू कोम (माजी आमदार/खासदार), राजाराम ओझरे (माजी आमदार), तसेच इत्तर लोकप्रतिनिधी भेट आणि कासा येथील आदिवासी क्रांतिवीर जयंती प्रबोधन कार्यक्रम

त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी/कार्यकरते यांच्याशी भेट करून देण्यासाठी आपल्या पैकी कुणी दायित्व घेण्यास किंवा भेटी दरम्यान चर्चेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास संपर्क करावा. (संपर्क ० ९२४६ ३६१ २४९)

जागो आदिवासी जागो । www.jago.adiyuva.in

Reply all
Reply to author
Forward
0 new messages