स्टेट बँकेची शैक्षणिक कर्ज योजना
कोणत्या अभ्यासक्रमांसाठी कर्ज मिळू शकतं?
देशांतर्गत शिक्षणासाठी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिग्री, डिप्लोमा कोर्सेस, व्होकेशनल ट्रेनिंग. इत्यादी अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज मिळू शकतं. परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर तेथील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या अभ्यासक्रमासाठी, जॉब ओरिएंटेड प्रोफेशनल, टेक्निकल कोर्सेससाठी, तसेच एमसीए, एमबीए, एमएस इत्यादी अभ्यासक्रमांसाठी कर्ज मिळू शकतं.
किती कर्ज मिळेल?
भारतातच शिक्षण घ्यायचं असेल तर सध्या जास्तीत जास्त दहा लाख रुपये आणि परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त तीस लाख रुपयांपर्यंंंंत शैक्षणिक कर्ज मिळू शकतं.
कर्जात कोणकोणत्या खर्चाचा समावेश होतो?
कॉलेज, होस्टेल, परीक्षा फी, पुस्तकं, उपकरणं, शैक्षणिक कारणासाठी संगणक, लॅपटॉप, प्रवास, स्टडी टूर, प्रोजेक्ट. इतकंच काय, बाइकसाठीही पन्नास हजार रुपयांपर्यंंंंतची रक्कम मिळू शकते.
व्याजदर किती असेल?
व्याजदर बदलत असतो. त्या त्या वेळेला व्याजाचा जो दर निश्चित केलेला असतो, त्यानुसार व्याजआकारणी केली जाते.
कागदपत्रे कोणती लागतील?
शैक्षणिक अर्हतेच्या पुराव्यासह कर्जासाठीचा पूर्ण भरलेला अर्ज, दोन फोटो, निवास, पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा, ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे, त्या संस्थेचा, अमुक इतकी फी हवी आहे हे सांगणारं संस्थेचं पत्र. यासारखी कागदपत्रं लागतात. त्यांची सविस्तर यादी बँकेकडून दिली जाते.
कर्जफेडीचा कालावधी किती?
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांनंतर (यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर) कर्जफेडीला सुरुवात होते. पाच ते सात वर्षंंंं एवढा कर्ज परतफेडीचा कालावधी आहे. मासिक हप्त्यानंही परतफेड करता येते.
तारण काय द्यावं लागेल?
चार लाखाच्या आतलं कर्ज असेल तर त्यासाठी तारणाची आवश्यकता नाही. त्यापुढच्या कर्जासाठी मात्र नियमाप्रमाणे आणि रकमेनुसार तारण घेतलं जातं.
(पूरक माहिती - बाबूलाल बंब, क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाशिक)
इतर बँकांच्या कर्जयोजनाही थोड्याफार फरकानं अशाच आहेत. विद्यार्थ्यांंंंच्या माहितीसाठी स्टेट बँकेच्या योजनेची माहिती दिली आहे.
--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.
Assistant Professor,
University Department of Physics,
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile -
9869197376e-mail:
che...@physics.mu.ac.in
che...@mu.ac.in