|| आयुश उपक्रम - सूचना : नोव्हे २०१६ ||

14 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 10, 2016, 1:42:32 PM11/10/16
to AYUSH google group
*|| आयुश उपक्रम - सूचना : नोव्हे २०१६ ||*

आदिवासी समाजात असलेल्या नैसर्गिक स्वावलंबी, मेहनती, प्रामाणिक, सामाजिक एकोपा, वैज्ञानिक दृष्टीकोन, पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक ठेवा इत्यादींचे जतन करून सामाजिक चळवळ मजबुती च्या जागरुकते साठी आपण गेली १० वर्षे विविध माध्यमातून प्रयत्न करत आहोत. (संकल्पना १९९९ पासून, ऑनलाईन २००७ पासून, नोंदणी २०११ पासून)

विविध क्षेत्रातील संपर्क वाढवून ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी कामी यावे या हेतूने आपण विविध उपक्रम राबवतो आहोत. आपल्या माहिती साठी 

*१) महाराष्ट्र कला महोत्सव । आदिवासी परंपरा प्रदर्शन आणि प्रात्येक्षिक*
दादर येथे रवींद्र नाट्यमंदिर येथे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवात आदिवासी परंपरा आणि कला याच्या प्रदर्शनासाठी आयुश ला निमंत्रित केले गेले आहे.  त्या निमित्ताने पुढील कार्यक्रमांचे नियोजन आहे (११ ते १३ नोव्हेंबर )
वारली चित्रकलेचे प्रदर्शन, प्रात्येक्षिक प्रशिक्षण : सकाळी ११ ते ७  (सामाजिक संदेश देणारी चित्रांचे प्रदर्शन, आणि प्राथमिक चित्रकला शिकवणी)
पारंपरिक आदिवासी नृत्य प्रदर्शन , प्रात्यक्षिक : सायंकाळी ६ ते ९  (कर्डन, गंजाड येथील नृत्य ग्रुप सहभागी 

आदिवासी समाजात असलेले पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक ओळख या विषयी शहरी माणसात जागरूकते साठी हा कार्यक्रम उपयोगी होईल. 
त्या निमित्ताने मुंबईत असल्यानी कार्यक्रमाला भेट देऊन आपल्या कलाकारांना प्रोत्साहित करावे. 

*२) आदिवासी नेतृत्व परिचय : झारखंड येथील कार्यकर्ते महाराष्ट्र दौऱ्यावर*
झारखंड मधील बिशुनपूर चे आमदार चामर लिंडा हे देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधींना भेटत आहेत, आदिवासी प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर लोकप्रतिनिधींचा दबाव गट तयार करण्यासाठी असा प्रयत्न गरजेचा आहे. १९-२० नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधींशी त्यांची भेट करून देण्यात येईल. २१ रोजी पुणे येथे काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा , नाशिक/नागपूर येथील आदिवासी नेतृत्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यास ते इच्छुक आहेत. त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी/कार्यकरते यांच्याशी भेट करून देण्यासाठी आपल्या पैकी कुणी दायित्व घेण्यास इच्छुक असल्यास संपर्क करावा. 

*३) अभ्यास कार्यशाळेत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व । इच्छुक प्रतिनिधींनी संपर्क करावा*
वसुधैव कुटुंबक तर्फे अयोजीत कार्यशाळे साठी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करण्या साठी विचारणा करण्यात आली आहे. कार्यशाळेचा विषय आहे *“Religions and Medical Ethics Collaborating for Peace and Harmony in this World”.*
यात आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक प्रतिनिधींनी संपर्क करावा (कार्यशाळे विषयी माहिती शेवटी दिली आहे). पेपर जमा करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत १२ वेग वेगळे धर्म त्यांचे विचार मांडणार आहेत. प्रथम विचार मांडण्याची संधी धर्म पूर्व संस्कृती आदिवासी समाजाच्या प्रतिनिधीना मिळणार आहे. २०१४ च्या कार्यशाळेत अशोक भाई चौधरी, २०१५ ला प्रांजन राऊत यांनी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व केले होते.  
 

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता. या विषयावर आपले मार्गदर्शन आणि अभिप्राय अपेक्षित आहे. Lets do it together!   
 
AYUSHonline team
www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९ 

AYUSHonline team

vishnu shelke

unread,
Feb 24, 2017, 11:36:34 AM2/24/17
to adi...@googlegroups.com
नमस्ते सरजी, महोदय यापूर्वी आपले वारंवार लेटेस्ट अप डेट्स व माहिती बातम्या येत असत आजकाल फारसे काही पाठवत नाहीत कृपया पाठवावे हि विनंती आपला 
     आण्णाभाऊ शेळके 
     

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuXci80mE1W46J5cDqvE_jPodqExXHZw3W59mYxy61-jw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages