|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० मे २०१६ ||

28 views
Skip to the first unread message

Warli Painting

unread,
30 May 2016, 14:36:4730/05/2016
to AYUSH google group

|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० मे २०१६ ||

 

आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांचे जगभर कौतुक होत असताना आपली नवीन पिढीची नाळ या आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवशक्यता आहे. तसेच आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया.

 

त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक आणि सकारात्मक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रयत्न करूया.

 

आपल्या माहिती साठी

 

1) वारली हाट निर्मिती चर्चा :

- वारली चित्रकला उपक्रम आणि रोजगार निर्मिती आणि आदिवासी  युवकांची भूमिका या साठी जिल्हाधिकारी भेटीच्या पूर्व तयारी चर्चा २४ एप्रिल रोजी चारोटी येथे पार पाडली. चित्रकार, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, बेरोजगार युवा सहभागी झाले होते.

- २५ एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी अभिजित भांगर यांच्या सोबत आयुश टिम चे प्रतिनिधी यांची चर्चा पार पडली. पारंपारिक ज्ञानाचा उपयोग करून (वारली चित्रकला) रोजगार निर्मिती विषयी आणि आयुश चे उपक्रम या संदर्भात एक तास चर्चा झाली.

 

२) आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रदर्शन : 

२१ ते २३ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या "ग्लोबल एक्झिबिशन ओन सर्विसेस २०१६" - Global Exhibition  on Services 2016 मध्ये बौद्धिक संपदा विभागा (Intellectual Property India) तर्फे वारली चित्रकला प्रदर्शन आणि  प्रात्यक्षिका साठी आयुश तर्फे संजय पऱ्हाड सहभागी झाले होते. अंतराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनातील औद्योगिक कार्यक्रमाचा अनुभव मिळाला. 

 

३) वारली चित्र एकत्रित मागणी :

चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी चेन्नई येथील क्राफ्ट कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील चित्रांची निवड होवून लवकरच २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सदरची मागणी १००चित्रे पुरुष चित्रकारांचा गट संजय दा पऱ्हाड यांच्या नेतृत्वात तसेच १०० चित्रे महिलां चित्रकारांचा गट शर्मिला ताई घाटाळ यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहोत. (संपर्क करून सदर कार्यात सहभागी होवू शकता )

 

४) वारली चित्र विक्री साठी करार चर्चा :

चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे साठी इन्फ़ीस्त्रायीद्स (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि संकेत आयुश भेटी साठी ३जून रोजी वाघाडी येथे येत आहेत. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या कंपनी तर्फे असेलेले उपक्रम या विषयी चर्चा होणार आहे.

 

५) वारली चित्र संस्कृती आणि परंपरा या विषयी चर्चा :

 - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई (National Institute of Fashion  Technology) येथून प्रा निकिता आणि ८ विद्यार्थी हे १ जून रोजी डहाणू येथे येत आहेत. येथे १० दिवस राहून विविध कलाकार/अभ्यासक/आयुश सोबत चर्चा आणि अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार केला जायील.

- महाराष्ट्रातील आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी जीवन शैली, कला , संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड येथील आर एफ एस इंटरटेंटमेंट (RFS Entertentment) कंपनीच्या भारताच्या विभागाच्या एम डी श्रीमती वरुणा राणा यांनी २९ मे रोजी तलासरी येथे भेट देवून स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी येथे आयुश ला भेट देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच संपत दादा ठाणकर यांच्या सोबत चर्चा होणार आहे.  

 

६) शासकीय पातळीवर आदिवासी कला अभ्यासक्रम निर्मिती :

आदिवासी  कला आणि पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती अभ्यासक्रम निर्माण करण्या हेतू केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास विभाग  (Ministry of Skill Development and Entrepreneurship Development) तर्फे आयुश ला अभ्यास भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट  डहाणू - वाघाडी येणार आहे. सदर विषयी चर्चेत सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा (पहिली बैठक मुंबई येथे झाली होती). लवकरच दिल्ली कार्यालयातून तारीख कळवली जायील

 

७) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण :

लाकडी वस्तू, कारागिरी, बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा संबधित मार्गदर्शन केले जायील. सदर उपक्रमात इच्छुक छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात. 

 

८) कलाकृती विक्री :

आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

 

९) कलाकृती विक्री :

आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत करार/नोंदणी  करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249).

आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.  Lets do it together!

 

१०) भिंती चित्र निर्मिती  :

नाहूर येथील आय ओ टी इन्फ्रा (IOT Infrastructure) या कार्यालयात भिंतीवर वारली चित्रकला शर्मिला ताई आणि त्यांची टीम ने कार्य पूर्ण केले. पुढच्या आठवड्यात बेंगलोर येथे नवीन घरात भिंतीवर चित्र काढण्या साठी मागणी आहे, इच्छुक कलाकारांनी संपर्क करावा

 

११) सहकार्य आणि सहभाग  :

सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, इत्यादी) संपर्क करून सहभागी व्हावे

 

# आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया.  हेच आयुश आहे.

Lets do it together!  

 

AYUSHonline team

www.adiyuva.in | www.warli.in

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

 

Aim of our Initiative through Warli Painting

माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation


Inline image 3

Inline image 1

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
30 May 2016, 14:39:1930/05/2016
to AYUSH | adivasi yuva shakti

नाहूर येथील आय ओ टी इन्फ्रा या कार्यालयात भिंतीवर वारली चित्रकला शर्मिला ताई आणि त्यांची टीम ने कार्य पूर्ण केले. पुढच्या आठवड्यात बेंगलोर येथे नवीन घरात भिंतीवर चित्र काढण्या साठी मागणी आहे, इच्छुक कलाकारांनी संपर्क करावा

 

११) सहकार्य आणि सहभाग  :

सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, इत्यादी) संपर्क करून सहभागी व्हावे

 

# आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया.  हेच आयुश आहे.

Lets do it together!  

 

AYUSHonline team

www.adiyuva.in | www.warli.in

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

 

Aim of our Initiative through Warli Painting

माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation




vishnu shelke

unread,
8 Jun 2016, 10:23:0808/06/2016
to adi...@googlegroups.com
Congratulations sirji ....
       wish you all the best to your team and your devotion ...
            can you arrange one or two days basic informational & skilled  free training workshop for tribal youth of Pune city ? If possible please send me details...
                  yours  faithfully
        Annabhau  Shelke
  President of ADIM YOUNG  GLADIATORS 

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c32ca124-24a2-4c17-a00e-bbaafaee5745%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Warli Painting

unread,
13 Jun 2016, 11:56:5513/06/2016
to AYUSH google group
Yes Definitely Sir, Lets do it together!

Due to preparation of agricultural work (pre mansoon) Almost artisans are pre occupied, Lets identify suitable schedule for workshop at pune soon. will get in touch with you. 

Request to all, Let us know if anyone wanted to organise Tribal art/Culture workshop at your location, Lets do it  together! 

Thanks & regards

Reply all
Reply to author
Forward
0 new messages