|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० नोव्हेंबर २०१६ ||

56 views
Skip to first unread message

Warli Painting

unread,
Dec 2, 2016, 2:50:25 PM12/2/16
to adi...@googlegroups.com

*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० नोव्हेंबर २०१६ ||*

 

पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, निसर्ग, पर्यावरण, जैव वैविध्यता जतन करून मानव तसेच सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे जग आशेने बघत असताना. आज आदिवासी समाज अगदी नाजूक वळणावर आहे एकीकडे समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होते आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावते आहे, पिढी च्या पिढी हळू हळू व्यसनातून नष्ट होते आहे, रोजगार डोळ्यासमोरून जात आहेत, हक्क डावलले जात आहेत, योजना प्रत्येक्ष पोचत नाहीत, सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे, .... (यादी खूप मोठी आहे)

 

असो, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास करून *प्रत्येक क्षेत्रात समाज हित जपून एकमेकांना पूरक रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन/प्रत्येक्ष उपक्रम सुरवात /सहकार्य /सहभागी होऊन आपण जर प्रयत्न केले आणि या समस्यांच्या मुळाशी जाऊन कायमची उपाययोजना करून प्रत्येक्ष कृतीत उतरवली तर  नक्कीच समाजाला आपण चांगले भविष्य देऊ शकतो. त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया.*

 

याच प्रेरणेने आपण गेली काही वर्षे आयुश या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. *आयुश बद्दल २ शब्द* १९९९ पासून आयुश च्या संकल्पनेला सुरवात झाली. सामाजिक चळवळींचा अभ्यास आणि निरीक्षण करून समाज हित प्राथमिकता ठेवून समाजातूनच प्रयत्न व्हावे आणि त्यात युवकांचा सहभाग वाढवावा या साठी २००७ पासून विविध कार्यक्रम घेणे चालू केले. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. आणि सध्या वेग वेगळ्या माध्यमातून समाज जागृतीचे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या माध्यमातून अधिक प्रभावी बनवतो आहोत.

 

आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान जतन (आदिवासी कला -वारली चित्रकला) उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. हीच मार्गदर्शक दिशा ठरवून आपण विविध उपक्रम करतो आहोत.

 

माती : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करणे

पाणी : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता वाढवणे

चावूल : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे

 

या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी 

 

[चावूल]

१) *आदिवासी पारंपरिक कला अभ्यास* : वारली चित्राला चे प्रात्यक्षिक आणि परंपरा समजून घेण्यासाठी विविध अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी भेट देतात किंवा मेल द्वारे माहिती मागवतात. या महिन्यात बोरिवली हुन भेट वस्तू निर्मिती त काम करणाऱ्या जास्मिन शाह, दिल्ली येथील फॅशन टेकनॉलॉजितले तुषार जैन, चित्रकलेतील मुंबईतून स्नेहल, जे जे कला महाविद्यालयातील हर्षद पदथारे यांनी भेट दिली त्यांना खंबाळे येथे संजय दा पऱ्हाड यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील आर्किटेक्चर कॉलेज मधून फरीदा, विरार येथून स्वाती लवकरच डहाणूला भेट देणार आहेत.

हर्षद प्रोफेशनल छायाचित्रकार असून आयुश साठी छायाचित्रीकरण करून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत.

 

२) *नवीन इमारतीत भिंतीवर चित्रकला* :

- नाशिक येथील एकता ग्रीन वीला यांच्या नवीन बांधलेल्या इमारतीत मोठ्या आकाराची २४ चित्रे काढण्यासाठी चौकशी आली आहे, चर्चा चालू आहे. निश्चित झाल्यावर काही कलाकार नाशिक येथे जाऊन ते पूर्ण करतील

- केरळ मधील एका मठात मोठ्या भिंतीवर वारली चित्र काढण्यासाठी चौकशी आली आहे, चर्चा चालू आहे. निश्चित झाल्यावर काही  कलाकार तेथे जाऊन पूर्ण करतील

- मुंबईतील स्वयंसेवी संस्था विविध कार्यशाळा तयार करतात त्यांना भिंतीवर वारली चित्र काढण्यासाठी चौकशी आली आहे.

 

३) *आदिवासी जीवन संस्कृती दर्शन अनुभव* :

- जर्मनी येथील क्रिस्ता आणि गुंटर न्यूयॉनहोफर हे जोडपे दर वर्षी भारतात येतात. आदिवासी जीवनशैली आणि संस्कृतीजीवन जवळून बघण्यासाठी त्यांनी ओडिशा, उत्तर पूर्वेकडील राज्यांना भेट दिली आहे. या वर्षी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी परिसर अनुभवण्यासाठी आले आहेत. दिनांक ४ रोजी नाशिक येथून सुरवात करून मोखाडा, जव्हार, विक्रमगड, कासा, तलासरी, डहाणू, पालघर, मनोर, विक्रमगड, खानवेल इत्यादी परिसरातील पांड्याना भेट देऊन आदिवासी जीवन शैली अनुभवली. ४ दिवस अभिजित पिलेना त्यांना मार्गदर्शन केले.

- फ्रांस येथून श्री मायकल फेणेलुक्स हे निवृत्त प्राध्यापक (जागतिक अर्थव्यवस्था), आणि त्यांच्या पत्नी निवृत्त करियर मार्गदर्शक हे २०११ पासून डहाणू परिसरात आदिवासी संस्कृती आणि जीवनशैली अनुभवण्यासाठी येतात. तसेच जग भरतील आदिवासी कलाकृती अभ्यासणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे. संजय दा पऱ्हाड यांच्या वारली चित्रांचे प्रदर्शन ते फ्रांस मध्ये प्रदर्शन दार वर्षी भरवतात आणि आदिवासी संस्कृती आणि परंपरा विषयी तेथील नागरिकात जागरूकता/प्रसार करतात. ८ डिसेंबर ला १० दिवसांसाठी ते डहाणू येथे आयुश कडे येत आहेत. (२०११ वाघाडी येथील भेटी दरम्यान चे त्यांचे अनुभव येथे बघता येतील - https://youtu.be/wM0L0TMP3fo)

 

[पाणी]

४) *पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव* : रवींद्र नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे ८ ते १५ पर्यंत होणाऱ्या कला महोत्सवात आदिवासी कला जीवन प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक साठी आयुश कडून ११ ते १३ रोजी (११ ते ६ पर्यंत) वारली चित्रकला चे प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन आणि ६ ते ८ वाजेपर्यंत आदिवासी पारंपरिक नृत्य चे प्रात्यक्षिक दिले.

- गंजाड येथील युवकांनाच नृत्य पथक, करडन येथील नृत्य पथक यांनी तारपा, टिपरी, धुमस्या, कामडी, डाक भगत, मांदळ इत्यादी नृत्य प्रकार यांचे प्रात्यक्षिक प्र्रेक्षनकांचे आकर्षण ठरले होते.

- प्रशस्थ हॉल मध्ये वारली चित्रांमधून सामाजिक जागरूकता करण्यासाठी संपत ठाणकर गुरुजींच्या कलाकृतींचे प्रदर्शन होते. मानवी मूल्य, पर्यावरण, निसर्ग, परंपरा, संस्कृती, स्थानिक इतिहास, सध्याच्या आदिवासी समाजाचे अस्तित्वाचे प्रश्न या विषयी ची मोठ्या आकाराची अंदाजे ५० चित्र आणि त्यांचे सविस्तर मार्गदर्शन सगळ्यांना खिळवून ठेवत होते. मुंबईतील माणसांसाठी एक पर्वणीच होती अश्या आशयाचे अनेक अभिप्राय नोंद वहीत मिळाले.

- संदीप दा भोईर यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण दिले, विविध वयोगटातील इच्छुकांनी सहभाग घेतला.

- शर्मिला ताई घाटाळा यांनी प्रात्यक्षिक दिले, अनेकांनी त्यांच्या सोबत चित्राचा सराव करून चित्र काढायचा प्रयत्न केला.

- अमित दा यांनी विक्री साठी कलाकारांनी जमा केलेल्या विविध कलाकृती विषयी माहिती दिली,  उत्सुकता म्हणून बघण्यासाठी गर्दी होत होती.

पु ल देशपांडे अकॅडमी कडून खूप चांगले सहकार्य मिळाले. या उपक्रमाच्या चौकशी च्या प्राथमिक चर्चे दरम्यान आयुश तर्फे प्रांजन राऊत, बबलू वाहुत, चेतन गुरोडा, प्रकाश भोईर, संजय पऱ्हाड तसेच इत्तर कारागीर सहभागी झाले होते

या उपराक्रमात तलासरी, डहाणू, पालघर, जव्हार, विक्रमगड तालुक्यातून ५२ कलाकार सहभागी झाले होते. अभिजित दा पिलेना यांनी पूर्ण वेळ प्रबंधक म्हणून दायित्व घेतले. सोबत बबलू वाहुत यांनी परिवारासोबत भेट देऊन सहकार्य केले. मुंबईतील हजारो माणसांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आदिवासी जीवनशैली जाणून घेतली. आदिवासी जीवनसंस्कृती, समाज, पारंपारिक ज्ञान, जीवन मूल्य या विषयी शहरी माणसात जागरूकता करण्यासाठी हा कार्यक्रम कामी आला.  पु ल देशपांडे अकॅडमी कडून खूप चांगले सहकार्य मिळाले. प्राथमिक चर्चे दरम्यान आयुश तर्फे प्रांजन राऊत, बबलू वाहुत, चेतन गुरोडा, प्रकाश भोईर, संजय पऱ्हाड तसेच इत्तर कारागीर सहभागी झाले होते. (कार्यक्रमातील छायाचित्रे येथे बघू शकता-  https://www.facebook.com/media/set/?set=a.1139383049448621.1073741858.122481367805466&type=1&l=ddc255d37e )

 

५) *आदिवासी कलाकार* : आदिवासी कलाकारांचे प्रोफाइल मार्केटिंग साठी, जिथे जिथे आदिवासी कलाकार सहभागी होतील त्याची माहिती एका ठिकाणी मिळावे या साठी प्रयोग करतो आहोत. आपल्या माहितीत असे काही कार्यक्रम/कलाकार व्हिजिट आल्यास जरूर कळवावे, आपण प्रसारित करूया 

दिल्ली - सांस्कृतिक मंत्रालय तर्फे राष्ट्रीय संसकृतिक महोत्सवात विजय वाडु सहभागी झाले होते १५ ते २३ ऑकटोम्बर

जपान - टोकियो येथील गाकुगेयी विद्यापीठ आणि इनीवाशिरो यथील यामागाटा शाळेत व्याख्यान आणि तेथील पुरातत्व संस्कृतीचा अभ्यास करून त्यावर वारली चित्र काढण्यासाठी तुषार वायेडा, मयूर वायेडा ५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जपान ला गेले होते.   

 

६) *स्थानिक पातळीवर कला बँक ची निर्मिती*

विविध गाव पाड्यावर विखुरलेले आदिवासी कलाकार, आणि कलाकृती सुरक्षित साठविण्यासाठीच्या अडचणी लक्षात घेऊन. कलाकृती एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या साठी आपण रेल्वे स्थानका जवळ (खंबाळे) आणि महामार्ग जवळ (वाघाडी) येथे कला बँक ची निर्मित करण्यात येणार आहे. परिसरातील कलाकारांनी आपल्या कलाकृती आणि नमुना कलाकृती जमा करून नोंदणी करावी. सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी उपयोगात आणावे. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना प्रोडक्ट्स वाघाडी/खंबाळे येथील अयुश केंद्रात जमा करावेत. आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. 

 

७) *पुणे येथे कला विक्री केंद्र* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

 

८) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*

वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora,

(नोंदणी/करार चर्चा चालू आहे) : Puro Kraft, हस्त वेमा

->> यादी आणखीन वाढते आहे.

 

[माती]

९)*संयुक्त राष्ट्र संघ च्या कार्यक्रमात सहभाग* : संयुक्त राष्ट्र संघा तर्फे जागतिक आदिवासी विषयावर नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनील पऱ्हाड यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. कार्यक्रम पुढील प्रमाणे .

16th session of the Permanent Forum on Indigenous Issues (24 April – 5 May 2017) - न्यूयॉर्क

10th session of the Expert Mechanism on the Rights of Indigenous Peoples (19 – 23 June 2017) - जिनेव्हा

निवड झाल्यास पुढील विषयावर प्रेझेन्टेशन सादर करण्यात येईल (जागतिक आदिवासी समाजाला जोडणारा दुवा मजबुती साठी प्रयत्न)

- पारंपरिक ज्ञान जतन करून रोजगार निर्मितीचे उपक्रमातून आर्थिक स्वावलंबन व सांस्कृतिक संपदा टिकविणे

- आदिवासी समाज काल, आज आणि उद्या : भारतातील आदिवासी समाजा समोरील आव्हाने आणि तरतुदी

सदर विषयावर काही इनपूट आणि आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे.

 

 

१०) *पारंपरिक ज्ञान जतन प्रकल्प* : समाजात विखुरलेले पारंपरिक ज्ञान विविध माध्यमातून संग्रहित करणे. या प्रकल्पात लिखाण, छायाचित्रीकरण, ध्वनी मुद्रण, चित्रीकरण, संग्रह करून सहभागी होऊन आपल्या समाजाची बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी हातभार लावूया. इच्छुकांनी संपर्क करावा.

 

११) *आदिवासी संस्कृती जागरण उपक्रम* : आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान या बद्दल जागरूकता करण्यासाठी विविध माध्यमातून शाळा/कॉलेज/पाडा/गाव/शहर या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे. आपल्या परिसरात असे कार्यक्रम आयोजित करून किंवा या साठी सहकार्य करून समाज जागृतीच्या कामाला हातभार लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा.

 

१२) *वारली हाट विकास समिती* : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत - अजून उत्तर येणे बाकी आहे

 या संदर्भात लेखी निवेदन जमा केले आहे : जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प अधिकारी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी विकास विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी विकास विभाग मुंबई,

सदर विषय प्रत्येक्ष चर्चा करून लेखी निवेदन जमा केले आहे : मंत्री/पालक मंत्री - आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.  आयुक्त - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण निवेदन देऊन चर्चा केली आहे.

 

१३) आपल्या माहिती साठी *वारली चित्रकला - बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शनी नोंदणी* : पारंपरिक आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन व्हावे या साठी २०१० पासून सर्व कार्यालयीन प्रक्रिया करून २०१५ मध्ये बौद्धिक संपदा नोंदणी पूर्ण झाली. या सगळ्या प्रक्रिये सगळे कार्य (आर्थिक आणि कार्यलयीन कामकाज ) आदिवासी युवकांनी स्वयंसेवी प्रेरणेने केले. (दुर्दैवाने कोणतीही शासकीय मदत नाही)

 

१४) आदिवासी नेतृत्व परिचय : झारखंड मधील बिशुनपूर चे आमदार चामर लिंडा हे देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधींना भेटत आहेत, आदिवासी प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर लोकप्रतिनिधींचा दबाव गट तयार करण्यासाठी असा प्रयत्न गरजेचा आहे. १९ नोव्हेंबर रोजी केळवा येथील बिरसा मुंडा जयंती, २० ला कासा येथील आदिवासी क्रांतिवीर जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गर्शन केले. तसेच पालघर जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींची भेट करून दिली गेली. २१ रोजी नाशिक येथील कार्यकर्त्यांशी, २२ रोजी पुणे येथे कार्यकर्त्यांशी बैठक झाली. काही दिवसांनी त्यांना तेलंगणा मधील आदिवासी लोकप्रतिनिधींशी भेट करून देण्यात येईल.

 

१५) आदिवासी विकास व्यवस्थापन पदव्यूत्तर अभ्यासक्रम : राष्ट्रीय ग्रामीण एवं पंचायती राज संस्थान हैदराबाद मार्फत आदिवासी विकास व्यवस्थापन पदव्यूत्तर दूरस्थ अभ्यासक्रम, ६ व्या बॅच च्या प्रवेशा साठी जाहिरात आली आहे. एक वर्षाचा अभ्यासक्रम असून यात आदिवासी विकासाचे विविध पैलू आणि प्रसाशन व्यवस्था या बद्दल विस्तृत माहिती आहे. आदिवासी समाजा साठी रचनात्मक कार्य करण्यासाठी इच्छुकांनी जरूर प्रवेश घ्यावा (प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर होती). आयुश टीम कडून सचिन सातवी यांनी या अभ्यासक्रमात ५ व्या ब्याच ला प्रवेश घेतला आहे. २३ डिसेंबर ला अंतिम परीक्षा आहे.

१६) *इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती*

प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली चित्र).  सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. अजून उत्तर मिळाले नाही

 

17) *शासकीय पातळीवर आदिवासी कला अभ्यासक्रम निर्मिती* : आदिवासी  कला आणि पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती अभ्यासक्रम निर्माण करण्या हेतू केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास विभाग  (Ministry of Skill Development and Entrepreneurship Development) तर्फे आयुश ला अभ्यास भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट  डहाणू - वाघाडी येणार आहे. सदर विषयी चर्चेत सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा (पहिली बैठक मुंबई येथे झाली होती). लवकरच दिल्ली कार्यालयातून तारीख कळवली जायील

18) दिनांक ९ डिसेंबर २०१५ रोजी पुणे MSCERT येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) यांच्या स्थरावर आदिवासी बोली भाषा साहित्य प्रमाणीकरण समिती ची पहिली बैठक  पार पडली. परिषदेने २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रातील आदिवासी बोली भाषा बोलणाऱ्या १६ जिल्ह्यातील १० आदिवासी बोली भाषांची निवड करून त्या भाषांमध्ये "ओढ्या काठी" व "खेळच खेळ" या दोन शीर्षकांची निर्मिती करून अनुवाद केला आहे. हि दोन शीर्षके १६ जिल्ह्यातील शाळांना पुरवली जाणार आहे. पुस्तक छपाई पूर्वी हे साहित्य आदिवासी बोली भाषा प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करण्यासाठी समितीची सभा अयॊजित केली होती. अजून पुढील प्रक्रियेविषयी उत्तर अपेक्षित आहे

समिती सहभागी झालेले सदस्य : सीताराम मंडाले, सचिन सातवी, सुनील गायकवाड, रमजान गुलाब तडवी, सुभाष मेंगाळ, देविदास हिंदोळे, जितेंद्र सुळे, सी के पाटील, वनमाला पवार, लहू गांगड.

पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १० बोली भाषा : वारली, भिली, पावरी, मावची, निहाली, परधान, गोंडी, कोलामी, कोरकू, कातकरी.

9) *सहकार्य आणि सहभाग*:

सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय,चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर, आर्थिक साहाय्य, नवीन आयडिया देणे, संपर्क वाढविणे, जाहिरात करणे, इत्यादी) 

 

 *#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* : https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता.

 

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. *आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !*

Lets do it together!  

 

AYUSHonline team

www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

 

Aim of our Initiative through Warli Painting

माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation 

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Dec 3, 2016, 9:35:05 AM12/3/16
to AYUSH | adivasi yuva shakti, in...@warli.in





चेतन Chetan

unread,
Dec 5, 2016, 2:30:40 AM12/5/16
to adi...@googlegroups.com
वारली हि फक्त चित्रकल नसून आदिवासींचे देव देवतांचे सांकेतिक स्वरूपातील चित्रण (representation) आहे हे प्रकर्षाने का मांडले जात नाही ?
आज जो तो बिगर आदिवासी उठतो आणि वारली चित्रकलेची पूर्ण माहिती ण घेता व्यवसाय करतो. कुठे हि चित्र काढली जाताहेत भिंतीवर कपड्यावर, कोणी वर्ल्ड रेकोर्ड करतोय  इ. लोक तंबाखू पान खून थूकताहेत हि देवदेवतांची विटंबना थांबवायला हवी.
 Inline images 3

Inline images 1Inline images 2


--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/241fdadd-0c7a-400c-9736-06e6bdb66c97%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages