*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० सप्टेंबर २०१७ ||*

43 views
Skip to first unread message

Warli Painting

unread,
Oct 14, 2017, 4:03:20 PM10/14/17
to AYUSH google group
*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० सप्टेंबर २०१७ ||*

जोहार !

आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि गेल्या हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !

हा एक प्रयोग आहे, आपण पण आपल्या परिसरात याहून अधिक उत्तम उपक्रम सुरु करावेत किंवा अशे उपक्रम प्रभावी करण्याकरिता हातभार लावूया. *आपल्या उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि प्रामाणिक इच्छा!*

या महिन्यातील काही घडामोडी आपल्या माहिती साठी उदाहरण म्हणून,

[अदिकला]

१) वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनौपचारिक भेट : (३० सप्टेंबर - १ ऑक्टोबर)
एन पी सी आय येथील वरिष्ठ अधिकारी शनिवार आणि रविवार असे २ दिवस अनौपचारिक भेटीतून वारली चित्रकला आणि कलाकारांचे काम बघण्यासाठी आले होते. एना येथे वनश्या दा भुजड यांच्याकडे लाकडाच्या वस्तू, ग्रीटिंग कार्ड्स, तारपा इत्यादी, खंबाळे येथे संजय दा पऱ्हाड यांच्याकडे चित्र, लाकडाचे सामान, जूट बॅग इत्यादी बघितले. नंतर गंजाड येथे जिव्या बा म्हसे, त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव यांची भेट घेऊन त्यांची कलाकृती बघितली. त्या नंतर संध्याकाळी गंजाडच्या दसर जत्रेतील तारप्यावर नाचणारी नवीन पिढी बघून दाभोसा येथे निवासाच्या दिशेने प्रवास. रविवारी जव्हार येथे प्रकाश दा पिटोळे आणि रवी सापटे यांनी वारली चित्र दालन दाखविले, परतीच्या प्रवासात विक्रमगड येथे सुनील दा खरपडेंच्या वारली चित्र दालन ले भेट दिली. सचिन दा आणि डॉ अमित दा सातवी यांनी त्यांना भेटी दरम्यान मार्गदर्शन केले एकंदरीत त्यांचा अनुभव चांगला असल्याचा प्रतिसाद मिळाला.
*शिकण्यासाठी* : प्रत्येक गोष्टीतील बारकाव्यांचा अभ्यासपूर्ण निरीक्षण करणे
 
२) वरिष्ठ शिक्षकाचा अभ्यास दौरा : (३० सप्टेंबर - १ ऑक्टोबर)
कर्नाटक धारवाड येथील वरिष्ठ शिक्षक, म्युझिक कम्पोजर आणि नाटक कलाकार जगदीश मालीगी हे त्यांच्या विद्यार्थिनी शाळेत वारली चित्र संस्कृती विषयी माहिती देण्याकरिता विविध कलाकारांच्या मुलाखती आणि प्रात्यक्षिक व्हिडीओ स्वरूपात दाखवून वारली चित्रकलेची ओळख करून देणार आहेत त्या करिता अभ्यास दौऱ्यावर ते डहाणू येथे आले होते. जितगाव येथे संपत दा ठाणकर यांनी वारली चित्र संस्कृती आणि परंपरा या विषयी सविस्तर माहिती दिली. वेती येथे संदीप दा भोईर यांनी आदिवासी संस्कृती आणि चित्रकला च्या विविध पैलूवर त्यांना माहिती दिली. कोंढाण येथे मधुकर दा वाडू यांनी विविध पारंपरिक आणि संदर्भिक उदाहरणासहित माहिती दिली. अभ्यास दौऱ्या दरम्यान मुलाखत आणि प्रात्यक्षिक याचे चित्रीकरण करण्यात आले. त्याचे एडिट करून कन्नड भाषेत माहिती पट बनवून शाळेत दाखविणार आहेत. त्यांनी वारली चित्रकलेचे पुस्तक कन्नड मध्ये भाषांतरित करण्यासाठी तयारी दाखविली आहे. लवकरच त्या संदर्भात सविस्तर उपक्रम केला जाईल. त्यांच्याकडे भाविप चे दक्षिण भारताचे सचिव पदाचे दायित्व आहे.
*शिकण्यासाठी* : विषयावर ठरवून दिलेल्या वेळेत आपल्या प्रतिक्रिया देऊन विषय समजावून सांगणे
 
३) सी एस आर प्रपोजल बैठक :
मुंबई येथील एन पी सी आय च्या कार्यालयात वारली चित्रकला संदर्भात सी एस आर प्रपोजल आयुश टीम ने सादर केले. त्यांच्या ची एस आर टीम च्या बोर्ड चे वरिष्ठ अधिकारी आणि इत्तर पॅनल उपस्तित होते. आयुश तर्फे चेतन दा गुरोडा (प्राचार्य मुंबई युनिव्हर्सिटी), बबलू दा वाहुत (अभियंता बेस्ट), डॉ सुनिल दा पऱ्हाड (डॉक्टर, ग्रामीण रुग्णालय), प्रांजण दा राऊत (अभियंता एयर इंडिया), सचिन दा सातवी (अभियंता ह्युंदाई संशोधन केंद्र) यांनी सादरीकरण केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रपोजल वर त्यांचे प्रश्न विचारून काही व्यवस्थापन/फलनिष्पत्ती/सस्टेनबलिटी संबंधित सुधारणा सुचविल्या. आणि संबंधित प्रपोजल वर सतीश प्रधान यांनी सविस्तर मार्गदर्शन केले त्या नुसार सदर प्रपोसलं मध्ये सुधारणा करणे चालू आहे.
*शिकण्यासाठी* : आपल्या कल्पना सगळ्यांना अगदी सोप्प्या भाषेत समजावून सांगणे
 
४) आयात निर्यात कोड नोंदणी :
आयात निर्याती साठी लागणारा आय इ सी क्रमांक नोंदणी केली आहे. त्यामुळे आता आयात आणि निर्यात सुलभ होऊ शकेल
 
५) हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषद नोंदणी :
हँडीक्राफ्ट एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल सभासद नोंदणी साठी अर्ज केला आहे. त्यानुसार त्यांनी केलेल्या चौकशी ची उत्तरे देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्या मुले विविध प्रकारे आपले आदिवासी कलाकृती निर्यात करण्यास हातभार लागेल
 
६) तारपा महोत्सव २०१७ :
आदिवासी विकास विभाग मार्फत तारपा महोत्सव साठी इ निविदा मागविल्या आहेत. काही तांत्रिक अडचणी मुळे निविदा ऑनलाईन जमा करणे शक्य झाले नाही. ते टेंडर पुन्हा मागवण्यात आले आहे. हा कार्यक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता प्रयत्न केले जातील

६) अभ्यास भेट :
नंदुरबार येथील एक प्राध्यापक वारली चित्रकलेचे प्रात्येक्षिक बघण्यासाठी भेट देणार आहेत. तसेच नंदुरबार येथील एक कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा गट त्यांच्या प्राचार्यासोबत येथील अभ्यास भेटीसाठी येत आहेत 

[Most Urgent!!] *७) वारली पेंटिंग ची पायरसी करून ट्रेडमार्क नोंदविल्याबद्दल आक्षेप नोंदविणे*  

नेदरल्यांड येथील फर्स्ट टेक्नॉलॉजि या कंपनीने वारली पेंटिंग असलेले दिवे या साठी ट्रेडमार्क मिळवले आहे, मुंबई येथील बौद्धिक संपदा विभागा तर्फे प्रकाशित जनरल मध्ये  सदर प्रकरण प्रकाशित केले गेले आहे , नियमा नुसार ४ महिन्याच्या आत या विषयी आक्षेप नोंदवू शकतो.

पिढ्या ना पिढ्या जतन केलेली सदर कला आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा आहे, यावर कोणतीही संस्था/कंपनी/व्यक्ती स्वामित्व मिळवू शकत नाही. वारली चित्रकलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये नोंद हि झालेली आहे. त्या साठी आपण सदर कार्यालयात लीगल एक्स्पर्ट मार्फत आक्षेप नोंदविणार आहोत.

या विषयी शासकीय पातळीवर चर्चा व्हावी या साठी लेखी अर्ज पाठवले होते : राष्ट्रीय अनुसूचित जमाती अयोग चेअरमन, सदस्य, विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य राज्यपाल, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास सचिव महाराष्ट्र व गुजरात, आदिवासी विकास कमिशनर, आदिवासी विकास अप्पर कमिशनर ठाणे, कमिशनर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र व गुजरात, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, टेक्स्टाईल मंत्री, सचिव, आयुक्त, संचालक हस्तकला विकास. 

या विषयी नियम नुसार ट्रेडमार्क रजिस्टरी ऑफिस मध्ये आक्षेप नोंदविले आहेत. (एकूण ६ प्रकरणे सदरील कंपनी कडून नोंदविली गेली होती)

*८) आगामी महिला विशेष उपक्रम* -
परंपरागत आदिवासी समाज महिला सशक्तीकरण करिता आदर्श मानले जाते. पण सध्या बदलत चाललेल्या (इत्तारांचे अंधानुकरण) घडामोडी मुळे समाजात असलेले स्त्री चे महत्व या विषयी पुन्हा जागरूकता करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुयीन, सवासीन, धवलेरी, कऱ्हवली, इत्यादींचे सांस्कृतिक महत्व सोबत महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग, आर्थिक सशक्तीकरण या साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत.

ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० महिलांचा चा गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी.   

*९) सहकार्य आणि सहभाग*:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. ओन लायीन : मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, नवीन आयडिया देणे, जाहिरात करणे

क्रिएटिव्हिटी : कल्पक सूचना, माहिती, प्रकल्पासाठी 

तांत्रिक सहकार्य : चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर करणे

उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शन, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे, उपक्रमाचे नेतृत्व करणे, 

ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणे, युवाना मार्गदर्शन, ग्रामीण संपर्क वाढवणे,

आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणे, वार्षिक/मासिक स्वरुपात आयुश संचय निधी मध्ये संकलन करणे, आर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे

अधिक माहिती साठी काही लिंक्स -
* या उपक्रमाच्या अपडेट्स - https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli
* उपक्रमात सहभागी होण्या करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) नोंदणी करावी

Towards constructive tribal empowerment, Lets do it together!
आयुश । आदिवासी युवा शक्ती 
संपर्क : ०९२४६ ३६१ २४९, ay...@adiyuva.in

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!
Aim of  this Initiative through Warli Painting

माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

चेतन Chetan

unread,
Oct 17, 2017, 12:53:38 PM10/17/17
to adi...@googlegroups.com
एक करेक्शन
प्राचार्य नाही सहाय्यक प्राध्यापक चेतन गुराडा असे हवे

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtQG5jjt1a7gnvKs84xzawR7cJf5pcfjGv5o1ynPMFxoA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages