*वयक्तिक अनुभव* : तंत्रज्ञान वापरण्यासाठी संस्कार आपण हरवतो आहोत

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 22, 2018, 6:20:48 AM1/22/18
to AYUSH google group
*वयक्तिक अनुभव* : तंत्रज्ञान वापरण्यासाठी संस्कार आपण हरवतो आहोत

_एक लहानसा चांगला निर्णय - हायवे अँड रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री तर्फे त्वरित कार वर वापरण्यात येणारे बुल बार बंद करण्यात आले आहेत._

गेली १० वर्ष ऑटोमोबाईल रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रात [भारत आणि जागतिक वाहने] काम करत असल्या मुळे या क्षेत्रात जागतिक तंत्रज्ञान आणि विविध देशात असलेले नियम अभ्यासावे लागतात. वाहन डिझाईन करताना सगळ्यात जास्त महत्व रस्त्यावरील पादचारी ची सुरक्षेला असते, त्या नुसार बम्पर, फ्रंट एन्ड मॉड्युल, इंजिन रूम डिझाईन केलेले असते. काही विशेष मटेरियल आणि तंत्रज्ञान वापरून गाडीचा पुढचा हिस्सा मऊ बनवला जातो, जेणेकरून अपघातात लागणार धक्का ऍबसॉरब करून पादचारीला हानी होणार नाही. अपघात होताना संपर्क होणारे अवयव उंची वय या सगळ्यांचा विचार करून स्टायलिंग तपासली जाते. सध्या विविध कंपन्यांच्या नवीन नवीन गाड्या भारतात धावत आहेत.

आपण आपल्या भौतिक सुखा साठी सगळे यंत्र/तंत्रज्ञान आपल्याकडे आणले, *दुर्दैवाने ते वापरण्याचे संस्कार आपण हरवून बसलो आहोत* असे सांगण्याची परिस्तिथी आली आहे. गाड्या/बिल्डिंग/विमान/मोबाईल/व्हाट्सअप आले पण माणसा माणसातले आणि समाजातले अंतर वाढते आहे. गाडी वापरणारा म्हणजे खूप मोठा माणूस, रस्त्यावर चालणारे/सार्वजनिक वाहने वापरणारे सगळे किडी मुंगे अशी भावना न कळत प्रत्येकाच्या वागण्यात तयार होते आहे. आर्थिक स्वार्थ इतका महत्वाचा वाटतोय कि आपल्या गाडीला काही होऊ नये या साठी वेग वेगळे लोखंडाचे बार लावले जातात (जे अतिशय घातक आणि धोकादायक आहेत), क्रॅशप्याड वर विविध वस्तू ठेवल्या जातात, इत्यादी इत्यादी. भारतात गाडी चालवताना एक वेगळे अटीट्युड बाळगले जाते, वेग, शिस्त, नियम, सुरक्षा या सगळ्यांचा खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भारतात खूप मोठी यादी बनवण्या इतके धोकादायक प्रकार एक प्रेस्टिज म्हणून वापरले जातात आणि नाहक हजारो बळी घेतले जातात. भारत खूप संस्कारित देश आहे, उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे, पण पुढील आकडे बघितले कि मन खीन्न होते. 

भारतात रस्त्यावर *प्रत्येक तासाला ५५ अपघात होतात आणि १७ मृत्यू होतात*.
वर्षभरात *५ लाख जखमी, १.५ लाख माणसे मृत्यू* रस्ता अपघातात होतात
- अपघात ग्रस्थात ५३% युवा वर्ग वय वर्ष ३४ च्या आतले आहेत
- ८०% अपघाताचे कारण चालकाची चूक (६०% प्रकरणात अति वेग हे कारण)

अशीच परिस्तिथी या सगळ्या प्रचंड वाहनांच्या ताफ्यातून आणि त्या बनवताना लागणाऱ्या उद्योगातून पर्यावरणाची ना भरून येणारी हानी करतो आहोत. (प्रत्येक मिनिटाला संपणारे लाखो लिटर खनिज तेल आणि प्रचंड प्रमाणात तयार होणारे विषारी वायू आणि सोबत संपणारी जंगले)

हीच प्रवृत्ती आता आपल्या जीवन शैलीचा भाग बनला आहे. *वयक्तिक स्वार्थ, जीवघेणी स्पर्धा, भौतिक सुखाला प्राथमिकता, अर्थार्जनाची ओढ, विकसित देशांचे आंधळे अनुकरण इत्यादी आणि अनेक इत्तर गोष्टीमुळे आपला आणि आपल्या विकासाचा वेग/ओढ इतका प्रचंड वाढला आहे कि आपल्याना शुद्ध हवा पाणी अन्न आरोग्य आनंद देणारे जल जंगल जमीन पर्यावरण निसर्ग आणि सगळी जीवश्रुष्टी (सामान्य आदिवासी धरून) यांच्या पेक्षा ह्या सगळ्यांना हानी करून तयार होणारे मानव केंद्रित भौतिक सुखाच्या प्रकल्प महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे वाटतात*. म्हणून तर शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या प्रश्ना पेक्षा धरण, पोर्ट, बुलेट ट्रेन, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, सागरी महामार्ग, एक्सप्रेस हायवे, अश्या अगणित प्रकल्प अति जलद वेगाने पूर्ण करण्यासाठी अट्टाहास करतोय आणि त्यासाठी साम दाम दंड भेद या मार्गानी पूढे जातो आहोत.

ज्या गतीने आपण नैसर्गिक स्रोत प्रदूषित/संपवीत आहोत त्या गतीने त्यांचे पुनर्जीवन/जतन केल्याचे किंवा तशी तयारी करण्याची आपली तयारी नाही. हि फक्त इन्फ्रास्ट्रुक्चरल हिंसा नाही तर संपूर्ण जीवश्रुष्टीला धोक्यात आणणारे व्हाईट कॉलर प्रोजेक्ट आहे ज्यातून काही उद्योजक, शासक, नोकरी करणारे, काम करणारे मोठी संपत्ती गोळा करू शकतील. पण त्याची किंमत सगळ्यांनाच भोगावी लागेल मग तो कोणत्याही जातीचा/भाषेचा/प्रांताचा/देशाचा/रंगाचा/वंशाचा/धर्माचा असूदेत. म्हणून तर जागतिक पातळीवरचे शास्त्रज्ञ सांगत आहेत आपल्याना हि *पृथ्वी वाचवायची असेल तर आदिवासी जीवनशैली आचरणात आणावी लागेल*. (जेव्हडे लागेल तेव्हडेच घ्यावे, वाटून घ्यावे, सामूहिक जीवन, संपूर्ण जीवश्रुष्टी एक कुटुंब, जीवन मूल्य)

म्हणून आदिवासी समाजावर मोठे दायित्व आहे, मोठ्या भावासारखी जबाबदारी आहे पूर्ण मानव जात, जीवनश्रुष्टी, पर्यावरण आणि निसर्ग याना आनंदी ठेवण्याची. *आपण आहोत का तयार? आहोत आपण इतके शक्तिशाली? आहोत आपण इतके स्वयंपूर्ण? कि आपणच इतरांचे अंधानुकरण करून आपले आदिवासीत्व संपवत आहोत? यावर सविस्तर विचार करून विविध पूरक प्रयत्न सुरु करूया*. जोहार! 
--
AYUSHonline Team
www.adiyuva.in | 09246 361 249
Reply all
Reply to author
Forward
0 new messages