|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑगस्ट २०१६ ||

已查看 11 次
跳至第一个未读帖子

Warli Painting

未读,
2016年9月2日 14:58:242016/9/2
收件人 AYUSH google group

*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑगस्ट २०१६ ||*

 

पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, निसर्ग पर्यावरण जतन करून मानव तसेच सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे आज जग आशेने बघत या असताना. आज आदिवासी समाज एक नाजूक वळणावर आहे एकीकडे समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होते आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावते आहे, रोजगार डोळ्यासमोरून जात आहेतसांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे.... (यादी खूप मोठी आहे)

 

असो, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास करून *प्रत्येक क्षेत्रात समाज हित जपून एकमेकांना पूरक रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन/प्रत्येक्ष उपक्रम सुरवात करून/सहभागी होऊन आपण जर प्रयत्न केले आणि या समस्यांच्या मुळाशी जाऊन कायमची उपाययोजना केली तर नक्कीच आपल्या पिढीला चांगले भविष्य देऊ शकतो. त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया.*

 

आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान (आदिवासी कला -वारली चित्रकला) उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती

 

) *वारली हाट विकास समिती* : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत - अजून उत्तर येणे बाकी आहे

 केंद्र आणि राज्य शासनाने वारली चित्र संस्कृती संदर्भात आर्थिक तरतूद केल्या नंतर, मनोर येथे विकसित करण्यात येणाऱ्या "वारली हाट" या प्रकल्पाच्या समितीत आदिवासी कलाकार/संस्था यांची भूमिका मोलाची राहील. कारण समाजाचा प्रत्येक्ष सहभाग प्लानिंग मध्ये झाल्याने उपक्रम निर्मिती आदिवासी हित साठी विविध सूचना देणे शक्य होईल. या संदर्भात जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प अधिकारी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी विकास विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी विकास विभाग मुंबई, मंत्री/पालक मंत्री - आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. सदर विषय प्रत्येक्ष आयुक्त - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन जमा केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना पण निवेदन जमा केले आहे. अजून प्रतिसाद मिळाला नाही

      

) *एक वेगळा अनुभव*

परवा  "ग्रेट इंडियन बास्केट" या संकेत स्थळावरीची पहिली ऑर्डर डेहराडून येथे पाठवली. (वारली चित्र असलेली जूट ची पिशवी). मुंबई येथे होणाऱ्या डॉक्टरांची कॉन्फरन्स मध्ये सहभागी झालेल्याना वारली चित्र भेट देण्या बद्दल चर्चा चालू आहे, अभिजित दा नी गोरेगाव येथे नमुना चित्र दाखवली आहेत त्यांना अंदाजे २०० चित्र हवे आहेत लहान आकाराची. कला इंडिया संकेत स्थळावर १०० चित्रांची मागणी आहे एक आठवड्यात त्या बद्दल अधिक विस्तृत माहिती कळवणार आहेत

 

) *चलो आता उतरूया मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*

वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

- फ्लिपकार्ट (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- अमेझॉन (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- इबाय (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- एक्स्पोर्ट्स इंडिया (नोंदणी/करार पूर्ण - कलाकृती विक्री तयार)

- उंगली डील (नोंदणी/करार प्रक्रिया चालू आहे)

- पेटीएम (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- ciitrade.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- Shilpakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- artsofindia.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- greatindianbasket.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- loveknits.org (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- indiakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- theartbazaar.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- BuffyFish (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- Unexplora (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)

- Puro Kraft (नोंदणी/करार चर्चा चालू आहे)

->> यादी आणखीन वाढते आहे.

 

सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी उपयोगात आणावे. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना प्रोडक्ट्स वाघाडी येथील आयुश केंद्रात जमा करावेत. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.  Lets do it together!

 

- आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

 

) *जागतिक बौद्धिक संपदा संघ यांची आदिवासी शिष्यवृत्ती*

जागतिक बौद्धिक संपदा संघ (World Intellectual Property Organisation - WIPO)  येथे बौद्धिक संपदा, पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक आणि जैव विज्ञान या विषयावर आदिवासी समाजासाठीची जागतिक पातळीवर अभ्यास करून आंतरराष्ट्रीय नीती ठरविण्यासाठी लागणारे विविध संशोधन या साठी "WIPO Indigenous Fellowship Program" हा प्रकल्प आहे. त्या साठी अर्ज मागवले आहेत. या उपक्रमात एक वर्ष कालावधी साठी निवड होते२००९ पासून चालू झालेल्या या उपक्रमात अजून भारतातून कुणाची निवड झालेली नाही, आपल्या पैकी बौधिक संपदा आणि कायदे या क्षेत्रात अभ्यास असल्यानी जरूर प्रयत्न करावा. आपण मार्गदर्शना साठी नक्कीच प्रयत्न करू

 

) *माहिती साठी* - जिनेव्हा येथे १९ ते २३ सप्टेंबर २०१६ WIPO चे IGC होते आहे, भारतातील काही आदिवासी संघटनांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण आले आहे .

Sessions of the WIPO Intergovernmental Committee commence with indigenous panels - presentations by a panel of representatives of indigenous and local communities.

 

Intergovernmental Committee (IGC)

The WIPO Intergovernmental Committee on Intellectual Property and Genetic Resources, Traditional Knowledge and Folklore is, in accordance with its mandate, Mandate of the IGC, undertaking text-based negotiations with the objective of reaching agreement on a text(s) of an international legal instrument(s), which will ensure the effective protection of traditional knowledge (TK), traditional cultural expressions (TCEs) and genetic resources (GRs).

 

) *सहकार्य आणि सहभाग*:

सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, इत्यादी) संपर्क करून सहभागी होवू शकतात. सदर उपक्रमात इच्छुक छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात

 

*# वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* : https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. *आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !*

Lets do it together!  

 

AYUSHonline team

www.adiyuva.in | www.warli.in

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

 

Aim of our Initiative through Warli Painting

माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

回复全部
回复作者
转发
0 个新帖子