वयक्तीक अनुभव : कोरियन शहरातल्या नद्या

3 views
Skip to first unread message

SACHiNe SATVi

unread,
Apr 14, 2018, 11:10:34 PM4/14/18
to AYUSH google group

वयक्तीक अनुभव : शनिवार, शहर दर्शन

 

*[मराठी] कोरियन शहरातल्या नद्या*

 

कोरिया औद्योगिक दृष्ट्या अगदी प्रगत आहे. खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. इतके कि भारत मिळणारी सुई/नेल कटर ते मेट्रो ट्रेन कोरियात बनते. काल प्रवास करताना एक लक्षात आले इंडस्ट्रिअल एरियात खूप सारे कारखाने आहेत पण अगदी नियोजनबद्ध एक हि कारखान्यातून मोठा आवाज, दूषित पाणी नदीत, विषारी वायू हवेत सोडल्याचे दिसले नाही.

 

वाटले इंडस्ट्रियल एरिया म्हणून वेवस्तीत मॅनेज केलेय, काल सुओन च्या पालदालमुन मार्केट ला गेलो होतो. आणि अशीच बाकीची मार्केट बघितली, शहरातून जाणारे नदी ओढ्यात पण एक हि सांड पाणी /दुषित पाणी सोडल्याचे दिसले नाही. पाणी अगदी स्वच्छ होते.  शेजारी चालण्यासाठी ट्रॅक बनवला होता, बसण्यासाठी बाक होते. जेणेकरून सकाळी संध्याकाळी व्यायाम, विरंगुळा करणाऱ्याना चांगले उत्साह वर्धक वातावरण आणि जागा.

 

भारतात आपण औद्योगिक वसाहतीत किंवा शहरात वाहत जाणाऱ्या नदी बघितल्या तर वर्णन करायची गरज नाही. अक्षरशः मुंबई/ठाणे/पुणे/हैदराबाद येथील शहरातून वाहणाऱ्या पाण्याला कोणता शब्द वापरावा हे सुचत नाही. खूप वाईट वाटते ज्या देशात नदी ला पवित्र मानून पुजले जाते त्या भारतात या नद्यांची अशी अवस्था बघून (खासकरून शहरातील). आपण जसे नदीला देऊ नदी पण बदल्यात नदी आपल्याना तसेच देणार (घाण, दुर्गंधी, आजार, रोगराई, पूर, इत्यादी),

 

का कारण असेल या मागे? कुठे आपण कमी पडतोय? कुणी काही करू शकेल का? कसे काय करता येईल?

 

*[बोली भाषा] कोरियातले शहरातली नय*

बारीक होतु तंव्हा नयवर अंघलाय जाव, भलता खेलू. हटलू का जवलुच विहरा खनून पानी पेवं. आथा नांगसील त व्याट व्याट गटारीचा पानी त्यात सोडजत. कास्यात, डहाणूला एकदा नंगाया जयजास काय काय सोडजत त्यात. गायचेन मुंबई ना म्होटे शहरातल्या नय त दस्य भुसलवुन टाकेल आहात, त्यांना नय सांगावचं नीही. आखा गटार होन जाधेल. त आपले जसा नय ला देव ती हो आपल्याना तसाच देल ना. होते कोरियावल्याही नांगा सहरातसी नय जाय तरही कोढीक बेस ठेवेल आहे. माना न धावतुच जान उढी दसी घिया वाटेल होती.   

 

*[सामाजिक]

आदिवासी समाजाचे पण असेच झाले आहे. आपण आपल्या पिढीवर जे संस्कार करू तशीच ती तयार होईल, जे आजूबाजूला वातावरण आहे तसेच ते शिकतील. त्या नुसार च ते हळू हळू घडत जातील. स्पर्धात्मक ज्ञान, कौशल्य आणि कुशलता सोबत समाज विषयी आत्मीयता/संवेदना/त्याग/समर्पण/संस्कृती/परंपरा इत्यादींचे *संस्कार आश्रम शाळेत मिळत असावे का ? जेणेकरून येथून शिकलेले विद्यार्थी आपल्या करियर मध्ये यश मिळवून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून विविध उपक्रम सशक्त करून आदिवासी विकासाचा वेग वाढवतील* .

 

कि आपल्या जवळ काही या पेक्षा चांगला उपाय आहे?

आपल्या प्रतिक्रिया कृपया ग्रुप वर शेअर करावे जेणेकरून त्यावर चर्चा करून वेग वेगळ्या प्रतिक्रिया काही चांगला उपाय सुचवुया.

 

येणारी नवीन पिढी नदी सारखीच आहे, प्रवाहा च्या वेगाने पुढे जाणारी. पण त्यांना प्रदूषणापासून दूर ठेवणे आणि चांगले संस्कार देणे आपल्या हातात आहे.

 

जोहर !


........... dahanu calling!!!





Reply all
Reply to author
Forward
0 new messages