एकदा राघोजी भांगरे मला भेटले - उद्धव रोंगटे

10 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Jun 14, 2015, 1:59:46 AM6/14/15
to adi...@googlegroups.com
एकदा राघोजी भांगरे मला भेटले,
झोपेत पाहून जोरात कडादले,
"अरे मावल्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?",
"मी म्हणलो हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?"

राघोजी हसले अणि म्हणाले ,
"चल वरसु आईच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया"
दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
तळ कोकण घाट वर्हाड मावळ पाहिला 
शेवटी रतनगडावर वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,"काय रे दशा झाली या किल्ल्यांची आज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते इंग्रजी ताज!!!
मी म्हणालो, अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...!

राघोजी विचलित झाले,
म्हणाले,"चल येथून जाऊ यात ,
माझ जन्मस्थान देवगाव पहुयात",
आम्ही देवगावात आलो,
तिथल्या स्मारक आणि पुतळे पाहुन पूर्णपणे हरवलो,
बघता बघता 2 में चा स्मृतिदिनाचा प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या राघोजिनि मलाच प्रश्न केला,
"तुम्ही त्या राजकारण्याना जित्ता कैसा सोडिला?"
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला नाही तो फक्त माणुसकीला ....!
वरून आमचेच नेते म्हणती,तुमचेच लोक फितूर ,
बलिदान गेले वाया , मरणयास होते आतुर...!!

राघोजी आणखी रागावले आणि म्हणाले चल जरा राजुरला जाऊंन येऊ.
आम्ही राजुरात आलो.
मी म्हणालो हा ह्या रावसाहेबांचा बंगला तो त्या साहेबांचा बंगला.हा भाऊसाहेबांचा बंगला.
तिथले बंगले बघुन भारावले पुरते भारावले..
मग म्हणाले चल नाशिक ला फिरुण येऊ..
मग आम्ही नाशिकाला गेलो..
राघोजी म्हणाले ह्या इमारती समोर हे लोक झेंडे घेऊन कशाला उभे आहेत रे..
म्या जरा शरमलो आणि म्हणालो राजे ते आदिवासी विकास भवन...इठ जातीचे दाखले बनवून मिळातत आणि ते झेंडे घेऊन बोगस आदिवासी मोर्चा घेऊन आलेत..
मग राघोजी शांत पने म्हणाले "विकास म्हणजे क्रांतिच" नारे. मग आम्हि तिथ बाडगीच्या माचीत बसून काय केल???आम्हाला का नाही गरज पडली अशी भवनाची...आन मलाय बी जातीचा दाखला काढाव लागल का??अन् किती पैसं द्याव लागल..
माझी बोलतीच् बंद झाली अन्
उठ उठ म्हणताच मला जाग आली,
खरच का माझी आणि राघोजींची भेट झाली?
मन राघोजींच्या विचारत गुंतून होते गेले,
पण खरच एकदा राघोजी भेटले होते मला ...!!!!!
जय आदिवासी..!!!
जय  राघोजी...!!!

                                       उद्धव रोंगटे
                                    7208464592
                            मी आदिवासी गर्व आदिवासी

Atul Barge

unread,
Aug 1, 2015, 7:48:59 AM8/1/15
to adi...@googlegroups.com
udhav ji khup chan ...

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/b5bfa6f9-dae9-4b0b-94a8-845346300123%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Abhijit Bule

unread,
Aug 1, 2015, 9:35:38 AM8/1/15
to adi...@googlegroups.com

उद्धव खूप छान. सर्व आदिवासी क्रांतिकारक आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. सदर काव्यात्मक रचनेत आपल्या आणि आपल्या आदर्श क्रान्तिकारकांच्या मनातील स्थिति खूप छान मांडली आहे.

कुठे त्यांचे उठाव आणि लढ़े..

अन कुठे आज चे आपलेच नेते..!

Reply all
Reply to author
Forward
0 new messages