|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जुलै २०१६ ||

515 views
Skip to first unread message

Warli Painting Adivasi Art

unread,
Aug 4, 2016, 1:29:07 PM8/4/16
to AYUSH | adivasi yuva shakti
*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० जुलै २०१६ ||* अनादी काळापासून निसर्ग आणि जीवन मूल्य सोबत आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक बौद्धिक संपदा असलेल्या आदिवासी समाजा कडे आज जग पर्यावरण आणि जैवविविध्य इत्यादी विषयासाठी आदिवासी पारंपरिक ज्ञानाकडे आशेने बघत आहे. नवीन पिढीची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवशक्यता आहे. *सांस्कृतिक ओळख सोबत आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था आणि स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया.* त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया. आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान (आदिवासी कला -वारली चित्रकला) उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती *१) वारली हाट विकास समिती : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत* केंद्र आणि राज्य शासनाने वारली चित्र संस्कृती संदर्भात आर्थिक तरतूद केल्या नंतर, मनोर येथे विकसित करण्यात येणाऱ्या "वारली हाट" या प्रकल्पाच्या समितीत आदिवासी कलाकार/संस्था यांची भूमिका मोलाची राहील. कारण समाजाचा प्रत्येक्ष सहभाग प्लानिंग मध्ये झाल्याने उपक्रम निर्मिती आदिवासी हित साठी विविध सूचना देणे शक्य होईल. या संदर्भात जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प अधिकारी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी विकास विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी विकास विभाग मुंबई, मंत्री/पालक मंत्री - आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. सदर विषय प्रत्येक्ष आयुक्त - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन जमा केले आहे. *२) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती - पाठ पुरावा* आयुक्त, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांची भेट घेऊन स्मरण पत्र दिले. इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली चित्र). सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन पाठवलेले. *३) Confederation of Indian Industry - (CII) च्या संकेतस्थळावर नोंदणी आणि प्रदर्शन* CII ने चालू केलेल्या ऑनलाईन पोर्टल वर रुपये 20 हजार चे सभासदत्व शुल्क माफ करून आयुश ची नोंदणी केली गेली आहे. या निमित्ताने देश आणि विदेशातील विविध कंपन्यांसोबत आपल्या कलाकृती विक्रीची संधी मिळेल. या विषयी थोडक्यात माहिती - About CIITrade.in Confederation of Indian Industry - (CII) India’s premier and largest Industry Association presents ‘CIITrade.in’ an online ecommerce gateway. CIITrade.in will connect CII members and non-members, with new trading opportunities within the country and around the world. CIITrade.in will enable secure e-commerce for organisations of all sizes and will aid in the growth of online business-to-business transactions and the portal will also provide a gateway to global supply chains for CII members and other industries in India, helping to increase trade further.. *४) वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार* आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही- - फ्लिपकार्ट (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - अमेझॉन (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - इबाय (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - एक्स्पोर्ट्स इंडिया (नोंदणी/करार पूर्ण - कलाकृती विक्री तयार) - उंगली डील (नोंदणी/करार प्रक्रिया चालू आहे) - पेटीएम (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - ciitrade.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - Shilpakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - artsofindia.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - greatindianbasket.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - loveknits.org (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - indiakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - theartbazaar.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - BuffyFish (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - Unexplora (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) - Puro Kraft (नोंदणी/करार चर्चा चालू आहे) ->> यादी आणखीन वाढते आहे. सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी उपयोगात येईल यात शंका नाही. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना प्रोडक्ट्स वाघाडी येथील आयुश केंद्रात जमा करावेत. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). *आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together!* - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. *६) सहकार्य आणि सहभाग :* सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, इत्यादी) संपर्क करून सहभागी होवू शकतात. सदर उपक्रमात इच्छुक छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात. *# वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे : * https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. *जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !* Lets do it together! *AYUSHonline team* www.adiyuva.in | www.warli.in Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community! Aim of our Initiative through Warli Painting *माती : Land – Preserve* our Cultural Intellectual & Traditional Knowledge *पानी : Water* – Earn *competitiveness* by Skill Development and promote Traditional knowledge through New technology *चावूल: Rice* – Enable Artisan and Adivasi community for *strengthening its sustainable economy by employment generation*
Reply all
Reply to author
Forward
0 new messages