. परंतु येथील आदिवासी हे त्यांच्या साठी फार मोठी अडचण बनून आहेत

10 views
Skip to first unread message

Adivasi Ekta Parishad

unread,
Mar 11, 2016, 1:14:46 PM3/11/16
to Adivasi Yuva Shakti
खैबरखिंडींतून आलेले विदेशी वंशाचे व विस्थापित जातीचे लोक व त्यांचे सरकार यांना या देशाचे मालक व्हायचे आहे... परंतु येथील आदिवासी हे त्यांच्या साठी फार मोठी अडचण बनून आहेत कारण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जगाच्या कोणत्याही भूभागावरचा आदिवासी हा त्या भूमीचा प्रथम पुत्र म्हणजेच  FIRST NATION /प्रथम राष्ट्र मानला जातो तेथील मूलवासी किंवा ABORIGINAL /INDIGENOUS PEOPLE मानला जातो. आणि तोच तिथला जन्मसिद्ध मालक असतो. 11 जाने. 2011 साली  नंदाबाई भिल्ल यांच्या सुप्रीम कोर्टात चाललेल्या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान.मार्कडेय काटजू आणि सहकारी न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे की  "या भारत देशातील 8%आदिवासी हेच या देशाचे मूलवासी आणि खरे मालक आहेत. उरलेले 92% भारतीय हे खैबरखिंडींतून आलेल्या परकिय वंशाचे लोक आहेत. जसा उत्तर अमेरिका, आस्ट्रेलिया हे विस्थापित लोकांनी बनलेले देश आहेत त्याच प्रमाणे भारत सुद्धा विस्थापित लोकांनी बनलेला देश आहे. या देशाचे सरकार हे केवळ ट्रस्टी (विश्वस्त मंडळ) आहे, तर आदिवासी या देशाचे मुलमालक आहेत".(समता जजमेंट - आंध्र प्रदेश) या सर्व गोष्टी मुळे बिगर आदिवासी लोकांना व त्यांच्या सरकारला स्वतःला या देशाचे मालक आहेत हे घोषित करण्यात अडचणी येत आहेत. जो पर्यंत आदिवासी(देशाचा मुलमालक) जिवंत आहे व तो  "मी 'आदिवासी' आहे" असे ठणकावून सांगत आहे तो पर्यंत बिगर आदिवासी लोक व सरकार या देशाचे मालक बनूच शकत नाही. म्हणून बिगर आदिवासी लोक व सरकारला आदिवासींना लवकरात लवकर संपवण्याची घाई सुटली आहे. मी या देशाचा "आदिवासी" आहे असे जाहीर करणे म्हणजेच मी या देशाचा मुलमालक आहे आणि तू गैर आदिवासी म्हणजे परकिय आहेस असे ठणकावून सांगणे आहे. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला आदिवासी म्हणवता किंवा जाहीर करता तेव्हा गैर आदिवासींना फार मोठे आव्हान देता, गैर आदिवासींच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करता.हे त्यांना फार झोंबते... म्हणुनच या ना त्या कारणाने तुमचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न होतो.... आदिवासी म्हणजे कोणताही धर्म बनण्याच्या अगोदर अस्तित्वात असलेली संस्कृति... म्हणून आदिवासींनाच "धर्म पुर्व संस्कृति" असेही संबोधले जाते. आणि जेव्हा एखाद्या आदिवासीला  "धर्म" जोडला जातो तेव्हा त्या आदिवासी व्यक्तीबरोबर एक कालखंड जोडला जातो म्हणजेच जर उद्या सर्व आदिवासींचा धर्म  "हिंदू" असे जात प्रमाणपत्र द्वारे लेखी जाहीर होते आणि काही पिढ्यापर्यंत हे समाज मान्य करत असेल तर सरकार असे जाहीर करेल की तुम्ही हिंदू धर्म स्थापनेपासूनच येथे आहात. म्हणजेच मात्र आर्य आल्यापासून 5000 वर्षापासूनच तुमचे अस्तित्व येथे आहे. आणि आदिवासी सुद्धा गैर आदिवासी सारखेच धर्म पाळू लागले तर आपल्याकडे धर्मापुर्वीचा कोणताही अंश,पुरावा, संस्कृति शिल्लक राहात नाही. गैर आदिवासींना हेच हवे आहे. म्हणून विविध मार्गाने आदिवासींचे अस्तित्व समाप्त करण्यासाठी गैर आदिवासी व त्यांचे सरकार मुद्दाम जातप्रमाणपत्रावर तुम्ही तुमची जात लिहण्याआधीच "हिंदू" असा तुमच्या शिक्का मारून ठेवते. तलासरी भागात काही जणांना Roman Catholic असे जात प्रमाणपत्रावर ख्रिश्चन फादरांनी तहसीलदार कडून नोंदवून घेतल्याचे मी पाहिले आहे. उद्या हेच लोक तुम्ही आदिवासी आहात तर जेव्हा जगात धर्म अस्तित्वात नव्हता तेव्हाचा पुरावा दाखवा असा प्रतिप्रश्न करुन तुमच्या मुलमालक पणावर घाला घालणार आहेत.... तेव्हा आम्ही सांगू की मला आदिवासी नाच येतो, चित्रकला येते म्हणून मी आदिवासी आहे. परंतु त्यांनी गैर आदिवासींनी तर या गोष्टीचा सखोल अभ्यास केला आहे ते म्हणतील ते तर आम्ही तुमच्या पेक्षा चांगले नाचून दाखवू, काढून दाखवू.... ती तर मात्र एक कला आहे. तर....? फक्त नाच गाणे, कला कृती हे आदिवासी असण्याचे पुरावे ठरु शकत नाही तर जर तुम्ही स्वतःला आदिवासी या देशाचे मुलमालक म्हणविता तर गैर आदिवासी लोक धर्म घेऊन आले त्या अगोदरचे जे गैर आदिवासींना सुद्धा माहित नाही असे पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत..... काय असावेत ते पुरावे....? याचा विचार झाला पाहिजे ।। :- विजेसर सरनोबत, आदिवासी एकता परिषद

--
Reply all
Reply to author
Forward
0 new messages