वयक्तिक अनुभव : ४ दिस घरा गेलुतु,

14 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Aug 20, 2016, 10:13:30 AM8/20/16
to AYUSH | adivasi yuva shakti

वयक्तिक अनुभव :

 

दिस घरा गेलुतु, कसक दिस खपलं समजलाच निहि. दादूला हो घरा निधेल होता, सगली होती घरा फार भारी वाटला.

बाबान सोड्या अनेल होत्या फार मस्त लागत, बारीक होतु बाबा/काका/म्होटेबाबा ना गावातली ग्यासबत्ती घेन नईत जात ना भलत्या म्होट्या सोड्या आणीत. गायचेन त्यांचे नांगे हाता ओढक लांब रेहेत. आथा नय वाकरुन दसी टाकजते रेती काहडून काहडून, पूर आला का मंगा नांगाया मिलत नय चा रूप. ये पुराला नवे बांधेल त्या खोल्याना गुडघ्यापावत पूर हिवरेल होता.

 

काकान ना दादान मासली/सोडं/चिंभोऱ्या आणून दिल्यात्या, हाताखाल धरेल त्याची वेगळीच चव रेहे ना ती घरातल्यान होवी सांगायूच नोको. घरा गेलुतु ना बसवत पाड्यातली आया पण आलीती. आयान हो मासली आणेल होती. प्रत्येक वेलस आया (बाबाची आत्या) विसरता काही ना काही घेन येउच, कव्हा कोहला, वालूक, भेंडी, कानटोप, लाडू, गोलं, वाल, भाजी, सेंगा ना ज्या होवा त्या आणिते आया. आया घरा आली का माना ना एक वेगलीच ऊर्जा दसी मिलं.  (माना वाटतं आपले शिकून/नोकरी करून करून आपल्यातला आदिवासी माणूस खपवित दसा आनलाहे. जुनी वाडघा नांगजास अझूक हो माणसातली नाती जपून रेहेत, सगळ्यांना संभालूंन रेहेत, मेहनतीत हो केव्हाच कमी नीही, कोनाला व्याट हो नीही सांगत. ना आपले शिकेल पोरा काय करू?). जावंदेस पण आपले जुने वडघाकडं फार काही आहे शिकाय सरखां आखि युनिव्हर्सिटी कमी पडल. आपला यो आधीचे पिढी चा ठेवा आपले पोरांना हो देव हाव.   

 

गावातल्या गावात काम मिलाया पाहज त्या साठी आमदार (अमीत घोडा) ना खासदाराला (चिंतामण वनगा) भेटायचा होता, पन ते काही कामात अडकेल होत  मांगा सांग आपले सविस्तर बोलू असा सांगला, २० मिनटं फोनवर बोललु, तात्पुरता त्यांचे संपर्क कार्यालयात अर्ज जमा करून आलुहु, पुढचे वेलस डिटेल प्रेझेंटेशन करून घेण जयाचू आहू. बोलता बोलता त्यांचा हो त्याच मत होता आपालेकड कामा तयार होया पाहिजत जेणेकरून आपल्यात बिज्यावर अवलंबून रेहाय नाही लागाय पह्ज.

 

येता येता माधव दा लिलका चे हाफिसात वलेल होतु, डहाणूचे सिनवारचे कार्यक्रमाला जावाला ता नीही. त्याही पतपेढी चालू करेल आहे नोकरी वाल्याना समाजाचे कामा ला जोडून आर्थिक बाजू मजबूत कराया. बेस वाटला सामाजिक कामा साठी उत्साह नांगुन. डहाणू वरसी लोकल पकडली ना मुंबईला आलू परत इया हैद्राबादला. लोकल मध्ये एक माणूस पुस्तक वाचीत होता मन त्यावर वनश्या दा न बनवेल तारप्याचा चित्र दिसला, मेहयान ओखून ओखून ते पुस्तकाचा नाव गवसित होतु. पका प्रयत्न करून दसा पाहल पण जमला नीही, नीही रेहून मंगा ते माणसालाच विचारला त्याचेकडसि पुस्तक घेतला ना नांगल. ट्रेन सुटायचा टाईम झालाता माना डेवून त्या पुस्तक पण घेवता नीही मंगा मेहयान त्याला विचारून ते पुस्तकाचे फोटो काढले. महाराष्ट्र शासन चा रोकराज्य ऑगस्ट २०१६ अंक होता (आदिवास ते अग्रक्रम). मेहयान विचारला त्याला काय करीस काम, तो सांगत होता मी नोकरी करी. परत विचारला कोठ? गाव कोणचा?. तो जयेंद्र सूळ होता, साताऱ्याचा, वाघाडी ला ग्राम सेवक काम करी. मेहयान सांगला अरं मी वाघाडचाच बरा झाला ओलख तरी झाली. मंगा वेग वेगले विषयावर गोष्टी केल्या. त्यांनी त्या पुस्तक माना दिला सांग मी नवा घेन, त्याला पुस्तकाचे पयसे दिले ना मी घेन आलु. सगल्याना वाचया मिलावा या साठी पाठवीतु हाव, बेस वाटला त्या घिजास , आझूक बेस करवला त्या साठी प्रयत्न करू!  

 

आथा एक बातमी वाचलिती वडोदरा हायवे ची, बेस रेहजास जल जंगल जमीन रीती गायचेन सोडजास नोको ! एक होया लागल सगले मारग तपासून पहाया लागतील. सगले लोखाना हरि घेन आपला पाडा/गाव/तालुका/जिल्हा/राज्य वाचवाया लागल नीहीत मुंबई पायसी दिल्ली पावत चरत दसा निजल लवकरूच, आपले सगले खपून जसे जाव असा वाटाय लागलाहेबेस रेहू संभाल करू हाव ! Lets do it together!





Lokrajya 2016 Aug.pdf

Zhina Kuvra

unread,
Aug 27, 2016, 7:08:53 AM8/27/16
to adi...@googlegroups.com
Zakass anubhav  Sachin dada vachun  bess aathovla 
                                                    Aapla Zeena dada

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/27600815-129a-4ee3-844b-16bae7eb83b2%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages