कातकरी म्हणजे कोण ?

379 views
Skip to first unread message

e vansakha quarterly magazine

unread,
Jun 23, 2015, 1:54:23 PM6/23/15
to adi...@googlegroups.com
कातकरी म्हणजे कोण ?
चलो जलाये दीप वहा
जहा अभीभी अंधेरा है!
(वनवासी कल्याण आश्रम)

८ जून २०१५ रोजी वनवासी कल्याण आश्रमाने पुणे येथे "मुळशी" जवळ "माले" या गावात, कातकरी मुलांसाठी विशेष वसतिगृह सुरु केले. राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था यांच्या बरोबर आपण हे वसतिगृह चालवीत आहोत. भोर येथील वसतिगृहात देखील नव्याने भरती करताना प्रामुख्याने कातकरी मुले कशी घेत येतील असा प्रयत्न आश्रमाचे कार्यकर्ते करीत आहेत. या निमित्ताने कातकरी म्हणजे कोण आणि त्यांच्याकरिता असे विशेष प्रयत्न करायची गरज काय?, हे आश्रमाच्या कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख लिहीत  आहे.

राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ही  संस्था मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात शिक्षण, बचतगट, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात काम करते. एकदा माझी पत्नी सौ. विदुलाचे व्याख्यान संस्थेच्या पिरंगुट येथील  हिम्मत शाळेत होते. परिसरातल्या बचत गटातल्या सदस्य महिला याकरिता जमल्या होत्या. माझे काम वाहन चालकाचे होते. पुण्यातून संस्थेचे सचिव अनिलजी व्यास, सौ. पूनमजी मेहता आणि अन्य कार्यकर्त्या आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम सुरु होता. मी आणि व्यास सर तिकडे  प्रवेश नसल्यामुळे खाली गप्पा मारत थांबलो होतो. चर्चा हळूहळू कातकरी या विषयावर आली. मुळशी तालुक्यातील कातकरी मुलांसाठी काय करता येईल? वेगळे वसतिगृह, वेगळे केंद्र चालू करता येईल का? अशी चर्चा करता करता व्यास सर म्हणाले कि संस्थेचे माले-मुळशी इथले वसतिगृह या कामासाठी वापरता येईल आणि तिथून जवळच सेनापती बापटांच्या नावाने चालणारी शाळा आणि आय.टी.आय. आहे. तिथे मुले शिकू शकतील.    

पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर हा प्रस्ताव मांडला, तसे सर्वजण उत्साहाने तयार झाले. वारली चित्रकार आणि "रंगावधूत" हा वारली आणि लाकडी वस्तू उत्पादनाचा लघुउद्योग सांभाळणाऱ्या अनिल वाघमारेचा लहान भाऊ सुनील वाघमारे आणि मावळातला आपला कार्यकर्ता नारायण ठिकडे हे दोघे माल्याला जाऊन राहायला तयार झाले. पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजातील सर्व कार्यकर्ते या प्रस्तावाने इतके आनंदित झाले कि सर्वांनी माले परिसरातील वाड्यांवर प्रवास सुरु केला. प्रत्येक  कातोडीतून विद्यार्थी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. त्याला प्रयत्नांची जोड या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेल्या कातकरी समाजाला एकत्र आणणारी कोणतीही यंत्रणा आज आपल्याकडे उपलब्ध नाही. एखाद्या भागातील माणसावर काही अन्याय झाला तर त्याची माहिती अन्य कातोड्यांवर पोचत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रियाही उमटत नाही. कातकरी समाजात काम करणे सरकारी यंत्रणेलाही अतिशय अवघड जाते. त्याचं उत्साह कातोडी वस्तींवर गेल्यावर मावळून जातो. सरकारी यंत्रणा आणि कातकरी समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याची गरज आहे. मुळातच कातकरी समाज हा थोडा वेगळा राहणाऱ्या वृत्तीचा आहे. सरकारी अधिकारी आला असे समजले की  निम्मी माणसे गायब होतात. जातीचा दाखला मिळवण्याच्या अर्जावर सही करायला बोलावले तरी समोर येत नाहीत. अशा माणसांना स्वत:चा हक्क मिळवण्यासाठी पुढे आणायचे हे खरे आव्हान आहे.  

भारतामध्ये विशिष्ठ उद्योगामुळे एखाद्या समुदायाला ओळखण्याची अनेक उदाहरणे आहेत. उदा.- तांबट, लोहार, कुंचीकोरवी इत्यादी. खरे तर सर्वच माणसे सर्व कामे शिकू शकतात आणि उदरनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या इथल्या जीवनपद्धतीत एकेका समुदायाला एकेक काम उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विकसित झाले आणि अन्य कौशल्ये स्वत:साठी वापरायची अशी प्रथा पडली. उदाहरणार्थ, बांबूच्या चटया, टोपल्या बनविण्याची कला गावात सर्वांना येते, ते स्वत: वस्तू बनविण्याकरिता अथवा दुरुस्तीकरिता वापरतात, परंतु त्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय फक्त बुरुड करतात.

भिल्लांच्या जनजातीमधील जी पोटजात कात बनविण्याचा व्यवसाय करीत असे, ती जनजाती कातकरी, कातोडी अथवा काथोडी या नावाने ओळखली जाउ लागली. त्यांच्याकडे बांबूच्या वस्तू बनविण्याची कला, मासे पकडण्याची कला, मध काढण्याची कला, शिकारीची कला, अशा विविध कला व कौशल्ये होती. पण त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते कात बनविणे आणि विकणे. अन्य कौशल्ये फक्त स्वत:च्या उपयोगासाठी आणि मनोरंजनासाठी.  

या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करायचे झाले तर, इंग्रजांच्या पूर्वीचा काळ आणि इंग्रजांच्या आगमनानंतरचा काळ अशी विभागणी करावी लागेल. इंग्रज येण्यापूर्वी हा समाज महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमाभागातील, "खैराची"  व इतर विपुल वृक्षसंपदा असणाऱ्या भागात स्थायिक होता. झाडांची उपलब्धता कमी अधिक होईल त्याप्रमाणे त्यांचे स्थानिक स्थलांतर होत असे. परंपरागत पद्धतीने घरातील मुले, विविध कौशल्ये आत्मसात करीत असत. कात बनवणे हे प्रगत कौशल्य आहे. यामध्ये झाडाची निवड, कात बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जागेची निवड, झाडांची कटाई, झाडामधील योग्य भागांचे वर्गीकरण, झाडाचा अर्क काढण्याची रासायनिक प्रक्रिया, उष्णतेचा योग्य वापर, अर्काच्या वड्या पाडण्याचे कौशल्य, उत्पादन खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याशी वाटाघाटी करण्याचे आणि हा व्यवहार स्वत:ला फसवून न घेता पूर्ण करण्याची हातोटी अशा विविश गुणवत्तेचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि कातकरी माणूस हा विविध आणि अवघड कौशल्यांनी युक्त आहे.

स्वाभाविकपणे कातकरी समाजाकडे एकेकाळी पुरेशी धनसंपत्ती होती. त्याचप्रमाणे मध, लाकूड, कंदमुळे, प्राण्यांची शिकार अशा जंगलात उपलब्ध होणाऱ्या  विविध गोष्टी त्याला भरपूर प्रमाणात मिळायच्या. जातपंचायतीच्या रूपाने स्वत:ची न्यायव्यवस्था कातकऱ्यांकडे  होती. आज जरी ही  जातपंचायत व्यवस्था बदनाम झाली असली तरी, त्या काळी ही एक चांगली व्यवस्था होती.

इंग्रजांच्या आगमनानंतर कातकरी समाजाची आर्थिक व्यवस्था विस्कटून गेली. इंग्रजांनी गावातील शेत  जमिनींची नोंदणी करून महसुलाची व्यवस्था बसवली. खाजगी जंगले नोंदवून त्यांची महसुलाची व्यवस्था बसवली. कातकरी समाज ज्या जंगलात वावरत होता ते खाजगी नसून समाजाचे होते, सामाईक होते. हा समाज साधारणपणे शासकीय यंत्रणेच्या समोर जाणारा नसल्याने, तो जंगलावर स्वत:चे नाव लावण्यास पुढे आला नाही. इंग्रजांनी वनखाते निर्माण करून ही सर्व जंगले स्वत:च्या ताब्यात घेतली. इथून कातकऱ्यांचे दुष्टचक्र चालू झाले. ताब्यात घेतलेल्या या जंगलांवर इंग्रजांनी कंत्राटदार नेमले. जंगल संपत्तीची लुट करून इंग्रज सरकारची तिजोरी भरायची हा या कंत्राटदारांचा उद्योग होता. आजवर कातकरी समाज आपल्या गरजेप्रमाणे खैराची झाडे तोडून, आपल्याला आवश्यक तितक्या धना पुरता कात बनवीत असे. आता मात्र इंग्रजांच्या अमर्याद लोभापायी वारेमाप जंगलतोड सुरु झाली. तोडलेल्या लाकडाचा मालक इंग्रज होता. त्याचे पैसे भरण्याची क्षमता कातकऱ्याकडे नव्हती. 

इथे बोहरी आणि पारशी कंत्राटदार पुढे आले. काताचे कारखाने यांनी चालू केले आणि कातकरी हा मजूर बनून तेथे राबू लागला. कारखाने इतक्या वेगाने खैर संपवू लागले कि, आपला मूळ प्रदेश सोडून अन्य प्रदेशात जसे कारखाने स्थलांतरित होऊ लागले, तसे कातकरीही  स्थलांतरित होऊ लागले. म्हणून आज कातकरी रत्नागिरीपासून सुरत पर्यंत आणि पूर्वेला पुणे जिल्ह्यात देखील आढळतो.

एका संपन्न, कौशल्यपूर्ण, आरोग्यपूर्ण व्यावसायिक समाजाचे अशा रीतीने दरिद्री; कुपोषित मजूर समाजामध्ये रुपांतर इंग्रजांमुळे झाले. हे होत असताना अन्य समाज आपले हितसंबंध राखताना इतक्या व्यग्र होता कोणी कातकरी लोकांना त्याबाबत जागृत देखील केले नाही. आपल्या नावावर कोठेही जमिनीचा एखादा साधा तुकडा मिळवण्यातदेखील कातकरी समाज अपयशी ठरला, हीच त्याची शोकांतिका आहे. 

हळूहळू काताच्या छोट्या कारखान्यांचे भव्य कारखान्यात रुपांतर झाले. कातकरी माणसाकडे असलेल्या कौशल्यांची नव्या कारखान्यांना गरज नव्हती. त्यामुळे हळूहळू कातकरी माणूस या व्यवसायातून बाहेर फेकला गेला. कटाची भट्टी बंद पडली आणि मग सुरु झाल्या विटांच्या भट्ट्या, कोळशाच्या भट्ट्या आणि सर्वात शेवटी दारूच्या भट्ट्या. कोळसा आणि विटांच्या भट्ट्यात कातकरी हा मजूर असतो कारण भांडवल खूप लागते. दारूच्या भट्टीसाठी एकतर भांडवल कमी लागते आणि दुसरे म्हणजे हा पोलिसांच्या धाकाखालील धंदा असल्याने, गावकरी कातकऱ्यांना या धंद्यासाठी भांडवल देतात, आणि भट्टी चालू करण्यास प्रोत्साहन देतात. हा धंदा करणाऱ्या माणसाच्या घरात भरपूर पैसा खेळतो पण स्वास्थ्य मुळीच नसते, कारण संपूर्ण गावावरून ओवाळून टाकलेली माणसे तिथे येत असतात आणि घरातील माणसांनाही वाईट व्यसने लागतात.

वाडीतील छोटी मुले शाळेत जाताना दिसतात, त्यातील बरीचशी मुले मध्येच शाळा सोडतात आणि माध्यमिक शाळेत तर तुरळक कातकरी मुले दिसतात. इतर मुलांच्या मानाने त्यांना घरी मिळणाऱ्या सुविधा या फारच कमी असतात. मासे पकडायला, खेकडे पकडायला जाणे अशी विविध प्रलोभने असतात. त्यामुळे शिक्षणात लक्ष कमी आणि प्रगतीही कमी.या सर्व परिस्थितीतही पदवी मिळेपर्यंत शिक्षण घेणारी कातकरी मुले पाहिली की खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. या अशाच मुलांना पुढील आयुष्यात स्थिर होता यावे यावर देखील आश्रमाचा भर आहे, प्रयत्न आहे.

पनवेलच्या आश्रमातून शिकलेला अनिल वाघमारे हा विद्यार्थी वारली चित्रकला शिकून आज तोच त्याचा व्यवसाय म्हणून काम करत आहे. त्याच्या व्यवसायात त्याच्याच गावच्या अजून दोन कातकरी मुलांना रोजगार मिळाला आहे. आश्रमाचे एक विद्यार्थी एकनाथ वाघे हे आता शिक्षक झाले आहेत. पनवेल अर्बन बँकमध्ये काम करणारे सुदाम पवार हे आश्रमाचे विद्यार्थी तर आहेतच परंतु आता ते आश्रमाच्या विश्वस्त मंडळाचे सदस्यही आहेत. अशी उदाहरणे अनेक आहेत पण समाजाला बदलाच्या वाटेवर घेऊन जाण्यास त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.गरज आहे आपण सर्वांनी त्यांचे हात बळकट करण्याची.

कातकरी समाज सध्या पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कुलाबा, ठाणे व पालघर जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतो. या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कातकरी समाजात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य करण्याची खरोखर मुख्य निकड आहे. आपण पुढील उपक्रम हाती घेऊ शकता:-

१) एखाद्या कातोडी मधील सर्व मुले शाळेत जातील यासाठी प्रयत्न करणे 
२) मुलींची लग्ने योग्य वय झाल्यावरच करण्यासाठी प्रबोधन, जनजागरण करणे 
३) कातोडीतील महिलांकडून झोपडीत करून घेण्यासारखी छोटी कामे शोधून, त्यांना शिकवून, रोजगार निर्माण करून देणे  
४) "नाग्या कातकरी" या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे 
५) कातोडीमध्ये "सुंदर माझे घर" अशी स्पर्धा घेऊन, काही गृहोपयोगी बक्षिसे वितरीत करून एकप्रकारे कातोडी स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करणे
६) संस्कार वर्ग चालवणे
७) दारू गाळण्याचा उद्योग करणाऱ्या कुटुंबांना प्रबोधन करणे, त्यांना पर्यायी उद्योग देणे 
८) शिक्षित व अर्धशिक्षित मुला-मुलींना छोटे अभ्यासक्रम, प्रशिक्षण देऊन, नोकऱ्या मिळवून देणे, तसेच छोटे व्यवसाय स्थापन करून देणे   
९) घरे बांधण्यासाठी जागा मिळवून त्यांच्या मालकीची करून देणे, स्थिर वसाहत करणे 
१०) लग्नातील अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रबोधन करणे, सामूहिक विवाहासारखे उपक्रम राबवणे 
११) कातकरी मुला-मुलींसाठी खेळाच्या स्पर्धा भरवणे, प्रोत्साहनपर बक्षिसे वितरीत करणे

आपण स्वत: कातकरी वस्त्यांवर प्रवास केलात, तर आपल्या अनुभवानुसार आपल्याला इतर अन्य उपक्रमही सुचू शकतील आणि आपण ते ही करू शकाल. कल्याण आश्रमामध्ये कातकरी जनजाती मधील अनेक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे कातकरी समाजात काम करणारे अनेक शहरी कार्यकर्ते आहेत. आपण या सर्वांचे सहकार्य घेऊ शकता. आम्ही आपल्या बरोबर काम करण्यास निश्चितच उत्सुक आहोत आणि तयार आहोत.

आपले नम्र,

नरेंद्र विश्वनाथ पेंडसे – ७७०९०१३२३२ (7709013232)
ऋषभ मुथा -  ९३२५०९३८४० (9325093840)
सचिन कुलकर्णी – ९९२१५७४१०८ (9921574108)

Santosh Gedam

unread,
Jun 25, 2015, 1:01:09 AM6/25/15
to adi...@googlegroups.com

I think you should not use "Vanvasi" word considering following points.
1) Vanvasi meaning Forest Dweller; R u refering to all the tribes & castes who r forest dwellers?
2) Which forest, type of forest u r refering to RF, PF, etc? How have u define forest?
3) Forest of which time period r u referring? Cos forest cover is dwindling.
4) In Constituent Assembly debate & much before that Dr. Ambedkar proclaimed tribes as "Aboriginals" Adivasis. On what rationality, u r subsituting & giving them this perceived derogatory term of Vanvasi?
Few more points for correction assuming u know it not & what u wrote was not deliberate.
1) Castes & tribes r different; I wont explain pls research.
2) Tribes local administrative system & caste panchayats of modern days r different. I know it. U pls read more.
3) Ur story of Katkaris has too many gross assumptions to create a story where Britishers look complete Villain, but the reality cd be different demanding deeper & systematic investigation.

Best,
Santosh

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

चेतन Chetan

unread,
Jun 25, 2015, 3:02:30 AM6/25/15
to adi...@googlegroups.com
very true santosh, some people purposley use girijan also
we are adivasi

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

Awaj do

unread,
Jun 25, 2015, 7:43:36 AM6/25/15
to adi...@googlegroups.com
Admin Sir, Pls Keep Ayush Only  "ADIVASI" YUVA SHAKTI. Do Not Mix it with These "VANSAKHAs(?) !!

From: Santosh Gedam
Sent: ‎25-‎06-‎2015 10:31 AM
To: adi...@googlegroups.com
Subject: Re: AYUSH | कातकरी म्हणजे कोण ?

I think you should not use "Vanvasi" word considering following points.
1) Vanvasi meaning Forest Dweller; R u refering to all the tribes & castes who r forest dwellers?
2) Which forest, type of forest u r refering to RF, PF, etc? How have u define forest?
3) Forest of which time period r u referring? Cos forest cover is dwindling.
4) In Constituent Assembly debate & much before that Dr. Ambedkar proclaimed tribes as "Aboriginals" Adivasis. On what rationality, u r subsituting & giving them this perceived derogatory term of Vanvasi?
Few more points for correction assuming u know it not & what u wrote was not deliberate.
1) Castes & tribes r different; I wont explain pls research.
2) Tribes local administrative system & caste panchayats of modern days r different. I know it. U pls read more.
3) Ur story of Katkaris has too many gross assumptions to create a story where Britishers look complete Villain, but the reality cd be different demanding deeper & systematic investigation.

Best,
Santosh

On Jun 23, 2015 5:54 PM, "e vansakha quarterly magazine" <evan...@gmail.com> wrote:
कातकरी म्हणजे कोण ?
चलो जलाये दीप वहा
जहा अभीभी अंधेरा है!
(वनवासी कल्याण आश्रम)

८ जून २०१५ रोजी वनवासी कल्याण आश्रमाने पुणे येथे "मुळशी" जवळ "माले" या गावात, कातकरी मुलांसाठी विशेष वसतिगृह सुरु केले. राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था यांच्या बरोबर आपण हे वसतिगृह चालवीत आहोत. भोर येथील वसतिगृहात देखील नव्याने भरती करताना प्रामुख्याने कातकरी मुले कशी घेत येतील असा प्रयत्न आश्रमाचे कार्यकर्ते करीत आहेत. या निमित्ताने कातकरी म्हणजे कोण आणि त्यांच्याकरिता असे विशेष प्रयत्न करायची गरज काय?, हे आश्रमाच्या कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख लिहीत  आहे.

राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ही  संस्था मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात शिक्षण, बचतगट, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात काम करते. एकदा माझी पत्नी सौ. विदुलाचे व्याख्यान संस्थेच्या पिरंगुट येथील  हिम्मत शाळेत होते. परिसरातल्या बचत गटातल्या सदस्य महिला याकरिता जमल्या होत्या. माझे काम वाहन चालकाचे होते. पुण्यातून संस्थेचे सचिव अनिलजी व्यास, सौ. पूनमजी मेहता आणि अन्य कार्यकर्त्या आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम सुरु होता. मी आणि व्यास सर तिकडे  प्रवेश नसल्यामुळे खाली गप्पा मारत थांबलो होतो. चर्चा हळूहळू कातकरी या विषयावर आली. मुळशी तालुक्यातील कातकरी मुलांसाठी काय करता येईल? वेगळे वसतिगृह, वेगळे केंद्र चालू करता येईल का? अशी चर्चा करता करता व्यास सर म्हणाले कि संस्थेचे माले-मुळशी इथले वसतिगृह या कामासाठी वापरता येईल आणि तिथून जवळच सेनापती बापटांच्या नावाने चालणारी शाळा आणि आय.टी.आय. आहे. तिथे मुले शिकू शकतील.    

पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर हा प्रस्ताव मांडला, तसे सर्वजण उत्साहाने तयार झाले. वारली चित्रकार आणि "रंगावधूत" हा वारली आणि लाकडी वस्तू उत्पादनाचा लघुउद्योग सांभाळणाऱ्या अनिल वाघमारेचा लहान भाऊ सुनील वाघमारे आणि मावळातला आपला कार्यकर्ता नारायण ठिकडे हे दोघे माल्याला जाऊन राहायला तयार झाले. पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजातील सर्व कार्यकर्ते या प्रस्तावाने इतके आनंदित झाले कि सर्वांनी माले परिसरातील वाड्यांवर प्रवास सुरु केला. प्रत्येक  कातोडीतून विद्यार्थी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे. त्याला प्रयत्नांची जोड या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेल्या कातकरी समाजाला एकत्र आणणारी कोणतीही यंत्रणा आज आपल्याकडे उपलब्ध नाही. एखाद्या भागातील माणसावर काही अन्याय झाला तर त्याची माहिती अन्य कातोड्यांवर पोचत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रियाही उमटत नाही. कातकरी समाजात काम करणे सरकारी यंत्रणेलाही अतिशय अवघड जाते. त्याचं उत्साह कातोडी वस्तींवर गेल्यावर मावळून जातो. सरकारी यंत्रणा आणि कातकरी समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याची गरज आहे. मुळातच कातकरी समाज हा थोडा वेगळा राहणाऱ्या वृत्तीचा आहे. सरकारी अधिकारी आला असे समजले की  निम्मी माणसे गायब होतात. जातीचा दाखला मिळवण्याच्या अर्जावर सही करायला बोलावले तरी समोर येत नाहीत. अशा माणसांना स्वत:चा हक्क मिळवण्यासाठी पुढे आणायचे हे खरे आव्हान आहे.  

भारतामध्ये विशिष्ठ उद्योगामुळे एखाद्या समुदायाला ओळखण्याची अनेक उदाहरणे आहेत. उदा.- तांबट, लोहार, कुंचीकोरवी इत्यादी. खरे तर सर्वच माणसे सर्व कामे शिकू शकतात आणि उदरनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या इथल्या जीवनपद्धतीत एकेका समुदायाला एकेक काम उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विकसित झाले आणि अन्य कौशल्ये स्वत:साठी वापरायची अशी प्रथा पडली. उदाहरणार्थ, बांबूच्या चटया, टोपल्या बनविण्याची कला गावात सर्वांना येते, ते स्वत: वस्तू बनविण्याकरिता अथवा दुरुस्तीकरिता वापरतात, परंतु त्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय फक्त बुरुड करतात.

भिल्लांच्या जनजातीमधील जी पोटजात कात बनविण्याचा व्यवसाय करीत असे, ती जनजाती कातकरी, कातोडी अथवा काथोडी या नावाने ओळखली जाउ लागली. त्यांच्याकडे बांबूच्या वस्तू बनविण्याची कला, मासे पकडण्याची कला, मध काढण्याची कला, शिकारीची कला, अशा विविध कला व कौशल्ये होती. पण त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते कात बनविणे आणि विकणे. अन्य कौशल्ये फक्त स्वत:च्या उपयोगासाठी आणि मनोरंजनासाठी.  

या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करायचे झाले तर, इंग्रजांच्या पूर्वीचा काळ आणि इंग्रजांच्या आगमनानंतरचा काळ अशी विभागणी करावी लागेल. इंग्रज येण्यापूर्वी हा समाज महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमाभागातील, "खैराची"  व इतर विपुल वृक्षसंपदा असणाऱ्या भागात स्थायिक होता. झाडांची उपलब्धता कमी अधिक होईल त्याप्रमाणे त्यांचे स्थानिक स्थलांतर होत असे. परंपरागत पद्धतीने घरातील मुले, विविध कौशल्ये आत्मसात करीत असत. कात बनवणे हे प्रगत कौशल्य आहे. यामध्ये झाडाची निवड, कात बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जागेची निवड, झाडांची कटाई, झाडामधील योग्य भागांचे वर्गीकरण, झाडाचा अर्क काढण्याची रासायनिक प्रक्रिया, उष्णतेचा योग्य वापर, अर्काच्या वड्या पाडण्याचे कौशल्य, उत्पादन खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याशी वाटाघाटी करण्याचे आणि हा व्यवहार स्वत:ला फसवून न घेता पूर्ण करण्याची हातोटी अशा विविश गुणवत्तेचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि कातकरी माणूस हा विविध आणि अवघड कौशल्यांनी युक्त आहे.

स्वाभाविकपणे कातकरी समाजाकडे एकेकाळी पुरेशी धनसंपत्ती होती. त्याचप्रमाणे मध, लाकूड, कंदमुळे, प्राण्यांची शिकार अशा जंगलात उपलब्ध होणाऱ्या  विविध गोष्टी त्याला भरपूर प्रमाणात मिळायच्या. जातपंचायतीच्या रूपाने स्वत:ची न्यायव्यवस्था कातकऱ्यांकडे  होती. आज जरी ही  जातपंचायत व्यवस्था बदनाम झाली असली तरी, त्या काळी ही एक चांगली व्यवस्था होती.

इंग्रजांच्या आगमनानंतर कातकरी समाजाची आर्थिक व्यवस्था विस्कटून गेली. इंग्रजांनी गावातील शेत  जमिनींची नोंदणी करून महसुलाची व्यवस्था बसवली. खाजगी जंगले �

[The entire original message is not included.]

चेतन Chetan

unread,
Jun 29, 2015, 2:26:51 AM6/29/15
to adi...@googlegroups.com
pls keep the group members belonging to tribal communities

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages