|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : २८ फेब्रुवारी २०१७ ||

28 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Mar 9, 2017, 1:54:47 PM3/9/17
to AYUSH | adivasi yuva shakti
*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : २८ फेब्रुवारी २०१७ ||*

निसर्ग, पर्यावरण, जैव वैविध्यता, पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य जतन करून मानव व सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे जग आशेने बघत असताना, समाज अगदी नाजूक वळणावर आहे. एकीकडे समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होऊन परावलंबी पणा वाढत आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावत आहे, पिढी च्या पिढी हळू हळू व्यसनातून नष्ट होते आहे, अनुसूचित क्षेत्रातील रोजगार  व्यवसाय डोळ्यासमोरून जात आहेत, हक्क डावलले जात आहेत, योजना प्रत्येक्ष पोचत नाहीत, व्यवस्थेत संवेदने चा अभाव, सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे. 

राज्यातील सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला परिसर "ठाणे / पालघर जिल्हा", दक्षिण गुजरात या परिसरातील अनुसूचित क्षेत्रावर तर प्रत्येक्ष - अप्रत्येक्ष आक्रमणे चालू आहेत. लवकरच आदिवासी समाज अल्पसंख्यांक होऊन नष्ट होण्याची भीती व्यक्त होते आहे.    .... (यादी खूप मोठी आहे)

असो, हि सगळी सध्याची परिस्थिती, अनेक वर्षांची आदिवासी चळवळींचा इतिहास, सध्या युवा पिढीच्या प्राथमिकता, समाजा समोरील आव्हाने या विषयी अभ्यासपूर्वक चिंतन करून. समाजाचे प्रश्न/समस्या आव्हाने सोडविण्या च्या पुढे जाऊन रचनात्मक शाश्वत विकास, आदिवासी अस्मिता, सांस्कृतिक ओळख, परंपरा बद्दल समाजात आणि बिगर आदिवासीत संवेदना तयार करून समाजाची स्वाभिमानी स्वावलंबी पिढी तयार करण्याची प्रक्रिया मजबूत करण्यासाठी. आदिवासी हिता साठी होणारे प्रत्येक प्रयत्न मजबूत करण्याची व्यवस्था समाजात रूजवूया. आणि त्या साठी लागणारे संस्कार (जे आदिवासी जीवनशैलीचा सहज अविभाज्य भाग आहे) घरात, समाजात टिकावे त्या साठी प्रयत्न करूया.  

याच प्रेरणेने आपण १९९९ पासून विविध सामाजिक चळवळींचा अनुभव/निरीक्षण करून समाजाची स्वतःची स्वालंबी व्यवस्था मजबूत करण्यासाठी युवांचा सहभाग व्हावा यासाठी २००७ पासून आयुश (आदिवासी युवा शक्ती) च्या माध्यमातून विविध उपक्रमांची सुरवात केली गेली. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी झाली, आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागाने आणि सहकार्याने हे कार्य विविध क्षेत्रात पसरते आहे. 

आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान जतन (आदिवासी कला जतन - वारली चित्रकला) उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. अगणित पिढ्यानपासून जतन केलेले हे ज्ञान फक्त चित्रा पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक जीवन, विकासाला आदर्श दिशा म्हणून त्या विषयी जागरूकता आणि विविध कल्पक प्रयत्नातून रोजगार निर्मिती चे प्रयत्न चालू आहेत. 

मार्गदर्शक तत्व -  

माती : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करून प्रसार करणे 
पाणी : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता वाढवणे
चावूल : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे
 
या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी

[अदिकला]
*१) अनुभवी कलाकारांसाठी सहकार्य* - 
आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांची कलाकृती स्थानिक, राज्य, राष्ट्र व आंतराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक्ष ग्राहकांपर्यंत पोचून. त्यांचे आर्थिक सबळीकरण करण्यासाठी चा प्रयत्न आहे. कलाकारांनी त्वरित आपली कलाकृती चे नमुने/माहिती आयुश केंद्रात जमा करावे. होणाऱ्या विविध प्रदर्शनात/कार्यक्रमात/वेबसाईट वर त्या कलाकृतींना प्रसिद्धी दिली जाईल. 

*२) नवोदित कलाकारांसाठी संधी* - 
ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० चा गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी, आपल्या संपर्कातल्या कलाकारांना कळवावे.      

३) *आदिवासी कलाकृती निर्मिती* : परवा हॉंगकॉंग येथून मेमेराकी डॉट कॉम तर्फे श्रीमती योशा यांनी संपर्क केला होता. विविध वस्तूवर वारली चित्रकला काढण्या संबधी बोलणे झाले त्यानी नमुना म्हणून २ चामड्याच्या पर्स वर चित्र कलाकृती करण्यासाठी कुरियर केले आहे लवकरच ते पूर्ण करून पाठवण्यात येईल. गुणवत्ता तपासून लवकरच पुढील सविस्तर करार करण्यात येईल. त्यांच्याकडून पर्सवर चित्र काढण्यासाठी नियमित काम दिले जाईल. 

४) इत्तर मागण्या -  लाकडाच्या वस्तू साठी पुणे येथून चौकशी करण्यात अली आहे. चेन्नई येथून पुरो क्राफ्ट कडून चित्रांची एकत्रित मागणी आली आहे. बेंगळुरू आणि हैदराबाद येथील घराच्या भिंतीवर चित्र काढण्यासाठी चौकशी करण्यात आली आहे. 

५) *मुंबई छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे कलाकृती केंद्र* - ९  मार्च रोजी त्यांच्या कार्यालयातून संपर्क करून आदिवासी कलाकृती तेथील कलाकेंद्रात विक्रीसाठी ठेवण्यासाठी चौकशी केली. लवकरच या संबंधित सविस्तर चर्चा करण्यात येईल. इच्छुक कलाकारांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा

६) सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प - प्रसाशकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सुवास ट्रस्ट ची  स्थापना केली आहे. शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा मुख्य उद्देश ठेवून विविध आदिवासी कलाकृतींना प्रसिद्धी देऊन आदिवासी कलाकारांचे आर्थिक मजबुती करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सध्या  ते मधुबनी चित्र सोबत काम करीत आहेत. सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर चित्र काढण्यासाठी चौकशीचे करण्यात आलो आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास कोईंबतूर, सुरत, पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या चित्रीकरणासाठी आयुश ला पाठवल्या जातील. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे, ट्रस्ट ची टीम लवकरच डहाणू ला भेट देऊन पुढील औपचारीकता पूर्ण करतील. 
 
७) *SNDT कॉलेज MSW साठी इंटर्नशिप* : मुंबईतील SNDT महाविद्यालयातील MSW अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचा अनुभव मिळावा या साठी प्रथम व द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांना १ महिन्याचे इंटर्नशिप च्या माध्यमातून आयुश च्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली  आहे.९मार्च रोजी त्यांनी संपर्क करून चौकशी केली.  लवकरच सविस्तर चर्चेसाठी ठरविले जाईल.    
८) *आदिवासी कलाकार* : आदिवासी कलाकारांचे प्रोफाइल मार्केटिंग साठी, जिथे जिथे आदिवासी कलाकार सहभागी होतील त्याची माहिती एका ठिकाणी मिळावे या साठी प्रयोग करतो आहोत. आपल्या माहितीत असे काही कार्यक्रम/कलाकार व्हिजिट आल्यास जरूर कळवावे, आपण प्रसारित करूया

९) *स्थानिक पातळीवर कला बँक ची निर्मिती* : विविध गाव पाड्यावर विखुरलेले आदिवासी कलाकार, आणि कलाकृती सुरक्षित साठविण्यासाठीच्या अडचणी लक्षात घेऊन. कलाकृती एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या साठी आपण रेल्वे स्थानका जवळ (खंबाळे) आणि महामार्ग जवळ (वाघाडी) येथे कला बँक ची निर्मित करण्यात येणार आहे. परिसरातील कलाकारांनी आपल्या कलाकृती आणि नमुना कलाकृती जमा करून नोंदणी करावी. 
आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.

१०) *पुणे येथे कला विक्री केंद्र* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

११) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*
वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft,

(नोंदणी/करार चर्चा चालू आहे) :  हस्त वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.

१२) *CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक* : २० फेब रोजी भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI - रिजर्व बँक ऑफ इंडिया ची संस्था, देशभरातील सगळे ऑनलाईन व्यवहार या संस्थे मार्फत होतात) यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक चर्चेची बैठक झाली यात आयुश तर्फे प्रो चेतन दा गुरोडा, बबलू  दा वाहुत, प्रांजण दा राऊत सहभागी झाले होते. सकारात्मक आणि स्वानंदात्मक चर्चा झाली, नवीन तंत्रज्ञान चा उपयोग करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या साठी त्यांच्या सुचने नुसार प्रस्थाव जमा केला आहे, लवकरच त्या संदर्भात सविस्तर चर्चा / प्रेसेंटेशन देण्यात येईल.   
 
१३) *पारंपरिक ज्ञान जतन प्रकल्प* : समाजात विखुरलेले पारंपरिक ज्ञान विविध माध्यमातून संग्रहित करणे. या प्रकल्पात लिखाण, छायाचित्रीकरण, ध्वनी मुद्रण, चित्रीकरण, संग्रह करून सहभागी होऊन आपल्या समाजाची बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी हातभार लावूया. इच्छुकांनी संपर्क करावा.

१४) *आदिवासी संस्कृती जागरण उपक्रम* : आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान या बद्दल जागरूकता करण्यासाठी विविध माध्यमातून शाळा/कॉलेज/पाडा/गाव/शहर या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे. आपल्या परिसरात असे कार्यक्रम आयोजित करून किंवा या साठी सहकार्य करून समाज जागृतीच्या कामाला हातभार लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा.

१५) आयुश चे ऑडिट - आयुश चे संस्था म्हणून नोंद "आदिवासी युवा सेवा संघ" या नावाने आहे, संस्थेचे ऑडिट पूर्ण झाले. ठाणे येथील चार्टड अकॉउंटन्ट यांच्याकडून पूर्ण तपासणी प्रक्रिया केली गेली 

 १६) *सहकार्य आणि सहभाग*:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर, आर्थिक साहाय्य, नवीन आयडिया देणे, संपर्क वाढविणे, जाहिरात करणे, कलाकृती विक्रीसाठी सहकार्य, रोजगार निर्मितीचे उपक्रम मजबुती करण इत्यादी)

  *#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* :  https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता.

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. *आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !*

Lets do it together! 

AYUSHonline team
www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of  this Initiative through Warli Painting
माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages