१०-१५ दिवसांची विंडो ठरवून जमेल त्या दिवसी आदिवासी दिन साजरा केला तर

14 views
Skip to first unread message

SACHiNe SATVi

unread,
Jul 22, 2016, 11:46:29 AM7/22/16
to AYUSH google group
वयक्तिक अनुभव (स्थानिक बोली भाषा)

हाफिसात कामा ना परीक्षा होती तय फार दिस झालं घरा जाया मिललाच नीही. ओढे दिस झालं घरच्यांना भेटून कव्हा घरा जाय असा होतं. दादू ना बाहलस हो फार वाट पाहताहात. कोली भाजी खाया जमलाच नीही , घराच्याही कोली भाजी खाली आवनी, सेहली हो केली. मी घरा गेलू का परत कोली भाजी खायाचू आहू, माना य्या आपला फार भारी वाटत का आपले सन उत्सव कराया केलेंडर वर अवलंबून नाही रेहू. जव्हा आपला काम खपला तव्हा आपला सन, घरात काही काम निघाला काही बरा व्याट झाला तरी सन मोहरप माघारी करता येत. ओढी सोय त कोठेच नीही दिसली माना. 

आथा सगळीकडं लोखा फार जागृत दसी हॊताहात, जागतिक आदिवासी दिन पण फार उत्सवात सगळीकड गाजत वाजत करजल. ये वेलस यो दिस मंगलवारी येतो आपल्या पैकी आख्याना सुट्टी घिया जमलुच असा नीही, *त ज्यांना जमल त्यांनी करायचाच पण ज्यांना नीही जमल त्यासाठी आपले असा करायचा का सगल्यांचे सोयीचा एखाद दिस निवडून ते दिस मस्त सागाल्यांसी कहाण्या करून करायचा. असा केला त का १० ते १५ दिसाचा पट्टा दसा करून ठेवायचा ना त्यात जेव्हा जमल तेव्हा करायचा. असा करून जास्तीत जास्त लोख आपल्याना जोडता येल. नांगजास कसाक वाटला ता सांगजास. 

नाही तरी आपला ऐकून एक दिस आदिवासी दिसूच आहे, रोजच आपले लेखासाठी काही करवला त करीत रेहायचा. सनिवारी कोली भाजी खाया घरा इयाचू आहु, कोनी वाघाडी जवल होवा ता इजास कोलीभाजी खाया  


वयक्तिक अनुभव (बोली मराठी )

ऑफिस मध्ये प्रोजेक्ट आणि डिप्लोमाची परीक्षा अशा विविध कामात अडकून पडल्याने गेले बरेच दिवस घरी जाता आले नाही. कोळी भाजी खायला घरी जायला जमलेच नाही . घरी कोळी भाजी खाली, लावणी, सेहली पण झाली. आता घरी गेल्यावर पुन्हा कोळी भाजी खायचा प्लान आहे. आपल्या आदिवासी परंपरांचे हे विशेष आहे आणि याचा नेहमी अभिमान वाटतो की सगळ्यात प्रॅक्टिकल अशी आपली संस्कृती आहे. सण उत्सव साजरे करण्यासाठी आपाल्याना केलेंडर वर अवलंबून राहावे लागत नाही आपले शेतीची कामे/वातावरण/निसर्ग बदलत होतो तसे आपले सण उत्सव असतात. आणि घरात काही काम /अडचण /दुःख असेल तर आपले सण उत्सव आपण सहज मागे पुढे करतो. निसर्गाला आदर्श मानणारी आपली संस्कृती काळ वेळ आणि परिस्तिथिनुसार इत्तर पद्धती पण बदलतात. इतकी फ्लेगझीबल परंपरा कुठेच बघायला मिळत नाही

असो, सध्या मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृता होताना दिसते आहे. जागतिक आदिवासी दिन खूप उत्साहाने साजरा होणार यात शंका नाही. या वर्षी हा दिवस मंगळवारी येत असल्यामुळे जे सुट्टी काढू शकतात ते तर सहभागी होतीलच. पण सोबत ज्यांना त्या दिवशी शक्य नाही अश्यांसाठी यासाठी आपण त्या त्या क्षेत्रात एक सोयीचा दिवस ठरवून एकत्र येऊन साजरा केल्यास त्या निमित्ताने एकत्र यायची सवय लागून समाजोपयोगी उपक्रम अधिक मजबूत करण्यास हातभार लागू शकेल यात शंका नाही. एक आयडिया शिक्षण/नोकरी/व्यवसाय करणाऱ्यांसाठी जमल्यास १०-१५ दिवसांची विंडो ठरवून त्यात जमेल त्या दिवसी आपण आदिवासी दिन साजरा केला तर अधिकाधिक लोकांना जोडण्यास हातभार लागेल असे वाटते. हा दिवस एकत्र येऊन विचार मंथन करण्यासाठी एक संधी म्हणून त्यानं निमित्ताने स्थानिक/गाव/तालुका/जिल्हा/शहर/राज्य/राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय पातळीवर आदिवासी एकात्मकता आणि सशक्तीकरणास हातभार लावूया. असे ही आपण आदिवासींना प्रत्येक दिवस हा आदिवासी दिन आहे असे समजून रोज समाजोपयोगी कामात सहभागी होऊया. Lets do  it together!

शनिवारी कोळी भाजी खाणार आहोत, कुणी वाघाडी जवळ असल्यास कोळी भाजी खायला नक्की या


........... dahanu calling!!!

Avinash Patil

unread,
Jul 22, 2016, 1:30:30 PM7/22/16
to adi...@googlegroups.com

Thanks Sachin,
Mana ho eyacha hota..pan aatha jamal asa nahi vatat..


--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgYdhZwWLUxgwvyYa_MMPAFxgSVzL%2Bd8SyqeLZS2HGzPfA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages